ARTI ची स्थापना अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था

ARTI ची स्थापना annabhau sathe research and training institute

   आज आपण या लेखामध्ये ARTI(annabhau sathe research and training institute) ची स्थापना करण्यात कशी मान्यता मिळाली याविषयी माहिती पाहणार आहोत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

    अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. ARTI ची स्थापना करण्याच्या निर्णयांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश असणाऱ्या मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच आर्थिक संस्कृती व राजकीय असा सर्वांगी विकास होण्यासाठी व अनुसूचित जातीविषय कल्याणकारी धोरणाचा मातंग समाजाच्या व्यक्तींना योग्य प्रमाणात लाभ पोहोचविण्यासाठी या (आर्टी) ची स्थापना करण्याचा निर्णय महाराष्ट राज्य सरकार कडून घेण्यात आला.

सन 2024 – 25 च्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) , पुणे या संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन करण्यात येणार आहे. असा निर्णय 2024 – 25 च्या अंतरीम अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आला. मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत दि. 11/7/2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जाती जमाती अंतर्गत मातंग व तत्सम जाती त्यामध्ये (मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी- मांग, मांग- म्हशी, मदारी, गारुडी, राधे मांग, मांग-गारोडी,मांग- गारुडी, मदगी , मदिगा) या समाजाच्या विकासाकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था(आर्टी) ची स्थापना करण्याचा निर्णय शासनाचा आहे.

ARTI अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था

 या निर्णयाला मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत दि.11/7/2024 रोजी समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी ) या संस्थेची स्थापना करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ही मान्यता मातंग समाजाच्या विकासाकरिता अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था (आर्टी ) या संस्थेची स्थापना, कंपनी नोंदणी कायदा, 2013 अंतर्गत नियम 8 अनव्ये करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सादर संस्थेचे उद्दिष्टे

  •  संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणून समता विचार पिढी चालू ठेवणे आणि विकास करणे.
  • विविध क्षेत्रांमध्ये प्राचलित असलेली सामाजिक समता याविषयी संशोधन करून सामाजिक समता तत्वप्रणाली समाजामध्ये जास्तीत जास्त परिणामकारक कशी होईल याबाबत संशोधन करणे.
  •  सामाजिक समता याविषयी निगडित असे व्यवसायिक ज्ञान तसेच अशा विचारांना देवाण-घेवाण करण्यासाठी तरुण व्यक्तींना सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या ज्ञानामध्ये समाजशास्त्राचा  दृष्टिकोनातून सर्वांगिण वाढ होईल असे प्रशिक्षण देणे.
  •  संस्थेच्या  उद्दिष्टानुसार सुकर शिक्षणक्रम, संमेलन, व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद असे इतर कार्यक्रम आयोजित करण्याचे काम हाती  घेणे
  •  समाजातील विविध स्तरांमध्ये सामाजिक समता या तत्वप्रणाली आधारित सहकार्याच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि त्याबाबत अधिक संशोधन करणे व त्यानुसार अनुभव, विचार व परिवर्तन करणे बाबत समाजामध्ये अधिक
  • चांगले जीवन निर्माण करून सामाजिक समता या कार्यक्रमास उचलून धरणे.
  •  संस्थेच्या उद्दिष्ट अशी संबंधित अशी पुस्तके, नियतकालिके आणि संशोधनात्मक, निबंध प्रकाशित करणे.
  •  शिक्षण, उच्च शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, रोजगार व  स्वयंरोजगार प्रशिक्षण,  स्टार्ट- अप, रोजगार निर्मिती, प्रचार, प्रसार, प्रसिद्ध ,सामाजिक, शैक्षणिक ,आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक विकास करणे व त्याच्याशी निगडित योजना राबविणे.
  •  लोकगीते, लोकसंस्कृती, लोककला संदर्भात संशोधन, प्रशिक्षण, प्रचार, प्रसिद्ध करणे.
  •  परंपरागत व्यवसायांना चालना देणे ,आर्थिक मदत करणे
  • कला कौशल्य  यांचे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषद भरविणे व सहभागी होणे.
  •  अण्णाभाऊ साठे यांच्याशी संबंधित प्रसिद्ध करणे व अप्रकाशित साहित्य प्रसिद्ध करणे आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये भाषांतर करणे.

 

ARTI या संस्थे करिता खालील प्रमाणे पदनिर्मिती करण्यास तत्वत : मान्यता देण्यात येत आहे

 

पदनाम

मंजूर पदे

वेतन श्रेणी

    2

          3

           4

व्यवस्थापकीय संचालक

          1        

S-25-78800-209200

निबंधक

           1

S-15-41800-132300

ARTI या संस्थेअंतर्गत खालील विभाग स्थापना करण्यास मान्यता देण्यात येत आहे

  •  संशोधन विभाग
  •  प्रशिक्षण विभाग
  • योजना विभाग
  • विस्तार व सेवा विभाग
  •  लेखा विभाग
  • आस्थापना विभाग

2 thoughts on “ARTI ची स्थापना अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था”

  1. प्रशिक्षण विभाग या पदा करिता इश्यूक आहे तरी recruitment la tasa अर्ज mail सादर केला आहे

    Reply
  2. सर्व शासकीय योजनांची माहिती पाठवा.

    Reply

Leave a comment

Close Visit Batmya360