Varas Nond :वारस नोंदीसाठी अर्ज कसा करावा? 7/12 वर नाव येण्यास किती दिवसाचा कालावधी लागतो?

Varas Nond : जमिनीच्या मालकी आक्का मध्ये बदल झाल्यास, त्याची नोंदणी करणे आवश्यक असते. बऱ्याच नागरिकांना ही प्रक्रिया अतिशय किचकट वाटत असते. या संदर्भात अधिक माहिती देताना, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्या कार्यालयात वारस नोंदणी कशी केली जाते आणि सातबारावर नाव येण्यास किती दिवसाचा कालावधी लागतो याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.Varas Nond

Varas Nond

वारस नोंदणीचे दोन प्रकार

फेरफार नोंदणीसाठी तलाठी कार्यालयामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार येतात .
पहिला प्रकार : नोंदणीकृत फेरफार ज्यावेळेस दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीच्या मालकी हलक्या संदर्भात कोणतेही दस्त नोंदविले जातात, त्यावेळेस त्याची माहिती ऑनलाईन पद्धतीने तलाठी कारल्याच्या ई-फेरफार प्रणाली मध्ये ऑटोमॅटिक येते .त्यामुळे तलाठ्यांना त्याची नोंद लगेच घेता येतो .

दुसरा प्रकार : अनोंदणीकृत फेरफार .या दुसऱ्या प्रकारामध्ये अर्जदार हा स्वतः ग्राम मसूल अधिकारी यांच्याकडे अर्ज व कागदपत्रे जमा करतात .जे अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होतात,त्याचा फेरफार ग्राम म्हणून सुद्धा अधिकारी तात्काळ तयार करून संबंधिताना नोटीस देतात .Varas Nond

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

वारस नोंदणीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने

ज्यावेळेस एखादा नागरिक वारस नोंदणीसाठी तलाठी कार्यालयात अर्ज करत असतो, त्यावेळेस ग्राम मसाला अधिकारी (तलाठी) सर्वप्रथम त्या अर्जाची नोंदणी गाव नमुना 6 क मध्ये घेतली जाते .त्यानंतर हा अर्ज पुढील मंजुरीसाठी परंतु अधिकारी यांच्याकडे पाठविला जातो .

अर्ज पाठवण्यात आल्यानंतर त्या मंडल अधिकारी हे त्या कागदपत्राची तपासणी करत असताज्यावेळेस मंडल अधिकारी यांना तपासणी दरम्यान वारस हक्काची खात्री पटल्यानंतरच वारस नोंदणीचा अर्ज मंजूर करायचा की नामंजूर करायचा हा निर्णय घेतला जातो .जर वारस नोंद मंजूर झाली तरच फेरफार घेतला जातो आणि सर्व हितसंबंधिताना म्हणजेच,ज्याच्या नावावर या अगोदर जमीन होती आणि ज्याच्या नावावर आता होणार आहे यांना नोटीस पाठवल्या जातात .या नोटीस च्या माध्यमातून या बदलाबाबत त्यांना माहिती दिली जाते आणि काही हरकत असल्यास 15 दिवसाच्या आत ती नोंदविण्यास सांगितले जाते .Varas Nond

7/12 वर नाव येण्यास लागणारा वेळ

ज्यावेळेस मंडल अधिकाऱ्यांनी वारस नोंदीचा फेरफार मंजूर किंवा नामंजूर केला, जातो तेव्हा त्याची नोंद लगेच संबंधित सातबारा आणि 8- अ मध्ये होते .आणि आपला 7/12 अध्यावत होतो .

वारस नोंदीच्या अर्जात प्रथम वारस नोंदवही ला नोंद घेणे आणि त्यानंतर फेरफार घेणे असे दोन टप्पे असतात .त्यामुळे अनेकदा या प्रक्रियेमध्ये थोडा विलंब होऊ शकतो परंतु अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे पूर्ण आणि अचूक माहिती दिल्यास हा विलंब टाळला जाऊ शकतो

जर तुम्हाला या संदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे तक्रार करता येते .Varas Nond

Leave a comment