शेतामध्ये काम करत असताना शेतकऱ्याचा अपघात होण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. या आपघाता मध्ये बऱ्याच वेळा शेतकरी हा मृत्यू देखील पावतो, तर काही वेळस शेतकऱ्यांना अपंगत्व देखील येते. या अपघाती घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर आर्थिक संकट उद्भवते या संकटावर शेतकरी कुटुंबांची आर्थिक परिस्थिति खालवते या मधून शेतकरी कुटुंबाला आधार देण्यासाठी शासनाकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यात आली आहे. ज्या मध्ये शेतकऱ्याला २,००,००० दोन लाख रुपये लाभ दिला जातो जर कुटुंबातील कोणतीही व्यक्ति अपघाती मृत्यू झाली किंवा अपंगत्व आले तर त्या कुटुंबाला विमा संरक्षण दिली जाते. या लेखात आपण गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या योजनेची सर्व माहिती पाहणार आहोत. त्या साठी आवश्यक माहिती, कागदपत्रे ,अर्ज प्रक्रिया ह्या सर्व घटकाविषयी सविस्तर माहिती पाहुयात.
योजनेचे नाव | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना |
योजना कार्यान्वित राज्य | महाराष्ट्र राज्य |
योजना कोणी सुरू केली | महाराष्ट्र शासन |
विभाग | |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी |
लक्ष / ध्येय | महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला विमा प्रदान करणे |
अर्ज पद्धत | कृषि विभाग मध्ये ऑफलाइन |
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा उद्देश
- राज्यातील सर्व शेतकऱ्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण मिळावे
- शेतकरी कुटुंबातील एखादी व्यक्ति अपंग किंवा मृत्यू मुखी पावल्यास कुटुंबावर आर्थिक संकट येऊ नये.
- योजनेचा लाभ सहज रित्या सर्व शेतकरी वर्गाला मिळावा
- शेतकरी कुटुंबाचे उत्पन्न साधन बंद पडू न देणे .
- विमा लाभ हा कुटुंबातील सर्व सदस्याना दिल जातो.
- कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावर ७/१२ असेल तरी पूर्ण कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकते.
- या योजने मध्ये कुटुंबातील वय वर्ष १० ते ७५ पर्यंतची सर्व सदस्य पात्र आहेत.
- दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीमार्फत योजना राबवली जात आहे .
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा लाभार्थी
- राज्यातील सर्व ७/१२ धारक शेतकरी
- राज्यातील सर्व ७/१२ धारक शेतकऱ्यांचे कुटुंब ज्याचे वय १० ते ७५ दरम्यान आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत समाविष्ट बाबी
- रस्ता / रेल्वे अपघात
- पाण्यात बुडून मृत्यू होणे
- किटकनाशके वापरताना होणारी विषबाधा
- विजेचा शॉक लागल्याने झालेला अपघात
- वीज पडून मृत्यू होणे
- खून
- उंचावरून पडून होणारा अपघात
- सर्पदंश
- विंचू दंश
- नक्षल वादयाकडून झालेली हत्या
- जनावरांच्या खाण्याने / चावण्याने जखमी किंवा मृत्यू होणे
- कुटुंबातील महिलेचा बाळंतपणतील मृत्यू
- दंगल
- अन्य कोणतेही अपघात
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत मिळणार लाभ
- अपघाती मृत्यू झाल्यास २,००,००० दोन लाख रुपये.
- दोन डोळे / दोन हात /दोन पाय गेल्यास २,००,००० दोन लाख रुपये .
- एक डोळा / एक हात / एक पाय गेल्यास १ ,००,००० एक लाख रुपये .
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा नोंदणी साठी प्रक्रिया
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने मध्ये नोंदणी प्रक्रिया ही शासनाद्वारे राबवली जाते. शेतकऱ्याला या नोंदणी साठी कुठे जाण्याची आवश्यकता नाही. शासनाकडून सर्व ७/१२ धारकांचा विमा काढण्यात येतो, ३२.२३ रुपये प्रत्येकी शेतकरी रक्कम शासनाद्वारे विमा कंपनीला भरली जाते.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा आवश्यक कागदपत्रे
- 7/12 उतारा
- दावा अर्ज
- बँक पासबूक झेरॉक्स
- राशन कार्ड झेरॉक्स
- प्रतिज्ञा पत्र
- घटनास्थळ पंचनामा
- पासपोर्ट फोटो
- मृत्यू चा दाखला / अपंगत्वाचा दाखल
- एफ आय आर
- शेतकर्याचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमूना नं ६ क नुसार मंजूर वारसाची नोंद
- शेतकऱ्याचा वयाचा पुरावा (शाळा सोडलेला दाखल / आधार कार्ड )
- आपघातांच्या प्रकारानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे.
वरील सर्व कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्याच्या साक्षांकीत असणे आवश्यक आहे .
अर्ज pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अर्ज
अर्ज कोठे करावा
आपण या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल तर आपण वरील सर्व कागदपत्रे सोबत अर्ज प्रस्ताव घेऊन सर्व माहिती व्यवस्थित भरून आपला अर्ज आपल्या तालुका कृषि अधिकारी यांच्या जवळ जमा करू शकता. अर्ज जमा करण्यासाठी आपल्याला घटना घडल्या पासून पुढे ३० दिवसाच्या आत अर्ज तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे जमा करावा लागतो. संबंधित अधिकारी सर्व कागदपत्राची तपासणी करून लाभ वितरित करतात.
कोणते अपघात लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत
- नैसर्गिक मृत्यू
- योजना सुरू होण्यापूर्वीचे अपंगत्व
- आत्महत्या
- जाणीव पूर्वक स्वतःला जखमी करून घेणे
- कायद्याचे उल्लंघन करताना झालेले अपघात
- नशा करून झालेला अपघात
- मोटार शर्यतीतील अपघात
- युद्ध
- सैन्यातील नोकरी
निष्कर्ष
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने विषयी सर्व माहिती आपणास समजली असेलच आपल्या जवळच्या किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्ति यात पात्र असेल तर आपण त्यांना या विषयी सर्व माहिती देऊन त्यांना सहकार्य करावे.
जर आपणास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने मध्ये काही अडचण किंवा शंका असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता आम्ही आपल्या सर्व अडचणी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
Ramesh devju raut you farmer problem with different