डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

Dr babasaheb ambedkar krushi swavalamban yojana

शेती व्यवसाय वाढीसाठी केंद्र शासन तसेच महाराष्ट्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरावे म्हणून काही ना काही शेती उपयोगी योजना राबवत असते. अश्याच योजनेची सर्व माहिती आपण नेहमीच आपल्या लेखातून देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आज आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना विषयी माहिती घेणार आहोत.

ही योजना प्रामुख्याने अनुसूचित जाती जमातीमधील शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेच्या मध्यमातून अनुसूचित जाती जमीत मधील शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेमधून इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ दिला जात नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना बद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

Dr babasaheb  ambedkar krushi swavalamban yojana

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या योजने अंतर्गत शेतकऱ्याला शेती व्यवसाय वाढी साठी अनेक घटकाला 2,50,000 रुपये पर्यन्त आर्थिक मदत केली जाते. ज्या मुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पादनात चांगली वाढ करू शकतात.

आपल्या राज्यातील बहुतांश शेतकरी वर्ग गरीब असल्याने त्यांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अर्थीक सहाय्यता घेण्यासाठी कर्ज घेणे आवश्यक असते. शेतकरी कर्ज घेऊन तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्यतो टाळतो या वर काहीतरी पर्याय निघावा म्हणून राज्य शासनाकडून डॉ.  बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना राबवण्यास राज्यशासनाकडून राबवण्यात येत आहे आजच्या या लेखात आपण या योजने विषयी अर्ज पात्रता कागदपत्रे या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.

योजनेचे नावडॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
योजना कोणत्या विभागा मार्फत राबवली जातेकृषि विभाग
योजना राबवणारे राज्यमहाराष्ट्र
योजना कधी सुरू झाली2016 साली
किती लाभ दिल जातो2,50,000 पर्यन्त
लाभार्थी कोणमहाराष्ट्रातील अनुसूचित जाती शेतकरी वर्ग
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा उद्देश कायशेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ करणे
Dr babasaheb ambedkar krushi swavalamban yojana

Dr babasaheb ambedkar krushi swavalamban yojana उदिष्ट

  • महाराष्ट्रातील अनुसूचित जाती शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढवून त्यांना स्वावलंबी बनवणे
  • शेती मध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे.
  • तांत्रिक घटकांचा वापर करून शेती उत्पादनात वाढ करणे.
  • राज्यातील अनुसूचित जाती मधील शेकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना शेती उपयोगी वस्तु खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये.
  • राज्यातील शेतकऱ्यांना जलसिंचणा साठी आवश्यक असणाऱ्या घटकांना अनुदान प्रदान करणे.

हे वाचा

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

mahaurja कुसुम सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र – आपण पात्र की अपात्र

Dr babasaheb ambedkar krushi swavalamban yojana अंतर्गत समाविष्ट घटक

  1. नवीन विहीर
  2. जुनी विहीर दुरुस्ती
  3. शेततळे
  4. इनवेल बोअरवेल
  5. पंप संच
  6. वीज जोडणी आकार
  7. ठिबक सिंचन
  8. तुषार सिंचन
  9. पीव्हीसी पाइप लाइन

Dr Babasaheb Ambedkar krushi swavlambanyojna मध्ये इत्यादि घटकसाठी अनुदान दिले जाते.

Dr babasaheb ambedkar krushi swavalamban yojana लाभार्थी पात्रता

  • लाभार्थी अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  • लाभार्थी अर्जदार हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील असावा.
  • लाभार्थी अर्जदार शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 1,50,000 च्या आत असावे.
  • लाभार्थी अर्जदार शेतकऱ्याच्या नावे कमीत कमी 0.40 हेक्टर (1 एकर) जमीन असावी .
  • अर्जदाराचे दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव असेल किंवा अपंग असेल तर प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे

  1. लाभार्थी 7/12 / 8 अ
  2. आधार कार्ड
  3. मोबाइल क्रमांक
  4. उत्पन्न प्रमाणपत्र
  5. पासपोर्ट फोटो
  6. राशन कार्ड
  7. बँक पासबूक (आधार कार्ड संलग्न असावे)
  8. जात प्रमाणपत्र (cast certifacate) SC/ ST

वितरित केले जाणारे अनुदान

घटकदिले जाणारे अनुदान
नवीन विहीर2,5,000 रुपये
       जुनी विहीर दुरुस्ती50,000 रुपये
शेततळे1,00,000 रुपये
         इनवेल बोअरवेल20,000 रुपये
पंप संच20,000 रुपये
वीज जोडणी आकार10,000 रुपये
ठिबक सिंचनएकूण खर्चाच्या 50% पर्यत
तुषार सिंचन25,000 रुपये
पीव्हीसी पाइप लाइन30,000 रुपये

अर्ज प्रक्रिया

Dr babasaheb ambedkar krushi swavalamban yojana मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन आहे.आपण ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज भरू शकता.

  • प्रथम अर्जदाराला अधिकृत https://agriwell.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर जावे लागेल.
  • नवीन यूजर येथे नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करा.
  • आपल्या समोर नवीन नोंदणी फॉर्म उघडेल.
  • नवीन नोंदणी फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहीती व्यवस्थित भरून घ्यावी .
  • रजिस्टर बटनावर क्लिक करावे .
  • तुमचा यूजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • अर्ज या पर्यायावर क्लिक करून
  • तुम्हाला हव्या असणाऱ्या घटकाला निवडावे सर्व माहिती भरून घ्यावी.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • शेवटी तुम्हाला 23.60 रुपये फीस ऑनलाइन भरावी लागेल
  • या पद्धतीने आपला अर्ज आपण सादर करू शकता.

निवड प्रक्रिया

डॉ.  बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजने मध्ये निवड प्रक्रिया सरळ आहे. सर्व प्रथम अपंग व दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या अर्जदारचा विचार केला जातो. त्या नंतर प्रथम अर्ज करणाऱ्यांना प्राधान्य या पद्धतीने लाभार्थी निवड केली जाते.

जर तुमच्या तालुक्यातील कोठयापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले तर जिल्हा परिषद मार्फत लकी ड्रॉ पद्धतीने निवड प्रक्रिया राबवली जाते. व उर्वरित लाभार्थी यांची निवड पुढील टप्प्यात केली जाते.

निष्कर्ष

Dr babasaheb ambedkar krushi swavalamban या योजनेतून अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच शेती साठी आवश्यक असणाऱ्या घटकाला प्रोस्थाहन दिले जाते. त्या मुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजने मध्ये 30000 पासून 2,50,000 पर्यन्त अनुदान वितरित केले जाते. या योजनेमधून महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे जीवनमान नक्कीच सुधारेल.

डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजने मध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया आपणास समजली असेलच. अशी आम्ही आशा करतो. आपल्या जवळील एकाद्या व्यक्तीला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण ही माहिती त्या लोकांपर्यंत पोहोच करावी.

या लेखात दिलेली सर्व माहिती आपणास समजली असेल अशी आम्ही आशा करतो जर आपणास यात काही शंका किंवा अडचण असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्ही नक्कीच आपली मदत करू.

1 thought on “डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना”

Leave a comment