cmrf maharashtra राज्य सरकार व केंद्र सरकारतर्फे जनतेच्या आरोग्यासाठी विविध योजना राबवल्या जातात त्यात एक राज्य सरकार खूप चांगली योजना राबवत आहे ती म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधी. महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना तसेच देशातील अपत्तिग्रस्त नागरिकांना तातडीने सहाय्यता मिळावी या साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही योजना राबविण्यात येते पुर दुष्काळ आगीमुळे होणारे अपघात तसेच आ;रोग्य सेवेतील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत दिली जाते.
योजना नाव | मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना cmrf maharashtra |
योजना कधी सुरू करण्यात आली | २०१४ साली |
कोणाला लाभ मिळेल | महाराष्ट्रातील नागरिकांना |
योजनेचा उद्देश | महाराष्ट्रातील नागरिकांना वैद्यकीय उपचार देणे |
cmrf maharashtra योजनेचा उद्देश
- अपत्तिग्रत व्यक्तींना मदत करणे
- जातीय दंगलीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसाला मदत करणे
- जातीय दंगलीत काही दुखापत झाल्यास मदत दिली जाते
- दंगलीत ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे अशा व्यक्तींना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत देणे
- दहशतवादी हल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींना मदत करणे
- रुग्णांना उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक मदत करणे
- विविध संस्था यांना आर्थिक मदत करणे
- शौक्षणिक आणि वैद्यकीय घटकांना आर्थिक मदत करणे
हे सर्व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत राबवली जातात आजच्या या लेखामध्ये आपन मुख्यमंत्री सहाय्यता निधी बद्दल सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
cmrf maharashtra आवश्यक असणारी कागदपत्रे
- अर्ज
- उपचारासाठी लागणारे खर्चाचे प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र (तहसील कार्यालयाचे)
- रुग्णाचे आधार कार्ड (लहान मुलांसाठी आईचे आधार कार्ड)
- राशन कार्ड
- आजाराचे रिपोर्ट (FIR)
- अपघातग्रस्त असल्यास त्या संबंधी रीपोर्ट
मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधील आजारांचे नावे
- कलियर इम्प्लांट
- हृदय प्रत्यारोपण
- यकृत प्रत्यारोपण
- किडनी प्रत्यारोपण
- बोन मॅरो प्रत्यारोपण
- हिप रीप्लेसमेंट
- कर्क रोग शस्त्रक्रिया
- लहान बालकांच्या शस्त्रक्रिया
- मेंदूचे आजार
- अपघात शत्रक्रिया
- हृदय रोग
- डायलिसिस
- कर्क रोग (केमोथेरपी/रेडीएशन)
- नवजात बालकांचे आजार
- गुडघ्याचे प्रत्यारोपण
- विद्युत अपघात
- बर्न रुग्ण
- फुफ्फुस प्रत्यारोपण
- हाताचे प्रत्यारोपण
अश्या प्रकारच्या विविध आजारावर मुख्यमंत्री सहाय्यता
cmrf maharashtra नोंदणीकृत हॉस्पिटल
- मुख्यमंत्री सहाय्यता अंतर्गत नोंदणी असलेले हॉस्पिटल
- संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ३००० च्या आसपास हॉस्पिटल नोंदणी केलेले आहेत
- आपण आपल्या जवळील तसेच आपल्या उपचार पद्धतीने आपण आपले हॉस्पिटल निवडू शकता
मुख्यमंत्री सहाय्यता अंतर्गत नोंदणी असलेले हॉस्पिटल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा. CMRFHospitalsList
अर्ज प्रक्रिया
आपण https://www.mahacmmrf.com/ या संकेतस्थावर जाऊन आपण ऑनलाइन अर्ज करू शकतात
- सर्व प्रथम आपण https://www.mahacmmrf.com/ या संकेतस्थळावर जा.
- तेथे आपणास वैद्यकीय मदत अर्ज या पर्यायावर क्लिक करा.
- आपल्या समोर एक अर्ज ओपेन होईल .
- सर्व माहिती व्यवस्थित भरून आपला अर्ज सादर करू शकता.
आपण आपला अर्ज ईमेल सुद्धा करू शकता aao.cmrf-mh@gov.in या ईमेल वर आपण आपला अर्ज व सर्व कागदपत्रे PDF मध्ये पाठवू शकतात.
- तसेच आता नव्याने आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधी च्या हेल्प लाइन क्रमांकावर संपर्क साधून देखील लाभ मिळवण्याची प्रक्रिया करू शकता.
अधिक माहिती साठी आपण आपल्या जिल्हा समन्वयक यांच्याची संपर्क करून माहिती मिळवू शकता.
जिल्हा समन्वयक लिस्ट
जिल्हा समन्वयक लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा. District Co-Ordinators – Chief Minister Medical Assistance Cell, Maharashtra
मुख्यमंत्री सहाय्यता निधी फायदे
- महाराष्ट्रातील गरीब नागरिकांना उपचार पद्धतीती मदत होणार
- उपचार दरम्यान रुग्णानी २०००० रुपेये खर्च केल्यास त्याला १०००० रुपये मिळतील.
- उपचार दरम्यान रुग्णानी २०००० ते ४०००० दरम्यान खर्च केल्यास १५००० रुपये मिळतील.
- उपचार दरम्यान रुग्णानी ४०००० ते १००००० दरम्यान खर्च केल्यास एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम दिली जाते.
निष्कर्ष
मुख्यमंत्री सहाय्यता निधी cmrf maharashtra योजना ज्या रुग्णाची आर्थिक परिस्थिति खूप बिकट आहे त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी आर्थिक उत्पन्न नाही अश्या व्यक्तिना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेमधून महाराष्ट्रातील नागरिकांचे आरोग्य विषयी समस्या सोडवण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे .
आपणास किंवा आपल्या जवळील व्यक्ति ज्याना या योजनेचा लाभ मिळण्याची आवश्यकता आहे. अश्या व्यक्ति पर्यन्त आपण ही माहिती त्यांना देऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळवण्यास मदत करावी.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी cmrf maharashtra या बद्दल सर्व माहिती आपणास समजली असेलच जर आपणास काही अडचण असेल किंवा शंका असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही नक्कीच तुमची मदत करू.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
1 thought on “मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना : cmrf maharashtra”