मुलींसाठी पोस्ट ऑफिस योजना , दहा हजाराची गुंतवणूक करा, 37.68 लाख रुपये मिळवा.
सरकारने मुलींसाठी व तिच्या भल्यासाठी पोस्ट ऑफिस योजना च्या वतीन वेगवेगळे योजना सुरू करण्यात आलेले आहे. या योजनेचा जास्तीत जास्त फायदा नागरिकांना होणार आहे. पोस्ट ऑफिस योजना
पोस्ट ऑफिस योजनेमध्ये गुंतवणूक (Investment )केल्यानंतर चांगला परतावा मिळतो . पोस्ट ऑफिस च्या वतीने वेगवेगळे योजना सुरू केलेले आहेत. या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात नागरिकांना होणार आहे. पोस्टाच्या योजनेमध्ये गुंतवणूक ( Investment) केल्यानंतर आपली ठेव सुरक्षित राहते आणि चांगला परताव पण मिळतो. आज आपण अशाच एका योजनेची माहिती पाहणार आहोत . जीपोस्ट ऑफिस च्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. त्या योजनेच्या आधारे आपल्याला चांगला परताव देखील मिळण्यास मदत होईल. त्या योजनेचे नाव आहे .
सुकन्या समृद्धी योजना या योजनेच्या माध्यमातून करारा सुट आणि भरघोस परताव मिळणार आहे. तर याचा लाभ कसा घ्यायचा. किती पैसे गुंतवणूक करावी लागेल,आणि आपल्याला किती मिळतील. याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
सुकन्या समृद्धी योजना पोस्ट ऑफिस योजना
केंद्र सरकारने मुलींच्या भल्यासाठी त्यांच्या हितासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू केलेली आहे. या योजनेची सुरुवात 2015 मध्ये झालेली आहे. ही योजना मुलींसाठी खूप महत्त्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून आपण मुलीचे शिक्षण, आरोग्य तसेच मुलीचे लग्न यासाठी या योजनेच्या माध्यमातून बचत करून मुलीच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर योजना आहे.
सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत मुलीच्या पालकांना वेगवेगळ्या प्रकारात गुंतवणूक करता येते. या योजनेमध्ये कमीत कमी 250 रुपयांची तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. ही योजना एक बेटी बचाओ बेटी पढाव मोहिमेचा एक भाग आहे. या योजनेचा असा उद्देश आहे की मुलीच्या पालकांना त्यांच्या मुलीच्या खर्चाची पूर्तता करणे. मुलीचे शिक्षण पूर्ण करणे, मुलीच्या लग्नाचा आर्थिक भार कमी करणे हे या योजनेचे उद्देश आहेत.
करात सूट आणि भरघोस परताव
सुकन्या समृद्धी योजना कराच सूट आणि भरघोस परताव देते. या योजनेसाठी मुलीच्या पालकांना कमीत कमी 250 रुपयांची गुंतवणूक करता येते, तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. सुकन्या समृद्धी योजना आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीच्या कक्षेत येते. या योजनेअंतर्गत 10 वर्षापर्यंतच्या मुलींचे खाते उघडले जाऊ शकतात.
व्याजदर किती
सुकन्या समृद्धी योजना खात्यातर्गत , सरकार दर तिमाही आधारावर व्याज निश्चित करते. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये, या तीमाहिसाठी म्हणजे 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधी साठी वार्षिक 8.2 टक्के व्याज दराने चक्रवाढ व्याज निश्चित करण्यात आलेले आहे.
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये चक्रवाढ व्याज देण्यात येते. ज्यामुळे मुलींना जास्तीत जास्त प्रमाणात लाभ देण्यात येतो.
पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये 10 हजार रुपये गुंतवल्यास किती पैसे दिले जाते
पोस्ट ऑफिसच्या वतीने राबवली जाणारी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत दहा हजार रुपये गुंतवल्यास किती पैसे दिले जाते.
एखाद्या पालकाची मुलगी पाच वर्षाची असेल तर तुम्ही वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवले, जे दर महिन्याला 10,000 रुपये येते. जर तुम्हाला वार्षिक 8.2 टक्के व्याज मिळत असेल, तर त्या मुलीच्या 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुकन्या समृद्धी योजनेतील अंदाजे रक्कम रु.55.61 लाख असेल.
ज्यामध्ये गुंतवणूक केलेली रक्कम 17.93 लाख असेल आणि 21 वर्षानंतर या योजनेअंतर्ग मिळणारे व्याज हे 37.68 लाख रुपये असेल. पोस्ट ऑफिस योजना जर तुम्ही वर्षाला 150,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटी रक्कम 69.8 लाख रुपये एवढी असेल,22.5 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर दिले जाणारे व्याज 47.3 लाख रुपये मिळेल.
सुकन्या समृद्धी योजनेचे नियम
सुकन्या समृद्धी योजनेचे नियम असे आहे की, त्याचा लॉक – इन कालावधी,जो 21 वर्षाचा आहे.
उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीच्या मुलीसाठी 5 वर्षाच्या वयात खाते उघडले असेल तर ते 26 वर्षाच्या वयात परिपक्व होईल.
पोस्ट ऑफिस योजना योजनेअंतर्गत हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय केवळ आर्थिक शिस्तीला चालना देत नाही तर परिपक्व यावर त्यांना भरघोस रक्कम देखील देतो.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.