भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना
आपण सरकारच्या वेगवेगळ्या योजना पाहत आहोत तशीच आज एक योजना आहे जी फळबागा करीत आहे. या योजनेला राज्य सरकारने 6 जुलै 2018 रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबागा योजना राज्य सरकारने राबवण्यास मान्यता दिलेली आहे. या योजनेसाठी सरकार 100 टक्के अनुदान देत आहे. शंभर टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फुलेत्पादन विभागाकडून भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत आपल्याला 15 पिकांना अनुदान देण्यात येणार आहे. त्याचबरोबर खड्डे खोदणे, ठिबक सिंचन अनेक जे पिक लागवडीसाठी कामे असतात त्या कामांना सरकार 100 टक्के अनुदान देत आहे. परत नंतर या पिकांना जे खत लागते त्या खतांना पण सरकार 100 टक्के अनुदान देत आहे.
या सर्व याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. या योजनेमध्ये 15 पिकांचा समावेश आहे त्या पंधरा पिका करिता आपल्याला जे कामे करावे लागतात म्हणजे खड्डे खोदणे, रोपांची लागवड करणे, ठिबक सिंचन द्वारे पाणी देणे , पिकांचे संरक्षण या सर्व कामाकरिता सरकार आपल्याला 100 टक्के अनुदान देत आहे. ठिबक सिंचन चे अनुदान आहे. ते आपल्याला राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून दिले जाणार आहे. जे पिकांना खत लागणार आहे त्या खतांना या योजनेतून 100 टक्के अनुदान दिले जाणार. सर्वात जास्त अनुदान आंबा पिकांची लागवड केल्या नंतर दिले जाते. सर्वात कमी अनुदान हे नारळ रोपे लागवड केल्यास मिळते. अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला कृषी विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करताना तुम्हाला लागवड केलेली क्षेत्र, किती रूपांची लागवड केलेली आहे, कोणत्या फळ पिकांचे लागवड केलेली आहे त्या पिकाचे नाव या सर्वांची माहिती तुम्हाला द्यावी लागेल.
अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला त्या अनुदानाची रक्कम मिळेल. हे अनुदान तुम्हाला फळबाग लागवड करण्यासाठी सरकारची एक आर्थिक मदत मिळेल.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना माहिती
- या योजनेमध्ये 50 हजार ते दीड लाख अनुदान दिले जाते.
- आंबा पिकाची लागवड केल्यानंतर सर्वात जास्त अनुदान मिळेल.
- सर्वात कमी नारळाची रोपे या पिकाची लागवड केल्यानंतर अनुदान मिळेल.
- या योजनेमध्ये पंधरा पिकांचा समावेश आहे.
- पिकांना जे खत लागणार आहे त्या खताला पण शंभर टक्के अनुदान दिले जाते.
- पाणी देण्याकरिता जे ठिबक सिंचन वापरणार आहोत त्या ठिबक सिंचन शंभर टक्के अनुदान मिळेल.
- ठिबक सिंचन अनुदान आपल्याला हे राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून दिले जाईल.
- खड्डे खोदणे, रूपांची लागवड करणे, ठिबक सिंचन द्वारे पाणी देणे, पिकाचे संरक्षण या सर्व कामाकरिता सरकार आपल्याला शंभर टक्के अनुदान देत आहे.
- ही योजना फळबाग लागवड करण्यासाठी आहे. या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना पात्रता
या योजनेमध्ये लाभ घेण्याकरिता सर्व शेतकऱ्यांनी खालील दिलेले पात्रता असणे आवश्यक आहे.
* शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
* अर्जदार शेतकऱ्याचा नाव व सातबारा उतारा असावा.
* अर्जदार शेतकरी अनुसूचित जाती, जमाती किंवा महिला असावी.
* अर्जदार शेतकऱ्याचे क्षेत्र फळबाग लागवडीसाठी किमान 0.20 हेक्टर (5 एकर) असावे
* या योजनेमध्ये पंधरा पिकांचा समावेश आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना क्षेत्र मर्यादा
* कोकण विभागासाठी-किमान 0.10 हेक्टर (0.25 एकर) व 10 हेक्टर (25 एकर) पर्यंत.
* उर्वरित विभागकिसाठी किमान 0.20 हे (पाच हेक्टर) व कमाल 6.00 हे (15 एकर पर्यंत) लाभ घेता येईल.
या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी जे फळबाग लागवडीसाठी क्षेत्र आहे ते वरील प्रमाणे माहिती दिलेली आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना मध्ये कोण कोणती पिके समावेश आहे
- आंबा
- चिकू
- बोर
- पेरू
- डाळिंब
- चिंच
- करवंद
- नारळ
- पपई
- काजू
- मोसंबी
- केळी
- लिंबू
- जांभूळ
- संत्रा
- सीताफळी
- या योजनेमध्ये या सर्व सोळा प्रकारच्या फळ पिकांचा समाविष्ट आहे .
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ज्या पिकांची लागवड करायची आहे त्या फळ पिकांचे रोपे तुम्हाला लागवड करता येईल.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना लागवड कालावधी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना जून ते मार्च या कालावधीमध्ये फळबागाची लागवड करू शकता.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अवश्यक लागणारे कागदपत्रे
या योजनेत लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील दिलेली कागदपत्रे सर्व अवश्यक आहेत .
* 7/12 उतारा .
* 8 अ
* आधार लिंक असलेले बँक खाते क्रमांक.
* आधार क्रमांक
* मोबाईल क्रमांक
* कागदी लिंबू, संत्रा व मोसंबी या लागवडीकरिता माती परीक्षण अहवाल अवश्यक आहे.
* सामायिक क्षेत्र असल्यास इतर खातेदाराचे सहमती पत्र.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अर्ज करण्याची प्रक्रिया
तुम्ही या योजनेसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करू शकतात.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जावे लागेल. वेबसाईटवर गेल्यानंतर अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून तुम्हाला अर्ज सबमिट करावा लागेल.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अनुदान मर्यादा
या योजनेमध्ये शेतकऱ्यांना फळ लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते या अनुदानाचा कालावधी तीन वर्षाचा आहे.
* पहिल्या वर्षी 50% ,दुसऱ्या वर्षी 30 टक्के व तिसऱ्या वर्षी 20 टक्के अनुदान मिळेल .
* अनुदानासाठी दुसऱ्या वर्षी किमान 80 टक्के तर तिसऱ्या वर्षी किमान 90 टक्के झाडे जिवंत असणे आवश्यक आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना विचारले जाणारे प्रश्न
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना कधी सुरू करण्यात आली?
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना ६ जुलै २०१८ रोजी सुरू करण्यात आली.
2 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेमध्ये किती पिकांचा समावेश आहे व कोणकोणती?
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेमध्ये 16 पिकांचा समावेश आहे. चिक्कू ,आंबा ,डाळिंब ,चिंच फणस ,नारळ ,पेरू ,करवंद ,काजू पपई ,केळी ,मोसंबी ,संत्रा सीताफळी ,जांभूळ ,लिंबू. या सर्व पिकांचा या योजनेमध्ये समावेश आहे.
3 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना लागवड कालावधी?
- जून ते मार्च हा लागवड कालावधी आहे.
4 योजनेचा अर्ज कोठे करावा?
- या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने आधी कृती संकेतस्थळावर करावा
5 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनांमध्ये किती अनुदान दिले जाते ?
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेमध्ये 50 हजार ते दीड लाख अनुदान दिले जाते.
5 thoughts on “भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अनुदान अर्ज प्रक्रिया”