crop insurance 2023
csc vle
नमस्कार बांधवांनो आज आपण CSC VLE केंद्र चालक यांना crop insurance पीक विमा अर्ज करताना येणार्या अडचणी बद्दल माहिती पाहणार आहोत. आपण दर वर्षी पीक विमा अर्ज करत आहोत. परंतु प्रत्येक वर्षी शासन / विमा कंपनी काही तरी नवीन नियम आणत असते. जसे या वर्षी सर्व सर्व समावेशक पीक विमा/ 1 रुपयात पीक विमा. नवीन आलेल्या नियमांची आपणास पूर्ण माहिती मिळत नाही म्हणून आपणास crop insurance अर्ज करताना बर्याच अडचणीचा सामना करावा लागतो. तसेच आपणास प्रत्येक वेळी CSC जिल्हा व्यवस्थापक / विमा कंपनी जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करणे शक्य नसते. कारण त्यांना बरेच असे तांत्रिक अडचणी सोडवायच्या असतात. या लेखात आपण सरासरी आपणास पडणारे प्रश्न यांची उत्तरे पाहणार आहोत.
CSC VLE यांना वारंवार पडणारे प्रश्न
1) CSC VLE यांना प्रती अर्ज किती किती कमिशन मिळणार आहे?
ANS: केंद्र चालकाला एकूण प्रती अर्ज 32 रू मिळणार आहे शासनाकडून येणाऱ्या 40 रू यातून 80 % केंद्र चालकास आणि 20 % CSC कंपनीस .
2) crop insurance पीकविमा भरण्याची शेवट तारीख काय आहे ?
ANS: 31 जुलै 2023
3) डॉक्युमेंट कोण कोणते अपलोड करावे ?
ANS: बँक पासबूक , सातबारा/ 8अ, स्वयघोषित पीक पेरा.
4) सातबारा किंवा 8अ कोणता वापरावा ?
ANS: तुम्ही डिजिटल/तलाठी कार्यालयातून मिळालेला(तलाठी सही शिक्का असलेला) / भूमिअभिलेख वरून कडलेली ७/१२ , 8अ वापरू शकता.
5) 8अ दोन किंवा अधिक असेल तर ?
ANS: सर्व आठ अ / सातबारा यांची एक PDF बनवून अपलोड करू शकता.
6) बँक पासबुक लिखित असेल तर ?
ANS: बँक पासबुक शाखा व्यवस्थापक यांचा शिक्का व IFSC code आणि खाते क्र. स्पष्ठ दिसेल अशा प्रकारे अपलोड करावे.
7) सामायिक क्षेत्र असेल तर ?
ANS: सामाईक क्षेत्र शेतकर्याच्या हिश्याची जेवढी जमीन आहे तेवढ्याच क्षेत्राचा विमा उतरवणे.
8) CSC डॅशबोर्ड वर payment त्रिपुरा/ पोंडीचेरी येत आहे ?
ANS: काही तांत्रिक अडचणी मुळे सदरील बाब होत असून त्या कडे दुर्लक्ष करावे व विमा भरते वेळी लक्ष पूर्वक महाराष्ट्र निवडावे.
9) शेतकर्याची जमीन दोन किंवा तीन गावात असेल तर?
ANS: प्रत्येक गावासाठी वेगळा अर्ज करावा अर्ज करण्यास कोणतीही मर्यादा नाही.
10) डिजिटल सातबारा 8अ चे पैसे कोण भरणार ?
ANS: सातबारा 8अ झेरॉक्स साठी लागणारा खर्च शेतकर्याकडून घ्यावा. व त्यांना त्या बद्दल सविस्तर माहिती द्यावी.
11) crop insurance फॉर्म भरलेले कमिशन कधी जमा होणार ?
ANS: पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात आपल्या csc wllet किंवा DIGIPAY ला जमा होईल.
12) अर्ज भरताना csc vle केंद्र चालकाकडून काही चूक झाल्यास ?
ANS: पुढील दोन ते तीन दिवसात CSC कडून google फॉर्म लिंक मिळेल त्यात आपला अॅप्लिकेशन नंबर टाकून आपला अर्ज रीजेक्ट करून आपणास दूसरा नवीन अर्ज भरता येणार आहे.
13) विमा भरताना काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास काय करावे ?
ANS: आपल्या जिल्ह्याची इन्शुरन्स कंपनी state coordinator यांच्या मार्फत आपल्या जिल्हयासाठी एक team तयार केलेली आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आपण आपल्या जिल्ह्याच्या CSC DM यांच्या मार्फत संपर्क करावा व व त्यांचे नंबर ग्रुप वर सुद्धा दिले जातील.
14) शेतकर्याची जमीन भाडे तत्वावर घेतलेली असल्यास ?
ANS: रजिस्टर भाडेपत्र तयार करून ते अपलोड करावे ? (बॉन्ड किंवा रेसिट तिकीट लाऊन चालणार नाही )
15) मयत खातेदाराच्या नावाने विमा भरावा का?
ANS: मयत व्यक्तीच्या नावाने विमा भरू नये.
16) एका पासबुक वर दोन पिक विमा अर्ज भरायला जमतात का ?
ANS: हो जर शेतकऱ्यांची जमीन दोन किंवा जास्त गावात असेल तर एका पासबुक वर दोन्ही/जास्त अर्ज भरू शकता.
17) पोटखराब क्षेत्राचा विमा भरावा का?
ANS: पोटखराब क्षेत्राचा विमा भरू नये जेवढे क्षेत्र लागवडी योग्य असेल तेवढ्याच क्षेत्राचा विमा भरावा.
18) अ. पा. क. चा विमा भरता येईल का?
ANS: हो अ. पा. क. चा विमा पालन कर्त्याच्या नावाने भरू शकता.
19) मयत व्यक्तीचा विमा त्याचे वारसदार (पत्नी/मुलगा/मुलगी) यांच्या नावाने भरू शकतो का?
ANS: नाही मयत व्यक्तीचा विमा भरता येणार नाही.
नाबार्ड पशुधन लोन योजना मराठी
राष्ट्रीय कृषि विकास योजना महाराष्ट्र
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना 2023
डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.