महसूल विभागाचा मोठा निर्णय राज्यात राबवणार जिवंत सातबारा मोहीम

मोहीमेचा उद्देश – मयत शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या जमिनी वारसांच्या नावावर करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.

आरंभ तारीख – जिवंत सातबारा मोहीम १ एप्रिल २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होईल.

वारसांसाठी फायदे – जमिनीच्या व्यवहारांमध्ये अडथळे येणार नाहीत, तसेच कर्ज व कायदेशीर प्रक्रियांना गती मिळेल.

शुल्क नाही – शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना नाव बदलण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

शुल्क नाही – शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना नाव बदलण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

महसूल विभागाची भूमिका – महसूल अधिकारी (तलाठी) गावोगावी चावडी वाचन करून मयत शेतकऱ्यांची नावे जाहीर करतील.

महसूल विभागाची भूमिका – महसूल अधिकारी (तलाठी) गावोगावी चावडी वाचन करून मयत शेतकऱ्यांची नावे जाहीर करतील.

अर्ज करण्याची प्रक्रिया– वारसदारांनी आवश्यक कागदपत्रांसह तलाठी किंवा महसूल अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा.

अर्ज करण्याची प्रक्रिया– वारसदारांनी आवश्यक कागदपत्रांसह तलाठी किंवा महसूल अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा.

आवश्यक कागदपत्रे – मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, सातबारा उतारा, आधार कार्ड, रहिवास प्रमाणपत्र आणि शपथपत्र.

ई-फेरफार प्रणाली – सर्व अर्ज आणि कागदपत्रे ई-फेरफार प्रणालीवर तपासली जातील व त्यानंतर वारसांचे नाव सातबारावर नोंदवले जाईल

जलद कार्यवाही – शासनाच्या या मोहिमेमुळे वारस हक्काची नोंदणी लवकर होईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर हक्क मिळेल.

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा– ही मोहीम शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांच्या जमिनीवर कायदेशीर हक्क मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.