संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना

राज्यामधील ऊसतोड कामगार, वाहतूकदार, आणि मुकादम इत्यादींसाठी

संत भगवान बाबा ऊसतोड कामगार विमा योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे

या योजनेअंतर्गत राज्यांमधील दहा लाख ऊसतोड कामगार वाहतूक कामगार, आणि मुकादम तसेच दीड ते दोन लाख बैल जोड्या त्याबरोबरच कामगारांच्या झोपड्या यांना सुद्धा विमा निर्णय लागू

या योजनेचा संपूर्ण खर्च स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या भांडवलातून करण्यात येणार आहे.

ऊस तोड कामगार कल्याण महामंडळ उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित करून घेत धनंजय श्री मुंडे यांनी या महामंडळाला मुख्य स्वरूप दिले आहे

ऊस तोड कामगारांची प्रथमच ऊसतोड कामगार म्हणून नोंदणी करण्यात आली आहे

साखर कारखाना व त्याच्या समप्रमाणात निधी शासनाकडून अशी कायमस्वरूपी निधीची व्यवस्था करण्यात आली आहे.