तीव्र उन्हामुळे फळांची गुणवत्ता घसरते, आणि दरही कमी मिळतो. ज्या मुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होते.
फळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर
क्रॉप कव्हरने पेरू, डाळिंब, द्राक्षे अशा फळांची चकाकी आणि गुणवत्ता वाढते.
ऊन रोग आणि धूळ या पासून संरक्षण झाल्यामुळे फळांची गुणवत्ता सुधारते. गुणवत्तेमुळे फळांना बाजारात अधिक दर मिळतो.
क्रॉप कव्हरमुळे पिकांवर हवामानातील हानिकारक घटकांचा प्रभाव पडत नाही.
फळांवर येणाऱ्या रोगांचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे उत्पादन टिकाऊ होते. शेतकऱ्यांच्या पिकाला बाजारात अधिक मागणी मिळते.
क्रॉप कव्हर वापरण्यापूर्वी आणि नंतरच्या उत्पन्नात मोठा फरक शेतकऱ्यांनी अनुभवला आहे.
शेतकऱ्यांचे अनुभव काय सांगतात?