नाबार्ड पशुधन लोन योजना मराठी

    दुग्ध व्यवसायात भारत देश अग्रेसर आहे. भारत देशात दूध व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात केला जात आहे. भारतात या व्यवसायाला खूप मागणी आहे. यात बरेच शेतकरी शेती सोबत जोड धंदा म्हणून हा दुग्ध व्यवसाय करतात. या व्यवसायात वाढ व्हावी म्हणून शासनाकडून नाबार्ड पशुधन लोन योजना राबवण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना त्यांच्या व्यवसायात वाढ किंवा नवीन व्यवसाय सुरू करता यावा या उद्देशाने या योजनेची अमलबजावणी करण्यात आली. आज आपण या योजनेचा उद्देश, वैशिष्ट, आवश्यक कागदपत्रे, पात्रता या सर्व घटकाची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाबार्ड पशुधन लोन योजना या योजनेच्या माध्यमातून कोणत्या व्यक्तिना लाभ दिल जातो. त्याच्या अटी व पात्रता काय असणार आहेत. याची सर्व माहिती आपणास देण्यात आलेली आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

    रोजगाराच्या संधि उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने नाबार्ड च्या सहाय्याने डेयरी उद्योजकता विकास विकास योजना ( DAIRY ENTREPRENEURSHIP DEVELOPMENT SCHEME )  सुरू करण्यासाठी अनुमति देलेली आहे. या योजनेमध्ये डेयरी व्यवसाय करणाऱ्या साठी विविध कर्ज देण्यात येतात. ज्या मध्ये पशुधन खरेदी , मिल्कीग मशीन , डेयरी प्रक्रिया संच, वाहतूक , शीत गृह अश्या डेयरी व्यवसाय संबंधित घटकाला कर्ज पुरवले जाते. तसेच शासनाकडून अनुदान देखील देण्यात येते.

 

नाबार्ड पशुधन लोन योजना

योजनेचे नाव

नाबार्ड पशुधन लोन योजना .

योजना कोणी सुरू केली

भारत केंद्र सरकार.

कोणत्या विभागा मार्फत राबवली जाते

नाबार्ड (NATIONAL BANK FOR AGRICULTURE AND RURAL DEVELOPMENT).

योजना कधी सुरू करण्यात आली

सप्टेबर  2010 साली.

योजनेतील लाभार्थी

भारतातील शेतकरी .

योजनेचे अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन .

योजनेचे अधिकृत संकेतस्थळ

https://www.nabard.org/

योजनेचा उद्देश

ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण करून देणे .

नाबार्ड पशुधन लोन योजना वैशिष्ट .

  • या योजनेच्या माध्यमातून नाबार्ड बँकेकडून डेयरी व्यवसाय करण्यासाठी सात लाख रुपये पर्यन्त कर्ज मिळू शकते.
  • घेतलेल्या कर्जावर सरकारकडून 33 टक्के पर्यन्त अनुदान दिले जाते.
  • या योजनेच्या माध्यमातून कमीत कमी दोन व जास्तीत जास्त दहा जनावरे आपण घेऊ शकता.
  • आपण आपल्या दुधाची वाहतूक करण्यासाठी वातानुकूलित वाहन खरेदी साठी अर्थ सहाय्य घेऊ शकतात.
  • आपल्या दुधाची साठवणूक करण्यासाठी आपण शीत ग्रह घेऊ शकतात.
  • दुग्ध व्यवसाय निगडीत बाजार जाहिराती साठी आपण अर्थ सहाय्य घेऊ शकतात.

नाबार्ड पशुधन लोन योजना उदिष्ट

नाबार्ड पशुधन लोन योजना चे उदिष्ट खालील आहेत.

  • भारतातील ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करणे.
  • जे शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मदत करणे .
  • भारतातील दूध उत्पादन क्षमता वाढवणे.
  • शुद्ध व ताजे दूध देशाला उपलब्ध करणे.
  • दुधा पासून बनणाऱ्या विविध पदार्थ प्रकिया संच निर्माण करणे.
  • शेतकाऱ्याच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे.

नाबार्ड पशुधन लोन योजना पात्रता .

नाबार्ड पशुधन लोन योजना मध्ये अर्ज करण्यासाठी खालील घटकाला पात्र ठरवण्यात येत आहे.

  • वैयक्तिक शेतकरी .
  • असंघटित क्षेत्र .
  • उद्योजक .
  • बिगर सरकारी संस्था .
  • संगठीत गट .
  • कंपन्या .
  • दूध उत्पादक संघटना .
  • पंचायत राज संघटना .
  • डेयरी सहकारी संघटना .

