crop insurance पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी आपले पीक नुकसानीची तक्रार कंपनीकडे करणे आवश्यक आहे. जर शेतकऱ्यांनी पीक नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत पीक नुकसान तक्रार दाखल केली नाही तर त्या शेतकऱ्याला कंपनीकडून कसल्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे पिकाची नुकसान झाल्याची तक्रार करणे आवश्यक आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की पीक विम्याची पूर्व सूचना किती वेळा देता येते ? किंवा परत पूर्व सूचना दिली तर त्याचा फायदा होतो का ? या प्रश्नाचे उत्तर आणि आपल्या मनातील शंका आजच्या या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.
crop insurance पीक विमा पूर्वसूचना का द्यावी लागते.
crop insurance शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घेतलेल्या पिकाचे इन्शुरन्स म्हणजेच विमा काढलेला असतो तो विमा म्हणजेच पिक विमा. जर नैसर्गिक आपत्तीने किंवा अन्य काही कारणाने पिकाचे नुकसान झाले तर त्या नुकसानीची पूर्व सूचना कंपनीला देणे आवश्यक असते. मग ही पूर्व सूचना कंपनीला का द्यावी लागते, याबाबत बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांनी कंपनीला आपल्या पिकाचे कोणत्या कारणामुळे नुकसान झाले आहे याबाबतच्या तपशील सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार कंपनीचे प्रतिनिधी आपल्या शेतात येऊन आपल्या पिकाची पाहणी करतात व आपल्या पिकाचे किती नुकसान झाले आहे याचे मूल्यांकन करतात.
crop insurance पीक विमा प्रतिनिधि यांनी केलेल्या मूल्यांकणानुसार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नुकसान झाले याची पूर्व सूचना कंपनीला नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत कळवणे आवश्यक असते. ज्यामध्ये ॲपच्या माध्यमातून तसेच कंपनीच्या टोल फ्री क्रमांक च्या माध्यमातून आणि विमा कंपनी संबंधित कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने अर्ज देऊन देखील आपण आपल्या पिकाची नुकसान झाल्याची तक्रार करू शकतात.
पिक विमा तक्रार किती वेळा करता येते.
पिकांचे नुकसान कोणत्या स्थितीत झाले यानुसार शेतकऱ्यांना परत पिक विमा तक्रार करता येते, यामध्ये पीक पेरणी, पीक वाढीच्या अवस्था आणि पीक काढण्याची परिस्थिती या तीन घटकांमध्ये शेतकऱ्यांचे crop insurance पीक नुकसान झाल्यास त्यानुसार वेगवेगळ्या तक्रारी करता येतात परंतु यावर्षी नव्याने कंपनीकडून असं शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे की यावर्षी फक्त शेतकऱ्यांना एकदाच तक्रार करता येणार आहेत. तसा शासनाचा नियम आला आहे या नियमानुसार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एकदाच तक्रार करता येते असे कंपनीकडून शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे.
हे वाचा : पीक विमा नुकसान तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया
पिक विमा तक्रार किती वेळा करता येते काय सांगतो नियम
crop insurance केंद्र सरकारने मार्च 2024 मध्ये एक परिपत्रक जाहीर केलं. या परिपत्रकामध्ये पिक विमा पूर्वसूचनेबाबत नियमांमध्ये बदल केल्याचे सांगण्यात आले. यामध्ये सरकारकडून असे सांगण्यात आले की पीक विम्याची तक्रार एकदा केल्यानंतर शंभर टक्के संरक्षित रकमेतील जी रक्कम असेल ती रक्कम ग्राह्य धरण्यात येईल याआधी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार वेगवेगळी रक्कम ठरवण्यात येत होती. ज्यामध्ये पीक पेरणी झाल्यानंतर थोड्या प्रमाणात रक्कम त्यानंतर वाढीव अवस्थेमध्ये त्यापेक्षा जास्त रक्कम आणि शेवटी काढणी अवस्थेमध्ये शंभर टक्के रक्कम. या प्रमाणात वितरण केले जात होते. परंतु मार्च 2024 मध्ये काढलेल्या अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पिकाचे नुकसान झाल्यास त्या पिकाची नुकसान भरपाईसाठी शंभर टक्के निधी वाटप करण्यात यावा याबद्दलची आधी सूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची कोणत्याही परिस्थितीमध्ये एकदा जरी तक्रार दाखल केली तरी त्यांना मिळणारी रक्कम ही सारखीच असेल.
crop insurance कृषी विभागाने काय सांगीतले
पिक विमा परत तक्रार देण्याबाबत कृषी विभागाला विचारणा केली असता कृषी विभागाने देखील तक्रार करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले; परंतु जर शेतकऱ्यांचे पहिल्या पेक्षा जास्त प्रमाणात नुकसान झाले असेल तर शेतकऱ्यांनी परत तक्रार करावी असेही आव्हान त्यांच्याकडून करण्यात आले आहे. यामध्ये कृषी विभागाने सांगितले की शेतकऱ्यांना नवीन नियमावली नुसार त्यांच्या भागातील 25% शेतकऱ्यांनी पीक नुकसान तक्रारी दाखल केल्या तर त्या मंडळामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्याचा वैयक्तिक पंचनामा न करता मंडळामध्ये 30 टक्के शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्या पंचनामाच्या आधारे त्या मंडळाला सरासरी नुसार पिक विमा वाटप केला जातो. त्यामुळे विमा प्रतिनिधी कडून जर तुम्हाला पिक विमा जास्त मिळवून देतो याकरिता पैसे मागितले जात असतील तर अशा भूल थापांना बळी पडू नका. कारण पिक विमा देताना कंपनी 25 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास रँडम सर्वे करते. रँडम सर्वे नुसार तक्रारी प्राप्त झालेल्या सर्व शेतकऱ्यांना त्या सरासरी नुसार पिक विमा वाटप केला जातो.
शेतकऱ्यांनी परत तक्रार करावी का?
crop insurance या वरी दिलेल्या माहितीच्या आधारे जर आपण पाहिलं तर नवीन नियमानुसार आपण कोणत्याही परिस्थितीत पिकाची तक्रार केली तरी आपल्याला शंभर टक्के निधी वितरित करण्याचा आदेश शासनाने दिलेला आहे. परंतु बऱ्याच वेळा विमा प्रतिनिधीकडून आपलं नुकसान 100% दाखवलं जात नाही किंवा आपलं नुकसान 100% झालेलं नसतं; त्यामध्ये पहिल्यांदा आपण केलेल्या तक्रारीमध्ये ज्या प्रमाणात आपले नुकसान झाले आहे त्यापेक्षा जास्त नुकसान दुसऱ्या नैसर्गिक आपत्ती किंवा अन्यकारणाने नुकसान झाले असल्यास आपण परत तक्रार करावी जेणेकरून आपल्या पिकाची जास्त झालेले नुकसान ची भरपाई आपल्याला मिळेल. त्या मुळे शेतकरी आपल्या पिकाचे कोणत्याही अवस्थेत नुकसान झाले तरी त्याची तक्रार कंपनी कडे सादर करू शकतात.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.