राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

        शासनातर्फे एक नवीन योजना राबवण्यात येत आहे ज्या योजनेचे नाव राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना असे आहे. योजने मध्ये जर कुटुंबातील एखादी प्रमुख व्यक्ति स्त्री किंवा पुरुष जर वय वर्ष 18 / 59 मध्ये अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर शासनाकडून मृत्यू पावलेल्या कुटुंबाला एक रकमी 20000 वीस हजार रुपये आर्थिक सहाय्य केले जाते. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीवर त्याच्या कुटुंबियांचे जीवन अवलंबून असते. जर कुटुंबातील कामावती व्यक्ति अचानक मृत्यू पावली तर त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यांच्या उदर निर्वाह करण्यासाठी सरकार कडून त्यांना या संकटावर मात करण्यासाठी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने मार्फत आर्थिक मदत केली जाते. आज आपण या लेखात राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने विषयी लाभार्थी असण्याऱ्या व्यक्तीने कसा अर्ज करावा तसेच आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत या विषयी सर्व माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत,

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा


योजनेचे नाव

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

कोणामार्फत राबवली जाते

महाराष्ट्र शासन

कोणत्या विभागा मार्फत

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र

योजनेचा उद्देश

गरीब कुटुंबाला आर्थिक मदत करणे

लाभार्थी

आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंब

लाभाची रक्कम

20,000 वीस हजार रुपये

अर्ज प्रक्रिया

अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने आहे

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना उद्देश

  • आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबातील कामावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये
  • गरीब असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीचे जीवन सुधारणे
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना आत्मनिर्भर बनवणे
  • कुटुंबातील कमावता व्यक्तीच्या मृत्यू नंतर कुटुंबाला त्यांच्या दैनंदिन गरज भागवता यावी.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे वैशिष्ट

  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबावर दैनंदिन गरजा भागवण्यास कोणतीही अडचण येऊ नये .
  • लाभाची रक्कम DBT मार्फत डायरेक्ट लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यावर जमा केली जाते .
  • योजनेमध्ये लाभ घेणे ही एक सोपी पद्धत आहे.
  • ही योजना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना मार्फत राबवली जाते.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
  • कुटुंबातील कमावता व्यक्ति ( स्त्री/ पुरुष ) याचे वय 18 वर्ष ते 59 वर्ष या मध्ये असावे
  • अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत असावे.
  • कुटुंबातील कामावत्या व्यक्तीने आत्महत्या केलेली नसावी.
  • कुटुंबातील कमावता व्यक्ति फक्त नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झालेली असावी.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
  • मोबाइल क्रमांक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जन्म प्रमाणपत्र
  • बँक पासबूक झेरॉक्स
  • शपथ पत्र
  • मृत्यू प्रमाणपत्र

ही योजना कोणत्या प्रवर्गांसाठी आहे

     या योजनेमध्ये सर्व प्रवर्गातील व्यक्ति अर्ज करू शकतात परंतु अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया

     जे लाभार्थी वरील सर्व नियमात येत असतील त्यांनी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय / तहसील कार्यालय / तलाठी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून राष्ट्रीय कुटुंब योजने मध्ये अर्ज करण्यासाठी अर्ज घ्यावा तो अर्ज अचूक भरावा. अर्जमाधे विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी. अर्जा सोबत वरील सर्व कागदपत्रे जोडावी. त्या नंतर आपला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय / तहसील कार्यालय / तलाठी कार्यालय याच्याकडे जमा करावा. आपला अर्ज जमा केल्यानंतर संबंधित अधिकारी आपल्या कागदपत्राची  तपासणी करून आपल्याला मिळणाऱ्या 20000 वीस हजार रुपये वितरित करतील.

.

अर्ज प्रक्रिया

    जे लाभार्थी वरील सर्व नियमात येत असतील त्यांनी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय / तहसील कार्यालय / तलाठी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून राष्ट्रीय कुटुंब योजने मध्ये अर्ज करण्यासाठी अर्ज घ्यावा तो अर्ज अचूक भरावा. अर्जमाधे विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी. अर्जा सोबत वरील सर्व कागदपत्रे जोडावी. त्या नंतर आपला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय / तहसील कार्यालय / तलाठी कार्यालय याच्याकडे जमा करावा. आपला अर्ज जमा केल्यानंतर संबंधित अधिकारी आपल्या कागदपत्राची  तपासणी करून आपल्याला मिळणाऱ्या 20000 वीस हजार रुपये वितरित करतील.

अर्ज pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .   kutumb arth sahayya PDF

निष्कर्ष

     आम्ही आपल्याला दिलेली सर्व माहिती आपल्याला समजली असेलच जर आपल्याला किंवा आपल्या जवळील एखाद्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळत असेल तर आपण त्यांना ही सर्व माहिती सांगून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करावा. जर आपणास या योजने विषयी आणखी काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला यांच्या ईमेल वर संपर्क साधू शकता. आम्ही आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व माहिती पुरवण्याचा प्रयत्न करू.

वारंवार विचारली जाणारी प्रश्न

  1. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने मध्ये किती रक्कम दिली जाते ?
  • राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने मध्ये 20000 रुपये रक्कम दिली जाते
  1. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना मध्ये मयत व्यक्तीचे वय किती असावे ?
  • राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना मध्ये मयत व्यक्तीचे वय 18 ते 59 वर्ष यामध्ये असावे.
  1. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना मध्ये आत्महत्या केली तर लाभ मिळतो का?
  • राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना मध्ये आत्महत्या केल्यास लाभ मिळत नाही नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू असेल तरच लाभ दिल जातो
  1. दारिद्र्य रेषेखालील कुटुंब यादीत नाव नसेल तर लाभ मिळतो का?
  • नाही जर दारिद्र्य रेषेखालील कुटुंब यादीत नाव नसेल तर त्या कुटुंबाला लाभ मिळणार नाही.
  1. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना मध्ये ऑनलाइन अर्ज करता येतो का ?
  • राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना मध्ये सध्या तरी ऑनलाइन अर्ज करता येत नाही आपल्याला या योजनेचा लाभ घेयचा असल्यास आपणास आपल्या आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय / तहसील कार्यालय / तलाठी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून आपला अर्ज सादर करावा लागेल.