कापूस सोयाबीन अनुदान केवायसी करण्यास सुरू.
राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून अर्थसंकल्पामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. या अनुदानाबाबत बरेच शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आले यामध्ये नेमकी ही रक्कम शेतकऱ्यांना कशा स्वरूपात मिळणार आणि कधी मिळणार याबद्दलची बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे आजच्या या लेखाच्या माध्यमातून आणि शासनाने निर्गमित केलेल्या सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयाच्या विश्लेषण आपण यामध्ये पाहणार आहोत
अनुदान केवायसी 3 सप्टेंबर 2024 चा जीआर मध्ये काय दिले आहे.
या जीआर मध्ये शासनाकडून 2023 च्या खरीप हंगामा मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाह्य देण्याकरिता रुपये 2516.80 कोटी निधी शासन निर्णयाद्वारे आयुक्त कृषी आयुक्त पुणे यांना अर्थसंकल्पीत वितरण प्रणाली द्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
हा निधी उपलब्ध केल्यामुळे आता शेतकऱ्यांना अनुदान मिळणे कसल्याही प्रकारची अडचण राहिलेले नाही.
शासन निर्णय पाहण्यासाठी कापूस सोयाबीन अनुदान
अनुदान केवायसी प्रक्रिया
शासनाकडून शेतकऱ्यांच्या केवायसी करण्याकरिता कृषी विभाग व कृषी सहाय्यक यांना सूचना दिलेल्या आहेत त्याबद्दल शासनाने पोर्टल लॉन्च केला आहे या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या केवायसी पूर्ण केल्या जातील आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल केवायसी कशा पद्धतीने केली जाते याबद्दलची माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.
अनुदानाची रक्कम कधी जमा होणार
बऱ्याच शेतकऱ्यांचे मनात या शंका आहेत की नेमकं अनुदानाची रक्कम कधी बँक खात्यावर जमा होईल याबद्दल सविस्तर बोलायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांनी आपले कागदपत्रे तसेच सहमती पत्र कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा केले आहे आणि कृषी सहाय्यक यांच्यामार्फत त्या शेतकऱ्यांची ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर केवायसी पूर्ण झाली आहे अशा शेतकऱ्यांना आता केवायसी पूर्ण झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात रक्कम जमा करण्यात येणार आहे. कारण केवायसी पूर्ण केल्यानंतर जो निधी वितरण प्रणाली आहे ती म्हणजे कृषी आयुक्त पुणे यांच्याकडे शासनाने निधी वितरित केलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपली अनुदान केवायसी पूर्ण करून आपले अनुदान आपल्या बँक खात्यात जमा करून घ्यावे.
1 thought on “ कापूस सोयाबीन अनुदान केवायसी करण्यास सुरू.”