सरकारी योजनांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी राज्यात नेमणार 5000 योजनादूत 

महाराष्ट्र राज्य सरकार कडून प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये 1 व शहरी भागासाठी प्रती 5000 लोकसंख्ये मागे 1 या प्रमाणात एक योजनादूत नेमला जाणार आहे

योजना दूत यांना प्रती महिना 10000 रुपये मानधन देण्यात येणार आहे.

या पदासाठी अर्जदार व्यक्ति हा पदवीधर असणे आवश्यक आहे

अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे. अर्ज करण्यासाठी शासनाच्या रोजगार पोर्टल वर अर्ज करावा लागणार आहे. 

या पदासाठी अर्जदाराकडे मोबाइल व संगणक चलवण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे.

नियुक्ती झालेल्या योजनादूत यांना आपल्या भागातील सर्वसामान्य नागरिकांना सरकारी योजनांची माहिती व लाभ मिळवण्यास मदत करावी लागणार आहे

योजनादूत पदासाठी कसल्याही प्रकारची परीक्षा किंवा चाचणी घेतली जाणार नाही या मध्ये ज्या अर्जदाराचे शिक्षण जास्त असेल त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे