राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. राज्यात आता परतीचा मान्सून सक्रिय झाला आहे.

राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे

मराठवाडा तसेच विदर्भात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट तसेच जोराचा पाऊस राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील नदीकाठच्या गावांना तसेच शहरांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे

मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे 

दरम्यान राज्यांमधील विविध भागात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून काही भागांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे

त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.