राज्यातील महिलांना आनंदाची बातमी आहे . 

महिलांच्या बँक खात्यावर तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत.

ज्या महिलांना ऑगस्ट मध्ये पैसे मिळाले होते त्या महिलांना आता पुढील हप्ता 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत.

ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात पैसे मिळाले नाही त्या महिलांना 4500 रुपये जमा करण्यात आले आहेत.

ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये उशिरा अर्ज केला आहे त्या महिलांना अजून पैसे जमा झाले नाहीत.

ज्या महिलांचे अर्ज मंजूर होऊन देखील पैसे मिळाले नाही अश्या महिलांनी आपले बँक खाते आपल्या आधार सोबत लिंक करणे आवश्यक आहे.

आपले आधार लिंक खाते कोणते आहे हे तपासण्यासाठी npci org. in या संकेतस्थळाला भेट द्या.

ज्या महिलांचे आधार लिंक बँक खाते आहे त्या सर्व महिलांचे पैसे जमा करण्यात आले आहेत.

लाडकी बहीण योजना अंतर्गत अधिक माहितीसाठी 181 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.