प्रयत्न अर्थी परमेश्वर या म्हणी प्रमाणे सूरज चव्हाण ला मिळाले यश बिग बॉस मराठी च्या ५ व्या सीझन मध्ये सूरज चव्हाण विजयी !

अनेक आठवड्यांच्या तीव्र नाट्य, आव्हाने आणि अविस्मरणीय आठवणींनंतर  अखेर बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन संपला असून सूरज चव्हाणने विजेतेपदाची ट्रॉफी उचलली आहे

रितेश देशमुख प्रस्तुत करत असलेल्या या शोचा मोठा विजयी कार्यक्रम ६ ऑक्टोबर ला पार पडला.

अभिजीत सावंत फर्स्ट रनरअप आणि निक्की तांबोळी सेकंड रनरअप ठरली. धनंजय पोवार चौथ्या, अंकिता वालावलकर पाचव्या आणि जान्हवी किल्लेकर सहाव्या स्थानावर राहिले आहेत.

या विजयासह सूरज चव्हाणने बिग बॉस मराठी सीझन ५ ची ट्रॉफी  तर जिंकलीच, शिवाय १४.६ लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि १० लाख रुपयांचे दागिने ही जिंकले

रितेश देशमुख ग्रँड फिनाले होस्ट करण्यासाठी लंडनहून एक दिवसासाठी मुंबईत परतला

सुरज चव्हाण एक अतिशय लोकप्रिय टिक टॉक स्टार ज्याने आपल्या कला आणि हास्यापद व्यक्तिरेखेने लाखो मने जिंकली आहेत.

TikTok वर उत्साहवर्धक प्रतिसाद मिळवला. त्याच्या अनोख्या डान्स स्टेप्स, कॉमेडी स्किट्स आणि ग्रामीण भागातील लाइफस्टाइल व्हिडीओजमुळे त्याचे नाव लोकप्रिय झाले.

च्या सामग्रीद्वारे लोक त्याच्याशी जोडले जातात. सगळ्यात गाजलेला डायलॉग म्हणजे गोलीगत