Wireless Alert : वायरलेस अलर्ट 2023
आज दि 20/07/2023 रोजी जवळपास आपण सर्वांच्या मोबाईलवर Wireless Alert : वायरलेस अलर्ट 2023 अलर्ट पहायला मिळाला आहे त्या बद्दल कसलीही भीती मनात वाटण्याचे काही कारण नाही. तो आलेला अलर्ट कशाबद्दल आला आहे तसेच त्या बद्दलयाची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
प्राथमिक माहितीनुसार नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये सर्व नागरिकांना सूचना देण्यासाठी व सावधगिरी बाळगण्यासाठी ही सिस्टम केंद्र सरकारने राबवण्यास मान्यता दिली आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये सर्व नागरिकांना सूचना देण्यासाठी व सावधगिरी बाळगण्यासाठी सिस्टमचा वापर केला जातो. या सिस्टमची चाचणी(कसे कार्य करते हे पाहण्यासाठी ) घेण्यासाठी आज हा मेसेज सर्वांना आल्याची समजते आहे. त्या मेसेज बद्दल कोणीही घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही.
संपर्क आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे.
आजच्या वेगवान जगात सर्व यंत्रणेशी जोडलेले राहणे आणि सर्व घटकांची महत्त्वाची माहिती असणे पूर्वी पेक्षा खूप अधिक महत्वाचे झाले आहे. वायरलेस अलर्ट सिस्टीम अखंड संप्रेषण सुनिश्चित करण्यात आणि सुरक्षितता वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावतात, त्यांना आधुनिक जीवनाचा एक अपरिहार्य भाग बनवतात. याचीच सविस्तर माहिती आपण आज या लेखातून पाहणार आहोत.
वायरलेस अलर्ट सिस्टम
वायरलेस अलर्ट सिस्टम नाविन्यपूर्ण संप्रेषण नेटवर्क आहे, जे व्यक्ती किंवा गटांना रियल टाईम माहिती किंवा सूचना / इशारे वितरित करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत सूचना प्रभावीपणे प्रस्तावित करण्यासाठी या प्रणाली वायरलेस तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत जसे की रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल, रेगुलर नेटवर्क किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी इत्यादी प्रमाणे वायरलेस अलर्ट सिस्टीम कार्य करते.
वायरलेस अलर्ट सिस्टम कधी वापरली जाते.
नैसर्गिक आपत्ती, भूकंप,चक्रीवादळ, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या वेळी व काही प्रसंगी मानव निर्मित हानी पासून (वायरलेस अलर्ट) महत्त्वपूर्ण चेतावणी देऊन लोकांना वेळेवर खबरदारी घेणे शक्य होते.
FAQ
1 वायरलेस अलर्ट फक्त आपत्कालिन परिस्थितीत वापरली जातात काय?
ans : नाही वायरलेस अलर्ट आरोग्य सेवा, वाहतूक , सार्वजनिक सुरक्षितता अशा विविध परिस्थिति मध्ये कार्य करतात .
2 आपत्तीजनक परिस्थितित वायरलेस अलर्ट विश्वनीय आहे काय?
ans : होय आणीबाणी आणि नैसर्गिक आपत्ती दरम्यान गंभीर माहिती वितरीत करण्यासाठी वायरलेस अलर्ट अत्यंत महत्वाचे
असल्याचे सिद्ध झाले आहे.
3. चाचणी अलर्ट का पाठवण्यात आला?
ans : वायरलेस अलर्ट अमेरिकेत सुरू केलेले आहे. भारतात त्याचा अवलंब करताना ते कसे कार्य करते हे पाहण्यासाठी चाचणी अलर्ट आले आहे.
राष्ट्रीय कृषि विकास योजना महाराष्ट्र
नमो शेतकरी योजना
बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना लाभ
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.