पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना 2024

   शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पादनात वाढ व्हावी ह्या हेतूने राज्य शासन व केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांना फायदा देणाऱ्या योजना राबवत असते. ज्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ होऊन देशातील अन्न पुरवठा भागवता येईल. आज आपण पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना या योजने विषयी सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

        राज्याचे दूध उत्पादन वाढावे म्हणून राज्य सरकारकडून पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना सुरू करण्यात आली.  या योजनेमध्ये शेतकऱ्यांना गाय/ म्हशी / शेळी / मेंढी / कोंबडी या घटकाला अनुदान दिले जाते. शेतकरी  ऑनलाइन अर्ज करून या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो. पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना मध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, बंधपत्र, पात्रता व निवड प्रक्रिया या वर सविस्तर माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

योजनेचे नाव

गाय, म्हशी,शेळी मेंढी पालन योजना 

सुरू करणारे राज्य

महाराष्ट्र राज्य

विभाग

कृषि विभाग

लाभार्थी

महाराष्ट्रातील शेतकरी

उद्देश

राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे

अर्ज पद्धती

ऑनलाइन अर्ज करणे

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना 2023 पात्रता

 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
 • अर्जदाराकडे पशु संगोपन करण्यासाठी जमीन आवश्यक आहे. (अर्जदाराचे नाव सातबारा मध्ये नसल्यास कुटुंबाचे सहमति पत्र किंवा भाडे पत्र )
 • कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याने या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

 

योजनेमधील घटक व अनुदान

1. गाय म्हशी वाटप .

 • प्रती गाय म्हैस 40,000 या प्रमाणे .
 • एकूण प्रकल्प किंमत 85,031 .
 • अनुदान अनुसूचित जाती साठी 75 टक्के 63,796 स्वहिस्सा 21,265.
 • अनुदान सर्वसाधारण साठी 50 टक्के 42,531 स्वहिस्सा 42,531.  

2. शेळी मेंढी वाटप.

 • 10 शेळी एक बोकड / 10 मेंढी एक नर मेंढा.
 • प्रती शेळी मेंढी 10,000 .
 • नर मेंढा 12,000 रुपये.
 • एकूण प्रकल्प किंमत 1,03,5,45.
 • अनुसूचित जाती अनुदान 75 टक्के 77,659 स्वहिस्सा 25886 .
 • अनुदान सर्वसाधारण 50 टक्के 51,771 स्वहिस्सा 51,771 .   

3. 1000 मांसल पक्षी संगोपन वाटप.

 • 1000 पक्षी संगोपन कक्ष.
 • एकूण प्रकल्प किंमत 2,25,000.
 • अनुदान अनुसूचित जाती साठी 75 टक्के 1,68,500 स्वहिस्सा 56,250.
 • अनुदान सर्व सर्वसाधारण 50 टक्के 1,12,500 स्वहिस्सा 1,12,500.

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना आवश्यक कागदपत्रे

 1. आधार कार्ड .
 2. सात बारा .
 3. 8 अ उतारा.
 4. अपत्य स्वयंघोषणा पत्र .
 5. रहिवाशी प्रमाणपत्र.
 6. राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक .
 7. रेशन कार्ड / कुटुंब प्रमाणपत्र.
 8. 7/12 मध्ये स्वताचे नाव नसल्यास कुटुंबाचे सहमति पत्र किंवा भाडेपत्र.
 9. अनुसूचित जाती जमाती असल्यास जातीचा दाखला.
 10. दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र
 11. दिव्याग असल्यास प्रमाणपत्र.
 12. बचत गटातील सदस्य असल्यास प्रमाणपत्र.
 13. शौक्षणिक प्रामानपत्र.
 14. प्रशिक्षण घेतलेले असल्यास प्रमाणपत्र.

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना अर्ज प्रक्रिया

प्रथम आपण पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. https://ah.mahabms.com/

आपण संकेतस्थळावर गेल्यावर आपणास अर्जदार नोंदणी हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करून आपण आपली सर्व वैयक्तिक माहिती तसेच, आपला तालुका, जिल्हा, गाव,  जात प्रवर्ग, दिव्याग तपशील, शिक्षण माहिती,जमीन तपशील , राशन क्रमांक, बँक अकाऊंट तपशील, अर्जदाराची कौटुंबिक माहिती. अर्जदार याचा फोटो सही ही सर्व माहिती व्यवस्थित भरून आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

   आपण आपला अर्ज मोबाइल अॅप्लिकेशन मधून देखील सादर करू शकता. अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.evdtnew.mahabms

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना निवड प्रक्रिया

     पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना 2023 ची निवड प्रक्रिया ही लाभार्थी निकष नुसार केली जाते. निवड करताना खालील प्राधान्य क्रम नुसार निवड केली जाते. महिलाना 30 टक्के प्राधान्य दिले जाते.

 • महिला बचत गट सदस्य.
 • दारिद्र्य रेषेखालील अर्जदार .
 • अल्प भूधारक शेतकरी .
 • सुशिक्षित बेरोजगार .

      या पद्धतीने निवड प्रक्रिया केली जाते. आपली निवड झाल्यास आपणास आपल्या मोबाइल वर संदेश पाठवून आपणास माहिती दिली जाते. व उर्वरित सर्व कागदपत्रे अपलोड करा अशी सूचना केली जाते

निष्कर्ष

     आपण या लेखातून पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना विषयी संपूर्ण माहिती घेतली आहे. या योजने मधून शेतकऱ्यांना शेती सोबत शेती पूरक व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. ज्या मुले शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी आत्मनिर्भर बनतील.

    आपल्या जवळील नातेवाईक / मित्र ज्याना पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना या योजनेची आवश्यकता आहे किंवा ते या योजनेसाठी पात्र आहेत अश्या व्यक्ति पर्यन्त ही माहिती आपण पोहोच करून त्यांना या योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी व अर्ज करण्यासाठी मदत करा.

     आम्ही आपणास सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या शिवाय आपणास अर्ज करताना किंवा दुसरी काही अडचण असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आम्ही नक्कीच आपली मदत करू.