शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी  अत्यंत महत्वाचे कागदपत्रे म्हणजे सात बारा. आपल्या जमिनीचा हक्क सिद्ध  करण्यासाठी आवश्यक कागदपत्र.

फोटो सौजन्य;- .landeed.com

बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना विविध कामासाठी जुन्या सातबाराची आवश्यकता भासते. अश्या वेळी सातबारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना विविध अडचणी निर्माण होतात.

जुन्या सातबारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. कार्यालयातून शेतकऱ्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळत नाही.  

कार्यालयात हेलपाटे मारून शेतकऱ्याचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो. तसेच शेतकऱ्यांना कागदपत्राची पूर्तता देखील होत नाही. ज्या शेतकऱ्याची मानसिक स्थिति देखील बिगाडते.

शेतकऱ्यांच्या याच अडचणीचा विचार करत राज्य सरकार ने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. राज्य सरकार कडून शेतकऱ्यांना जुन्या सातबारा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातात.

या निर्णनायच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जुन्या सातबारा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येतात. सध्या फक्त 19 जिल्हा साठी ही सुविधा उपलब्ध आहे. बाकीच्या जिल्ह्यात लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील. 

या जुन्या सातबारा डाउनलोड करण्याची प्रक्रिया सध्या  ही सुविधा सध्या फक्त राज्यातील 19 जिल्ह्यात सरू करण्यात आली आहे.

जुन्या सात बारा ऑनलाइन पद्धतीने पाहण्यासाठी आपणास https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या संकेतस्थळावर जावे लागेल. 

या पोर्टल वर आपल्याला जुन्या सातबारा पाहायला व डाउनलोड करायला पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या संकेत स्थळावरून आपण आपली सात बारा ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करू शकतात.