राज्यामधील गोशाळा मधील देशी गायींसाठी अनुदान देण्यात येणार आहे

30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे

या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशी गाईला राज्य मातेचा दर्जा देण्याचे निर्णय सुद्धा घेतलेले आहेत

हा निर्णय घेणारा महाराष्ट्र हा देशांमधील पहिला राज्य असणार आहे.

देशी गाई हे आपल्या शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत त्यामुळे तिला राजमाता चा दर्जा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे- देवेंद्र फडणवीस

गोठ्यामध्ये देशी गाईंचे संगोपन करण्यासाठी 50 रुपये प्रतिदिन अनुदान योजना राबविण्यात येणार आहे

कमी उत्पन्नामुळे गोशाळा ना हा खर्च उचलता येत नव्हता त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला

20 व्या पशु गणनेनुसार राज्यामध्ये 93 लाख 85 हजार 574 गोवंशिय पशुधन आहे

सध्या राज्यामध्ये 828 नोंदणीकृत गोशाळा असून यामध्ये अंदाजे 1.5 लाख हून अधिक पशुधन आहेत