लाडकी बहीण दिवाळी भेट माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 10 ऑक्टोंबर  पूर्वी म्हणजेच आज पासून 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या प्रत्येक महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली होती.

या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून अर्ज करण्यास सुरू केले अर्ज केल्यानंतर पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून रक्कम जमा करण्यात आली.

आतापर्यंत माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 4500 रुपये जमा करण्यात आले

ज्या महिलांनी पहिला हप्त्याचा लाभ घेतलेला होता अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 जमा करण्यात आले होते.

आता पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे असे मिळून 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात झालेली.

पैसे पात्र असणाऱ्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन ते तीन दिवसांमध्ये 3 हजार रुपये जमा होतील

ज्या महिलांना आता पर्यन्त कसलाही लाभ मिळाला नाही अश्या पात्र असणाऱ्या महिलांना देखील ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे.