शासन फक्त माती रॉयल्टीमुक्त करत असून, शेतकऱ्यांना वाहतूक व टाकण्याचा खर्च स्वतः करावा लागणार आहे.
मातीचा पोत सुधारण्यासाठी वापरली जाणारी माती म्हणजे नक्की काय आणि ती शेतात का टाकतात?
गाळ खडकांचे विघटन, हवामानाचा प्रभाव आणि खनिजांच्या प्रक्रियेमुळे तयार होतो. त्यात पोषक घटक भरपूर असतात.
शेतात गाळ टाकण्यासाठी सरकार आता कोणतीही रॉयल्टी आकारात नाही त्या मुळे शेतकऱ्यांना मोफत गाळ उपलब्ध होणार आहे
सेंद्रिय घटक, खनिजे आणि पोषणद्रव्यांमुळे जमिनीची सुपीकता मोठ्या प्रमाणात वाढते.
गाळाच्या वापरामुळे जमिनीत ओलावा टिकतो, यामुळे सिंचनाचा खर्च कमी होतो.
रासायनिक खतांची गरज कमी होते! नैसर्गिक खतांची साथ गाळ वापरल्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी करता येतो, कारण गाळात नैसर्गिक पोषणद्रव्ये असतात.
गाळामुळे उत्पादनक्षमतेत वाढ होते, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढते.
गाळ टाकल्यामुळे पूर्वी शेतीसाठी अयोग्य असलेली जमीन लागवडीसाठी तयार होते.