बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना लाभ

      स्त्री भ्रूण हत्या हा आपल्या देशाचा खूपच चिंताजनक विषय बनला आहे. यावर सरकारने कार्यवाही करून बराच बदल घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण आजही स्त्री भ्रूण हत्या पूर्ण पणे थांबलेल्या नाहीत. या साठी सरकारकडून उपाययोजना म्हणून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. त्यातील एक अत्यंत चांगली योजना बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना लाभ. या योजनेच्या माध्यमातून स्त्री भ्रूण हत्या पूर्ण बंद करण्याचा सरकारचा पूर्ण प्रयत्न आहे. मुलींना वाचवण्यासाठी व त्यांना स्वावलंबी सक्षम बनवण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना राबवण्यात आलेली आहे. आपण या लेखात बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना लाभ, अर्ज प्रक्रिया , पात्रता , आवश्यक कागदपत्रे या सर्व घटकाची सविस्तर माहिती घेणार आहोत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना लाभ

योजनेचे नाव . 

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना .

योजना कोणी सुरू केली .

भारत केंद्र सरकार ने .

योजना कधी सुरू केली.

22 जानेवारी 2015 .

लाभार्थी

भारतीय रहिवाशी असलेल्या मुली .

उदिष्ट

भारत देशातील लिंग गुंणोत्तर सुधारणे .

अधिकृत वेबसाइट

https://wcd.nic.in/bbbp-schemes

योजनेचे वैशिष्ट

योजना पूर्ण भारत भर राबवली जाते .

योजनेचा उद्देश

  • बेटी बचावो बेटी पढाओ योजने चा मुख्य उद्देश लिंग गुंणोत्तर सुधारणे
  • स्त्री भ्रूण हत्या पूर्ण पणे रोखणे.
  • देशातील नागरिकांचा मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलणे.
  • मुलींच्या उच्च शिक्षणासाठी त्यांच्या पालकांना प्रोस्थाहित करणे .
  • मुलींचे भविष्य उज्ज्वल करून त्यांना स्वावलंबी बनवणे .
  • मुली आणि मुले यांच्या मध्ये समानता निर्माण करणे या योजनेचा उद्देश आहे .
  • मुलींना सुरक्षितता प्रदान करणे .

बेटी बचाव बेटी बेटी पढावो योजनेचे वैशिष्ट

  • बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना 22 जानेवारी 2015 रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सरू केली.
  • या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते त्यांच्या उच्च शिक्षणा पर्यंत विशेष लाभ दिले जातील .
  • लिंग गुंणोत्तर सुधारण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले जाईल .
  • या योजनेअंतर्गत स्त्री भ्रूण हत्या पूर्ण पणे थांबवण्यात येणार आहेत .
  • या योजनेअंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी विविध सवलती दिल्या जातात.
  • ही योजना पूर्ण भारत भर सुरू आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून मुलीचे जीवनमान उंचावेल व मुलीचे भविष्य सक्षम होतील.

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना लाभ पात्रता

     कोणत्याही योजनेमध्ये अर्ज करायचा असल्यास त्या योजनेच्या पात्रता लक्षात घेणे खूप महत्त्वाचे असते. सर्व आवश्यक कागदपत्राची माहिती असणे आवश्यक असते. जेणे करून अर्ज करणे सोपे होते.

  • अर्जदार भारतीय रहिवाशी असणे आवश्यक आहे .
  • अर्ज करण्यासाठी मुलीचे वय हे 10 वर्ष च्या आत असणे आवश्यक आहे .
  • मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी खाते काढणे आवश्यक आहे .
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्र असणे महात्त्वाचे आहे .

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना लाभ आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड (पालकांचे).
  2. पॅन कार्ड (पालकांचे).
  3. ड्रायविंग लायसन्स (पालकांचे).
  4. रहिवाशी प्रमाणपत्र (पालकांचे).
  5. पासपोर्ट साइज फोटो.
  6. मुलींचा जन्म प्रमनपत्र.
  7. मुलीचे आधार कार्ड .
  8. मोबाइल क्रमांक .

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना लाभ अंतर्गत मिळणारी रक्कम

    बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेंतर्गत, मुलीचे खाते उघडल्यानंतर, मुलीचे वय 14 वर्षे पूर्ण होईपर्यंत पालकाला विहित रक्कम जमा करावी लागते. अर्जदार दरमहा रुपये 1000 किंवा थेट वर्षभरात 12000 रुपये जमा करू शकतात. विहित कालावधी. पूर्ण झाल्यानंतर, मुलीच्या खात्यात एकूण 1,68,000 रुपये जमा केले जातील. त्यानंतर, जर मुलीने वयाची २१ वर्षे पूर्ण केल्यानंतर रक्कम काढली तर तिला एकूण ६,०७,१२८ रुपये दिले जातील. जर तुम्ही बँकेत दरवर्षी 1.5 लाख रुपये जमा केले तर 14 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मुलीच्या खात्यात 21 लाख रुपये जमा केले जातील, खात्यातील मॅच्युरिटी रेट पूर्ण झाल्यानंतर मुलीला 72 लाख रुपये दिले जातील.

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना लाभ अर्ज प्रक्रिया

     बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना लाभ योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी दिलेली आहे . खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करून आपण आपला अर्ज सादर करू शकतात.

  • बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना लाभ योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जावे.
  • वर दिलेली आवश्यक कागदपत्रे सोबत घ्यावी लागतील.
  • बँक किंवा पोस्ट ऑफिस मधून आपल्याला बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजने चा अर्ज घ्यावा लागेल .
  • अर्जा मध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी .
  • अर्जा सोबत सर्व आवश्यक सर्व कागदपत्रे जोडावी .
  • आपण भरलेला अर्ज बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावा.

निष्कर्ष

         बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना लाभ या योजनेविषयी सर्व माहिती आपण आज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या योजने अंतर्गत मुलींना उच्च शिक्षणात तसेच त्यांच्या विवाहात आर्थिक मदत केली जाते.

     आपल्या जवळील नातेवाईक मित्र मंडळी यांना या योजने बद्दल माहिती नाही अश्या व्यक्ति पर्यन्त ही माहिती देऊण त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी आपण मदत करावी .

     जवळपास सर्वच माहिती आम्ही आपणास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरेख आपणास काही अडचण असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आम्ही नक्कीच आपली मदत करू.  

5 thoughts on “बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना लाभ”

Leave a comment