मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्ग हजारो महिला या योजनेचा लाभ घेत असताना

दुसरीकडे याच योजनेअंतर्गत सरकारची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.

महिला असल्याचे भासवून पुरुषानेच लाडक्या बहिणी योजनेचे पैसे लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.

असा प्रकार नवी मुंबईतून समोर आलेला होता. त्यानंतर असाच एक प्रकार नांदेड मधील हदगाव तालुक्यातील मनाठा या गावात असाच एक प्रकार समोर आलेला आहे.

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत गैरफायदा करणाऱ्यांच्या विरोधात सरकारने आता कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे. या संदर्भातील माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

स्थानिक प्रशासनाच्या हा गैरप्रकार लक्षात आलेला आहे. यासंबंधी चौकशीसाठी सर्व अधिकारी तिथे गेले आहेत. तसेच संबंधित 37-38 खात्यातील बँकांमध्ये संपर्क साधून ही खाती बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत.

या बँक खात्यात इथून पुढे कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ किंवा कोणत्याही शासकीय व्यवहार होऊ नये