सरकार कडून शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी पीक विमा योजना आमलात आणली.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढता येतो.

पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी आपले पीक नुकसानीची तक्रार कंपनीकडे करणे आवश्यक आहे

जर शेतकऱ्यांनी पीक नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत पीक नुकसान तक्रार दाखल केली नाही तर त्या शेतकऱ्याला कंपनीकडून कसल्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जात नाही.

बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की पीक विम्याची पूर्व सूचना किती वेळा देता येते ?

पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार शेतकऱ्यांना  तक्रारी करता येतात.

केंद्र सरकारने मार्च 2024 मध्ये एक परिपत्रक जाहीर केलं पीक विम्याची तक्रार एकदा केल्यानंतर शंभर टक्के संरक्षित रकमेतील जी रक्कम असेल ती रक्कम ग्राह्य धरण्यात येईल

जर शेतकऱ्यांचे पहिल्या पेक्षा जास्त प्रमाणात नुकसान झाले असेल तर शेतकऱ्यांनी परत तक्रार करावी असेही आव्हान