Dearness Allowance केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक घडामोडीत, केंद्र सरकार महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. ही वाढ लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. विशेषत : देशातील वाढत्या महागाईचा दर लक्षात घेता , ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.
नवरात्री पूर्वी Dearness Allowance वाढ
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये केंद्र सरकारचे कर्मचारी महागाई भत्त्यात Dearness Allowance वाढ होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. गेल्या वर्षी प्रमाणेच याही वर्षी त्यांची अशा पूर्ण होताना दिसत आहे .7 व्या वेतन आयोगानुसार ही वाढ वर्षातून दोनदा केली जाते. यावर्षी केली जाणारी वाढ तर फक्त लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना नाहीतर पेन्शनधारकांनाही खूप फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे ही वाढ नवरात्रीपूर्वी जाहीर होण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे
हे वाचा : कृषि योजना मेळावे
महागाई भत्त्यात अपेक्षित वाढ
Dearness Allowance सरकार , महागाई भत्त्यात 3% वाढ होण्याची शक्यता आहे. असा अंदाज जानेवारी ते जून 2024 या कालावधीतील AICPI lW (ऑल- इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स ) निर्देशांक डेटा वर आधारित आहे. जून महिन्यात या निर्देशांकात 1.5 अंकांची वाढ दिसून आली, यामुळे जुलै 2024 पासून कर्मचाऱ्यांना 3% अतिरिक्त डीए देण्याचा निर्णय घेण्यात आला असे समजले जाते.
या महिन्यामध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. DA वाढवण्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबर महिन्याच्या पगारा सोबत नवीन महागाई भत्ता दिला जाणार आहे. डीए वाढवण्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर महागाई भत्ता 53% पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, जे कर्मचाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणारा परिणाम
कर्मचाऱ्यांच्या पगारावर महागाई भत्त्यात होणाऱ्या 3% वाढीचा परिणाम. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्यांची पगार 50,000 रुपये आहे, तर त्या कर्मचाऱ्यांचे उत्पन्न अंदाजे 1,500 रुपयांनी वाढेल. आणि वर्षभरात ती 18,000 रुपयापर्यंत पोहोचू शकते. या वाढीमुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे महागाईच्या काळामध्ये या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
पेन्शन धारकांसाठी फायदा
ही वाढ फक्त कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर पेन्शन धारकांसाठी पण आहे. याचा पेन्शनधारकांना पण फायदा होणार आहे. पेन्शन धारकांना त्यांच्या महिन्याच्या पेन्शनमध्ये समान प्रमाणात वाढ होईल . विशेष म्हणजे याचा फायदा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण की त्यांना वाढत्या वैद्यकीय खर्चासह आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते.
केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्याची तयारी केली लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारका साठी मोठी दिलासा देणारे आहे. यामुळे यांना वाढत्या महागाईचा भार कमी होण्यास मदत होईल. सध्या तरी महागाई भत्त्यात (DA) वाढीची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी , नवरात्रीपूर्वी ही आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.