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व नियम .

  • एक व्यक्तीला प्रत्येक घटकसाठी एकदाच पात्र ठरवण्यात येते.
  • ज्या घटकाचा लाभ घेतला आहे त्या घटकांचा परत त्या व्यक्तीच्या नावावर लाभ घेता येत नाही.
  • कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांच्या नावावर लाभ घेत येतो.
  • कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला लाभ घेयचा असल्यास पहिल्या यूनिट पासून दुसऱ्या यूनिट मध्ये 500 मीटर अंतर असणे आवश्यक आहे.
  • एक व्यक्ति या योजनेचा एकदाच लाभ घेऊ शकतो.

कर्ज देणाऱ्या सहकारी संस्था .

  • राज्य सहकारी कृषि बँक .
  • ग्रामीण विकास बँक .
  • प्रादेशिक बँक .
  • व्यावसायिक बँक .
  • अन्य संस्था .

नाबार्ड डेयरी लोन अंतर्गत दिले जाणारे अनुदान .

  1. संकरीत गाय / देशी गाय, म्हेस साठी अनुदान
  • गुंतवणूक 5 लाख रुपये पर्यन्त
  • अनुदान 25 टक्के (एसी एसटी साठी 33 .33 टक्के )
  1. संकरीत गाय वासरे / देशी गाय वासरे , म्हेस वासरे साठी अनुदान.
  • गुंतवणूक 4.80 लाख रुपये पर्यन्त
  • अनुदान 25 टक्के (एसी एसटी साठी 33 .33 टक्के )
  1. मील्कीग मशीन / प्रक्रिया संच / कुलीग युनिट (क्षमता 2000 लीटर पर्यन्त).
  • गुंतवणूक 18 लाख रुपये पर्यन्त
  • अनुदान 25 टक्के (एसी एसटी साठी 33 .33 टक्के )
  1. दुग्ध जन्य पदार्थ निर्मिती युनिट.
  • गुंतवणूक 12 लाख रुपये पर्यन्त
  • अनुदान 25 टक्के (एसी एसटी साठी 33 .33 टक्के )

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे .

  • विहित नमुन्यातील अर्ज .
  • आधार कार्ड .
  • पॅन कार्ड .
  • 7/12 .
  • 8 अ .
  • वित्तीय संस्था चे बेबाकी प्रमाणपत्र.
  • स्वयं घोषणा पत्र.
  • प्रकल्प अहवाल .

अर्ज प्रक्रिया

ऑफलाइन अर्ज करण्यासाठी खालील चरणाचा अवलंब करावा.

  • सर्व प्रथम आपणास आपल्या जिल्ह्यातील नाबार्ड कार्यालयाला भेट द्यावी लागेल.
  • नाबार्ड कार्यालयातून आपण सर्व आवश्यक माहिती घेऊ शकता.
  • अर्ज व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून नाबार्ड कार्यालय मध्ये जमा करावी.
  • आपण या विषयी बँक मध्ये देखील माहिती घेऊन अर्ज दाखल करू शकतात.

निष्कर्ष

        नाबार्ड पशुधन लोन योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी योजने आहे. ज्या मध्ये सरकार तर्फे नवीन दुग्ध व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधि उपलब्ध होते. व व्यवसाय वाढ करण्यासाठी सुद्धा या योजनेतून सहकार्य केले जाते. आपल्या जवळील मित्र किंवा नातेवाईक ज्याना या योजनेची आवश्यकता आहे  किंवा त्यांना या योजने विषयी माहिती नाही अश्या व्यक्ति पर्यन्त ही माहिती पोहच करा जेणे करून ते स्वत आपला व्यवसाय सुरू करू शकतील .

FAQ

  1. डेयरी फार्म साठी नाबार्ड कडून किती लोन मिळते ?
  • डेयरी फार्म साठी नाबार्ड कडून पाच लाख रुपये पर्यन्त लोन मिळते.
  1. नाबार्ड पशुपालन लोन वर सबसिडी किती मिळते ?
  • नाबार्ड अंतर्गत पशुपालन लोन वर 35 टक्के पर्यन्त सबसिडी मिळते.
  1. नाबार्ड लोन वरील व्याज दर किती आहे ?
  • नाबार्ड लोन वर 4.5 टक्के वार्षिक व्याजदर आहे.

 

13 thoughts on “नाबार्ड पशुधन लोन योजना मराठी”

Leave a comment