पिक विमा योजने अंतर्गत खरीप हंगामातील 2023 मधील झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने पिक विम्याची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.

सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाईसाठी 1927 कोटी रुपये

पिक विमा ही योजना राज्यामध्ये बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येते. म्हणजे ज्या ठिकाणी पिक विमा हप्त्याच्या 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाई झालेली आहे.

Title 2

अशा ठिकाणी 110% पर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देत आहे. त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देत आहे.

खरीप हंगामातील 2023 मधील मंजूर 7,621 कोटी रुपयांपैकी विमा कंपनी मार्फत 5469 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या अगोदर जमा करण्यात आलेले असून

आता उर्वरित शिल्लक नुकसान भरपाई पैकी 1927 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्यामध्ये विलंब होत आहे.

आता ही रक्कम मंजूर झालेली आहे आणि वितरण करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे

याबाबत 30 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

पीक विमा वाटप साठी कोणते आहेत सहा जिल्हे याची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.