राष्ट्रीय कृषि विकास योजना ही केंद्र सरकारच्या कृषि आणि शेतकरी कल्यानणकारी मंत्रालयाची अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे. कृषि क्षेत्राची वाढ करण्यासाठी या योजनेचे अमलबजावणी करण्यात आली आहे. ज्याचा उद्देश कृषि क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करणे आहे. ही योजना कृषि व्यवसायाला आर्थिक मदत करून व्यवसाय करण्यास प्रोस्थाहण देत आहे. 2007 मध्ये सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषि विकास योजना RKVY ही योजना कृषि आणि कृषि संबंधित क्षेत्रात विकास करण्यासाठी निर्माण केलेली आहे. या योजनेमध्ये केंद्र सरकारचे अतिरिक्त योगदान देण्यात आलेले आहे. आज आपण राष्ट्रीय कृषि विकास योजना विषयी संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या बद्दल पात्रता अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे या विषयी सर्व माहिती यात घेणार आहोत.
योजनेचे नाव . | राष्ट्रीय कृषि विकास योजना . |
योजना कोणा द्वारे राबवली जाते . | केंद्र सरकार द्वारे . |
योजनेचे लाभार्थी . | भारत देशातील शेतकरी . |
योजनेचा विभाग . | कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालय . |
योजनेची अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत संकेतस्थळ | |
योजनेचा उद्देश | भारत देशातील कृषि क्षेत्राचा विकास करणे. |
राष्ट्रीय कृषि विकास योजना उदिष्ट
राष्ट्रीय कृषि विकास योजेनचे उदिष्ट खाली दिलेले आहेत.
- कृषि आणि कृषि संबंधित क्षेत्राचा विकास करणे.
- कृषि पायाभूत सुविधा निर्माण करणे.
- कृषि व्यवसाय उद्योगाला चालना देणे.
- सर्व राज्याना त्यांच्या स्थानिक गरजा नुसार नियोजन करताना लवचिकता प्रदान करणे.
- शेतकऱ्याच्या गरजे नुसार राज्य व जिल्हा स्तरावर योजना तयार करणे.
- कृषि निगडीत व्यवसाय करण्यास शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना पाठबळ देणे.
- शेतकाऱ्यांनाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे.
- कौशल्य विकास , नवकल्पना व कृषि व्यवसाय करण्यासाठी तरुणांना सक्षम करणे.
- राज्यातील महत्वाच्या पिका मधील उत्पादन अंतर कमी करणे.
राष्ट्रीय कृषि विकास योजना वैशिष्ट
- ही योजना 100 टक्के केंद्र सहाय्याने चालते.
- मागील तीन वर्षाच्या सरासरी खर्चाच्या आधारे आधारभूत खर्चाची गणना केली जाते.
- राष्ट्रीय कृषि विकास योजना त्यांच्या संबंधित क्षेत्राला संयुक्त पणे एकत्र करते.
- या योजनेचा प्रोस्थाहण कार्यक्रम असल्याने , वाटप ही स्वयंचलित आहे.
- या योजनेत जिल्हा स्तर आणि राज्य स्तरावर कृषि आरखडे तयार करणे अनिवार्य आहे.
- राष्ट्रीय कृषि विकास योजना निश्चित ठरवलेल्या कालावधी प्रकल्पांना प्राधान्य देते.
- राष्ट्रीय कृषि विकास योजना ही राज्य योजना आहे.
राष्ट्रीय कृषि विकास योजनेमध्ये समाविष्ट घटक
- पीक संवर्धन .
- फलोत्पादन .
- दुग्ध व्यवसाय .
- मत्स्य व्यवसाय .
- कृषि संशोधन आणि शिक्षण .
- मृद आणि जलसंधारण .
- कृषि वित्तीय संस्था .
- अन्न साठवणूक आणि गोदाम .
- वृक्ष रोपण आणि कृषि विपणन .
- इतर कृषि कार्यक्रम आणि सहकार्य .
- वनीकरण आणि वन्य जीव .
राष्ट्रीय कृषि विकास योजना पात्रता
- या योजनेत सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेश पात्र आहेत.
- राज्य कृषि अराखडे (SAP) व जिल्हा कृषि आराखडे (DAP) तयार करण्यात येत आहेत.
- केंद्र सरकारने निधी वाटप केल्या नंतर राज्य सरकार ती रक्कम थेट शेतकरी किंवा कृषि कार्यात गुंतलेल्या समूहाला वितरित करतात.
- अर्जदार शेतकरी कृषि किंवा कृषि संबंधित क्षेत्रात गुंतलेला असावा .
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- वय पुरावा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाइल क्रमांक
- ईमेल आयडी
- त्रैमासिक आधारावर कार्य प्रदर्शन अहवाल.
अर्ज प्रक्रिया
राष्ट्रीय कृषि विकास योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आपणास सर्वप्रथम https://rkvy.nic.in/ संकेतस्थावर जाऊन आपली सर्व माहिती व्यवस्थित भरून आपला अर्ज दाखल करू शकता.
निष्कर्ष
राष्ट्रीय कृषि विकास योजना ही केंद्र सरकार द्वारे राबवली जाणारी योजना आहे. या योजने द्वारे केंद्र सरकार प्रत्येक राज्याला आपल्या भागात आवश्यक असणाऱ्या कृषि क्षेत्र व कृषि क्षेत्राशी निगडीत योजना राबवण्यास मान्यता देते. Rkvy योजने मध्ये राज्य सरकार उपक्रम राबवून केंद्र सरकार ला अहवाल पाठवते. तसेच दर वर्षी राज्य सरकार कडून पुढील आर्थिक वर्षात कोणते कृषि व कृषि क्षेत्राशी निगडीत उपक्रम राबवयाचे आहे याचा अहवाल घेतला जातो. आणि वर्ष अखेरीस केंद्र सरकार ला किती प्रमाणात काम पूर्ण झाले याचा देखील अहवाल दिला जातो.
या योजने मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी आपण आपल्या राज्य सरकार कडून निर्गमित केलेल्या कृषि व कृषि संबंधित घटक या योजने मध्ये सहभाग नोंदवून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या कृषि व कृषि संबंधित योजना या राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत राबवण्यात येतात. अआपल्या जवळील नातेवाईक किंवा मित्र यांना जर या योजनेचा लाभ घेयचा असेल तर आपल्या राज्यातील सर्व कृषि निगडीत योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
11 thoughts on “राष्ट्रीय कृषि विकास योजना महाराष्ट्र”