कुसुम सोलार पंप – पीडीएफ अपडेट 2023
नमस्कार शेतकरी बांधवांनो आपणास सध्या कुसुम सोलार पंप पीडीएफ अपडेट 2023 , व्हॉट्सॲप ग्रुप एक एक्सेल फाईल आलेली आहे ज्या मध्ये प्रत्येक जिल्ह्याची एक यादी आपणास पाहण्यास मिळत आहे. ती नेमकी कशा पद्धतीची यादी आहे यादिलीत लाभार्थी शेतकरी यांना पुढील काय प्रक्रिया करावी लागणार आहे तसेच कुसुम सोलार पंप लिस्ट मधील शेतकर्यांनी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपणास मिळालेली नाही. त्या बद्दल सर्व माहिती आपणास देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्या यादी मध्ये असणारे शेतकऱ्यांचे नाव कोणत्या स्थितीत आहे. तसेच कुसुम सोलार पंप अर्जावर अजून पुढील प्रक्रिया काय असणार आहे, तसेच शेतकर्यांनि सावधगिरी कशी बाळगावी या विषयी संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत.
दिनांक 17 मे 2023 पासून mahaurja कुसुम सौर पंप कंपाउंड बी साठी नवीन नोंदणी चालू झालेली आहे सुरुवातीच्या काळात संकेतस्थळावर भरपूर प्रमाणात लोड येत असल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यास खूप मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या कोठा उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना अर्ज सादर करणे शक्य होत नव्हते परंतु नंतर संकेतस्थळाला व्यवस्थित करून नवीन नोंदणी करणे सोयीस्कर करण्यात आले आहे.या योजनेत 90 टक्के अनुदान शासनाकडून शेतकर्यांना मिळणार आहे. प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. या योजनेमध्ये जवळपास चार ते पाच लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते व ज्या शेतकऱ्यांना अर्जामध्ये त्रुटी आली होती त्या शेतकऱ्यांनी देखील अर्जाची दुरुस्ती करून परत अर्ज दाखल केले आहे.
यादी कोणती आहे.
जिल्हा स्तरावरून वरून जे अर्ज छाननी करून पात्र ठरवण्यात आले आहेत असे सर्व अर्ज आता जिल्हा स्थरावरून पुढे त्यांच्या मुख्य कार्यालयात पाठवण्यात येत आहेत.या पुढे पाठवण्यासाठी तयार केलेली यादी व्हॉट्सॲप वर फिरवली जात आहे. ती यादी अंतिम समजली जाणार नाही. त्यात अजून काही त्रुटी असल्यास आपणास अर्ज परत दुरुस्त करावा लागेल.
अर्जाची पुढील प्रक्रिया काय असेल
या यादीमधून जे शेतकरी पात्र होतील त्या शेतकर्यांना सेल्फ सर्वे साठी पर्याय दिला जाईल. ज्या शेतकऱ्यांचा सेल्फ सर्वे व्यवस्थित आहे अशा शेतकऱ्यांना पेमेंट भरणा करण्यासाठी पर्याय दिला जाईल.
सौर पंप साठी किती रक्कम भरावी लागेल.
महाराष्ट्रात कुसुम सोलर पंप बसवण्यासाठी 13.5 टक्के जीएसटी सहित किंमत खालील प्रमाणे.
सौर पंप क्षमता | एकूण किंमत | सर्वसाधरण शेतकरी हिस्सा | अनु जाती/जमाती शेतकरी हिस्सा |
3 HP | 193803 | 19380 | 9690 |
5 HP | 269746 | 26975 | 13488 |
7.5 HP | 374402 | 37440 | 18720 |
शेतकर्यांनी कोणती काळजी घेणे गरजेचे आहे.
यादी मधील शेतकर्यांना विविध कंपन्या मार्फत संपर्क करण्यास सुरू केले जाते. ज्या मध्ये आपणास आमची कंपनीची निवड करा. तुमच्या यूजर आयडी पास वर्ड द्या आम्ही कंपनी निवडून देतो. तुमचा सेल्फ सर्वे करून देतो किंवा इतर काही तरी कारण सांगून तुमच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. या वेळी खूप असे फसवणूक करणारे लोक आपणास कॉल करून काही तरी कारण सांगून OTP विचारून आपली फसवणूक केली जाऊ शकते. तसेच पंप सिलेक्ट करण्यासाठी किंवा सेल्फ सर्वे / पेमेंट पर्याय देण्यासाठी तुमच्याकडे काही पैशाची मागणी करू शकतात. अशा सर्व फोन कॉल फसवणुकीपासून दूर रहा .
जर या यादी मध्ये आपले नाव असेल
या यादी मध्ये आपले नाव असेल तर आपला कुसुम सोलार पंप अर्ज जिल्ह स्थरावरुण पात्र ठरवण्यात आला आहे. आपणास अर्जावर पुढील प्रक्रिया करून आपल्या जिल्ह्याच्या पंप कोठया नुसार टप्या टप्याने सेल्फ सर्वे साठी तसेच पेमेंट करण्यासाठी पर्याय दिले जाणार आहेत. सेल्फ सर्वे व पेमेंट साठी आपणास अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
जर यादीत आपले नाव आले नसेल
यादी मध्ये जर आपले नाव नसेल तर आपणास घाबरण्याची गरज नाही. आपला अर्ज जिल्हा स्तरावरून छाननी करणे बाकी राहिलेला आहे जेव्हा जिल्हा स्तरावरून अर्जाची छाननी केली जाईल तेव्हा आपल्या अर्जावर पुढील प्रक्रिया केली जाईल. आपणास आपल्या अर्जात काही त्रुटि असेल तर ती त्रुटि दुरुस्त करण्यासाठी आपणास एक एसएमएस येईल. (अर्ज करताना जो मोबाइल नंबर दिला होता त्या नंबर वर ) त्या नंतर आपला अर्ज मुख्य कार्यालयात पाठवण्यात येईल.
धन्यवाद ….
आणखी वाचा
डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
नाबार्ड पशुधन लोन योजना मराठी
राष्ट्रीय कृषि विकास योजना महाराष्ट्र
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.