Pm Vishwakarma Yojna

Pm Vishwakarma yojna 2024

Pm Vishwakarma Yojna विश्वकर्मा योजना

       जगात अर्थव्यवस्थेला चालना देणारे लहान मोठे व्यवसाय निर्माण करणे खूप महत्त्वाचे आहे या अनुषंगानेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Pm Vishwakarma Yojna 2023 पीएम विश्वकर्मा योजना अमलात आणली आहे. या योजनेमध्ये सूक्ष्म लघु व मध्यम मंत्रालयामार्फत व्यवसायिकांना एक विशेष योजना व व्यवसाय वाढीसाठी आर्थिक मदत आणि प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Pm Vishwakarma Yojna पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत कोण कोण लाभ घेऊ शकतात कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत व लाभार्थ्यांना कोणता लाभ मिळणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे याची सविस्तर माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत.

      सूक्ष्म, लघु व मध्यम मंत्रालयाने लहान व्यवसायिकांना व कलाकारांना त्यांच्या व्यवसायात वाढ व्हावी म्हणून पीएम विश्वकर्मा योजना अमलात आणली आहे या योजनेची घोषणा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात घोषणा केली आहे ही योजना विश्वकर्मा यांच्या जयंती पासून म्हणजेच विश्वकर्मा दिवस 17 सप्टेंबर पासून लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत विविध व्यावसायिकांना प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी रक्कम दिली जाते व त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी त्यांना पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये व दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपये कर्ज दिले जाते या कर्जाचा व्याजदर हा वार्षिक पाच टक्के दराने आहे या योजनेसाठी अर्ज कसा करावा आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती कशा पद्धतीने आपणास लाभ मिळणार याची संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

Pm Vishwakarma Yojna

Pm Vishwakarma Yojna कोणते व्यवसायिक पात्र आहेत

या योजनेमध्ये काही ठराविक व्यावसायिकच याचा लाभ घेऊ शकतात ते कोणते याची माहिती खाली दिलेली आहे

 • सुतार
 • बोट बनवणारा
 • सोनार
 • बांधकाम मिस्त्री
 • लोहार
 • मूर्तिकार
 • कुंभार
 • चांभार
 • नावी 
 • हार बनवणारा
 • धोबी
 • दर्जी टेलर
 • मासेमारी जाळे बनवणारा

अश्या प्रकारचे व्यवसाय करणारे व्यावसायिक यात पात्र ठरतात 

Pm Vishwakarma Yojna अर्ज पात्रता काय असावी

   पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आपण खालील नियमात असणे गरजेचे आहे . 

 • स्वतःच्या रोजगाराच्या आधारावर असंघटित क्षेत्रात हाताने आणि साधनाने काम करणारे व नमूद केलेल्या पारंपारिक  व्यवसाय करणारे लोक यात पात्र असतील.
 • लाभार्थ्याचे  वय 18 वर्षे पूर्ण असायला पाहिजे.
 • लाभ घेणारी व्यक्ती ही योजनेच्या वेळी त्याच व्यवसायात गुंतलेली असावी. 
 • अर्जदाराने याआधी म्हणजे मागील पाच वर्षात केंद्र शासन किंवा राज्य सरकार यांच्या अशा कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.  (उदाहरणार्थ पीएमईजीपी, पीएम स्वनिधी, मुद्रा योजना इत्यादी. )
 • या योजनेमध्ये कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येतो (कुटुंब म्हणजे पती-पत्नी व अविवाहित मुले).
 • अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरदार नसावी. 

आवश्यक कागदपत्रे

     या योजनेचा लाभ घेण्याकरिता आपणास आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे

 • आधार कार्ड
 • आधार लिंक मोबाईल नंबर
 • सेविंग बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँकेचे)
 • पॅन कार्ड
 • कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड 
 • रेशन कार्ड

या कागदपत्रांची आवश्यकता आपणास अर्ज करताना लागते.

अर्ज प्रक्रिया

    पीएम विश्वकर्मा योजना (Pm Vishwakarma Yojna) मध्ये अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे.  आपण स्वतः आपल्या जवळच्या महा ऑनलाईन सेंटर किंवा आपल्या जवळ असणाऱ्या सीएससी केंद्रावर जाऊन आपला अर्ज भरू शकता आपला अर्ज अचूक भरल्यानंतर आपल्याला एक एप्लीकेशन नंबर मिळतो त्या नंबर वरून आपण आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकतो. 

निष्कर्ष

    भारत देश हा कला व सांस्कृतिक क्षेत्राचा उगम स्थान असणारा देश आहे. भारत देशात विविध प्रकारचे पारंपारिक पद्धतीने सूक्ष्म व लघु उद्योग केले जातात. या व्यवसायिकांना गती मिळावी तसेच त्यांच्या उद्योग क्षेत्रात वाढ व्हावी या हेतूने केंद्र शासनाने पीएम विश्वकर्मा  योजना Pm Vishwakarma Yojna  अमलात आणली आहे. या योजनेमध्ये व्यवसाय प्रशिक्षण व्यवसायासाठी लागणारे साहित्य व व्यवसाय वाढवण्यासाठी लागणारी आर्थिक मदत दिली जाते. पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये पर्यंतची रक्कम दिली जाते या रकमेवरील व्याज 5% दराने आकारले जाते यावरील परतफेड ही 18 महिन्यांची असेल. पहिली परतफेड झाल्यानंतर आपण दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपये आर्थिक मदत मिळवण्यास पात्र होतात.

पीएम विश्वकर्मा Pm Vishwakarma Yojna योजना मध्ये आपला व्यवसाय वाढवण्यासाठी पारंपारिक पद्धतीने करणाऱ्या व्यावसायिकांना आर्थिक सहाय्य केले जाते आपणास या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन आपला अर्ज दाखल करू शकता

आपणास काही अडचण असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट किंवा ईमेल द्वारे कळवू शकता आपल्या समस्येचे निराकरण करण्यात येईल

वारंवार विचारली जाणारी प्रश्न

 1. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे ?
 • प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मध्ये पारंपारिक लघु सूक्ष्म व मध्यम व्यावसायिकांना प्रशिक्षण साहित्य व आर्थिक मदत देणारी योजना आहे
2. पीएम विश्वकर्मा लोन कसे घ्यावे ?
 • विश्वकर्मा लोन घेण्यासाठी आपणास ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे
3. विश्वकर्मा योजना 2023 काय आहे ?
 • विश्वकर्मा योजना सुषमा लघु व मध्यम व्यवसायिकांना आर्थिक लाभ देण्यासाठी निर्माण केलेले आहे .
6. विश्वकर्मा लोन परतफेड कालावधी किती आहे ?  4. पीएम विश्वकर्मा अंतर्गत किती लोन मिळते ?
 • पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयापर्यंत व दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयापर्यंत लोन मिळते
5.पहले चरण में एक लाख रुपये तक और दूसरे चरण में दो लाख रुपये तक का लोन मिलता है
 • पाच टक्के व्याज आकारले जाते.
6. विश्वकर्मा लोन परतफेड कालावधी किती आहे ?
 • एक लाख रुपये साठी 18 महिने व दोन लाख रुपयासाठी 36 महिने कालावधी परतफेड साठी मिळतो