ई पीक पाहणी

ई पीक पाहणी 2024 – कशी नोंदवावी

ई पीक पाहणी

   महाराष्ट्र राज्य शासनाने निर्गमित केलेल्या सूचनेनुसार सर्व शेतकऱ्यांना  ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे शासनाच्या माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीकपेरा  या अभियानांतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबारेवर करणे आवश्यक आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना ई  पीक पाहणी कशी करावी याबद्दल पुरेशी माहिती नाही या लेखातून आज आपण स्वतः आपल्या मोबाईल वरून ई पीक पाहणी करून आपल्या सातबारे वर आपल्या पिकाची नोंद कशा पद्धतीने करायची याची सविस्तर  माहिती घेणार आहोत. 

 

ई पीक पाहणी

ई पीक पाहणी ऍप कसे घ्यावे

     ई पीक पाहणी ऍप  डाऊन लोड करण्यासाठी आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोर ओपन करा त्या मध्ये  ई पीक पाहणी २.० (E Pik Pahani 2.0 ) असे नाव शोधा आपणास ई पीक पाहणी ऍप दिसेल ते ऍप इंस्टाल करून घ्या  .

     येथे क्लिक करून आपण ऍप डाऊनलोड करू शकता              https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova 

अशी भरा नवीन खातेदार माहिती

१ नवीन खातेदार नोंदणी करा 

२ तुमचा विभाग निवडा 

३ तुमचा जिल्हा निवडा 

४ तुमचा तालुका निवडा 

५ तुमचे गाव निवडा 

६ तुमचे नाव / मधले नाव /आडनाव / खाते क्रमांक किंवा गट क्रमांक कोणत्याही एक निवडून माहिती भरावी 

७ शोधा  वर क्लिक करावे 

८ खातेदार निवडा वर क्लिक करून आपले नाव निवडा 

९ पुढील ⇒ बटनावर क्लिक करा 

१०  आपला मोबाइल क्रमांक भरा 

११ त्या नंबर वर आलेला OTP भरा 

आता आपली खातेदार नोंदणी यशस्वी झालेली आहे. 

या पद्धतीने भरा ई पीक पाहणी माहिती

खातेदाराचे नाव निवडा 

 • ४ अंकी संकेतांक भरा ( माहीत नसल्यास संकेतांक विसरलात ?या वर क्लिक करून संकेतांक मिळऊ शकतात)
 • पीक माहिती नोंदवा या  पर्याय वर क्लिक कर 
 • खाते क्रमांक निवडा
 • गट क्रमांक निवडा 
 • तुमचे एकूण क्षेत्र दाखवेल 
 • तुमचे पोटखराब  क्षेत्र दाखवेल 
 • हंगाम निवड करा 
 • एकूण पेरनियोग्य क्षेत्र दाखवेल 
 • पिकाचा वर्ग निवड करा 
 • पिकाचा प्रकार निवड करा (पीक /फळबाग )
 • पिकाचे नाव निवडा 
 • क्षेत्र भरा (पीक घेतलेले क्षेत्र )
 • जल सिनचाचे साधने निवड करा 
 • सिंचन पद्धती निवडा 
 • लागवडीचा दिनांक अचूक भरा 
 •  अक्षांश रेखांश मिळवा या वर क्लिक करा 
 • आपल्या पिकाचा फोटो घ्या 
 •  शेवटी सबमिट  √ बटणवर क्लिक करा    

  या पद्धतीने आपण आपली ई पीक पाहणी करू शकता , आपण नोंदवलेली माहिती ४८ तासाच्या आत दुरुस्त किंवा नष्ट करू शकतो.

 

3 thoughts on “ई पीक पाहणी 2024 – कशी नोंदवावी”

 1. Pingback: MREGS च्या परिवर्तनीय प्रभावाचे अनावरण Mregs Maharashtra

 2. Pingback: PMAY प्रधानमंत्री आवास योजना-2023

 3. Pingback: पीएम किसान सम्मान निधि योजना PM KISAN 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *