पीक विमा नुकसान तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया pik vima claim

पीक विमा नुकसान तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया pik vima claim

शेती पिकाला नेहमीच निसर्गाची साथ हवी असते. निसर्गाने जर साथ नाही दिली तर हाता तोंडाशी आलेले पीक नष्ट होते. यातून शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागते.या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून आपण पिकाचा विमा भरतो. आपल्या पीक नुकसान झालेल्या परिस्थितीत आपण आपल्या पीक विमा कंपनी कडे आपली तक्रार नोंद करणे आवश्यक असते. आपण पीक विमा नुकसान तक्रार नोंदवली तरच आपल्या पिकाची इन्शुरेंस कंपनि कडून पंचनामा करून आपल्या नुकसान झालेल्या पिकाची आपणास भरपाई दिली जाते.

   देशात नेहमीच विविध भागात जास्त पाऊस ,वादळी वारा, पुर, गारपीठ , पावसाचा खंड, इतर नैसर्गिक संकट शेती पिकावर आपणास पाहायला मिळते. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी म्हणून पीक विमा ही योजना राबवण्यात येत आहे. पीक पेरणी पासून ते पीक काढणी पर्यन्त होणाऱ्या नुकसानीची भरपाई दिली जाते.  नैसर्गिक आपत्ति मुळे पिकाचे झालेले नुकसानीची माहिती 72 तासाच्या आत पीक विमा कंपनीला देणे आवश्यक आहे. या लेखात आपण पीक विमा नुकसान तक्रार कशी नोंद करावी या विषयी संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पीक विमा नुकसान तक्रार

पीक विमा नुकसान तक्रार नोंदवण्याच्या दोन पद्धती आहेत.

  1. ऑनलाइन
  2. ऑफलाइन

या शिवाय आपल्या जिल्ह्याला जी इन्शुरेंस कंपनी दिलेली आहे त्या कंपनीच्या टोल फ्री नंबर वर संपर्क साधून  किंवा त्या कंपनीला ईमेल करून देखील आपण आपली तक्रार नोंदवू शकतात.

1) पीक विमा नुकसान तक्रार ऑनलाइन प्रक्रिया

पीक विमा नुकसान तक्रार ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्यासाठी आपण आपल्या मोबाइल मधील गुगल प्ले स्टोअर वर जाऊन क्रॉप इन्शुरन्स CROP INSURANCE हे ॲप  डाउनलोड करा. ॲप  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती कशी भरावी या बद्दल विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.        

ॲप डाउनलोड केल्यानंतर ओपन करा. व नोंदणी शिवाय चालू ठेवा हा पर्याय निवड करा.  त्या मध्ये आपणास दोन पर्याय दिसतील. 1 crop loss intimation 2 crop loss status या पैकी पहिला पर्याय निवडून आपला मोबाइल नंबर भरा. आपल्या मोबाइल नंबर वर आलेला ओटिपी भरा. त्या नंतर आपल्या पिकाचे हंगाम निवड करा खरीप / रब्बी . त्या खालील टॅब मध्ये वर्ष निवडा. त्या खालील टॅब मध्ये scheme निवडा . त्या खालील टॅब मध्ये आपले राज्य निवड करा. त्या नंतर सिलेक्ट पर्याय निवडा.

तुम्ही कोणत्या माध्यमातून विमा भरला तो माध्यम निवडा. आपला अॅप्लिकेशन नंबर भरा . done पर्याय वर क्लिक करा. आपल्याला ज्या पिकाची तक्रार नोंद करायची आहे ते पीक निवड करा. नुकसणीचे कारण निवडा.पिकाची नुकसानीच्या वेळेची अवस्था निवडा. नुकसान कधी झाले त्याची तारीख निवडा. नुकसानीची टक्केवारी भरा. आपल्या नुकसान झालेल्या पिकाचा फोटो घ्या. सबमिट या पर्यायावर क्लिक करा. आपल्या समोर येणाऱ्या docket नंबर चा स्क्रीन शॉट काडून ठेवा.

1) पीक विमा नुकसान तक्रार ऑफलाइन प्रक्रिया

ऑफलाइन पीक विमा नुकसान तक्रार करण्यासाठी आपण आपल्या कृषि सहाय्यक ,तलाठी , कृषि अधिकारी , विमा कंपनी अधिकारी , विमा कंपनी टोल फ्री क्रमांक किंवा ईमेल या सर्व मार्गाचा अवलंब करून आपण आपल्या पीक विमा नुकसान तक्रार कंपनीकडे दाखल करू शकतात.     

3 thoughts on “पीक विमा नुकसान तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया pik vima claim”

  1. Pingback: ई पीक पाहणी 2024 – कशी नोंदवावी – marathitantradnyanmahiti.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *