लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे

    आजच्या काळात मुला प्रमाणे मुलीना देखील सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत. मुलींच्या जन्मासाठी सरकार कडून विविध उपक्रम राबवले जातात. मुलीना सक्षम करण्यासाठी तसेच शिक्षणासाठी आरोग्य या साठी सरकार विविध योजना राबवत आहे. आज आपण अशी एक योजना म्हणजे लेक लाडकी योजना या योजनेची माहिती पाहणार आहोत.

    लेक लाडकी योजना ह्या योजनेची घोषणा 2023-24  मधील अर्थसंकल्पा मध्ये मा . देवेंद्र फडणवीस यांनी केली. जुनी योजना माझी सुकन्या भाग्यश्री (2017 ) या योजनेला खूप खास प्रतिसाद मिळत नव्हता. त्या अनुषंगाने शासन नवीन योजना लागू करण्याचा विचार करत होते. शासनाने 2023-24 च्या अर्थ संकल्पात लेक लाडकी योजना ही राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेमध्ये मुलीच्या जन्मा पासून ते मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीला 75000 पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात. 

योजनेचे नाव

लेक लाडकी योजना

कधी सुरू करण्यात आली

1 एप्रिल 2023

राज्य

महाराष्ट्र

लाभार्थी

महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुली

मदत

101000  रुपये

अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन / ऑफलाइन

लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना उद्देश

 • मुलींच्या जन्माला प्रोस्थाहण देणे.
 • मुलींचा जन्म दर वाढविणे .
 • मुलींच्या शिक्षणास चालना देऊन त्यांना सुशीक्षीत करणे.
 • मुलींचा मृत्यू दर कमी करणे.
 • मुलींचे बालविवाह थांबवणे.
 • मुली मधील होणारे कुपोषण कमी करणे.
 • शाळा बाह्य मुलींचे प्रमाण शून्य करणे.

लेक लाडकी योजना मध्ये मिळणार लाभ.

 • मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या नावावर 5000 रुपये जमा केले जातील.
 • मुलगी पाहिलीत गेल्यावर तिच्या नावावर 6000 रुपये दिले जाणार. 
 • मुलगी सहावी वर्गात गेल्यावर मुलीच्या नावावर 7000 रुपये जमा केले जातील.
 • मुलगी अकरावी या वर्गात गेल्यावर मुलीच्या नावावर 8000 रुपये जमा केले जातील.
 • मुलीचे वय वर्ष 18 पूर्ण झाल्यावर मुलीला 75000  हजार रुपये रोख दिले जातील.

लेक लाडकी योजना पात्रता.

 • लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 • केशरी व पिवळे रेशनकार्ड धारक या योजनेसाठी पात्र असतील.
 • या योजनेसाठी मुलीचे बँक खाते उघडणे आवश्यक आहे.
 • लेक लाडकी योजना मध्ये मुलीला जन्मापासून ते वय 18 वर्ष पूर्ण होई पर्यंत लाभ दिला जातो.

लेक लाडकी योजना अटी

 • कुटुंबात 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलीना किंवा एक मुलगा एक मुलगी असणाऱ्या कुटुंबाला याचा लाभ घेत येईल.
 • पहिल्या आपत्याच्या तिसरा हप्ता व दुसऱ्या आपत्याचा दूसरा हप्त्या वेळी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.
 • दुसऱ्या प्रसूती वेळी जुळी अपत्ये जन्माला आली तर एक मुलगी किंवा दोन्ही मुली यात पात्र असतील. परंतु त्या नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
 • 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगा किंवा मुलगी आहे त्या नंतर जन्माला येणाऱ्या मुलीला अथवा जुळ्या मुलीना या योजनेचा लाभ घेता येईल.

लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे

 1. मुलीचे जन्म प्रमाणपत्र
 2. उत्पन्न प्रमाणपत्र (वर्षीक उत्पन्न 1 लाख रु च्या आत)
 3. मुलीचे आधार कार्ड
 4. पालकांचे आधार कार्ड
 5. मुलीचे पास बूक
 6. रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी)
 7. मतदान ओळखपत्र ( शेवटी लाभ घेण्यासाठी मतदान यादीत नाव असणे आवश्यक)
 8. शेवटी लाभ घेण्यासाठी मुलगी शिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र.
 9. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
 10. अंतिम लाभा करिता मुलीचे विवाह झाले नसल्याचे प्रमाणपत्र. (अविवाहित स्वयंघोषणा प्रमाणपत्र)

लेक लाडकी योजना अर्ज प्रक्रिया

    सध्या तरी लेक लाडकी योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन पोर्टलवर  स्वत: अर्ज करू शकत नाहीत. ज्या वेळी शासनाकडून पोर्टल तयार केले जाईल त्या वेळी आपणास कळविण्यात येईल. सध्या आपण फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो.

अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ⇒ lek Ladki yojana form

  आपण अर्ज व वर दिलेली सर्व कागदपत्रे आपल्या भागातील अंगणवाडी सेविका /पर्यवेक्षीका / मुख्य सेविका यांच्याकडे जमा करू शकतात. अर्ज जमा केल्यानंतर अर्जदाराला लाभ देण्याकरिता अंगणवाडी सेविका /पर्यवेक्षीका / मुख्य सेविका जमा झालेले अर्ज व कागदपत्रे पोर्टल वर अपलोड करतील. व आपणास या योजनेचा लाभ मिळवून देण्यास सहकार्य करतील.

   जी आर पाहण्यासाठी येथे क्लिक करा ⇒ 202310301153280030

निष्कर्ष

     आपण मागील काही वर्षात बऱ्याच स्त्री भ्रूण हत्या झालेल्या घटना पाहिल्यात या वर काही तरी पर्याय असावा म्हणून सरकार ने खूप काही योजना अमलात आणलेल्या आहेत. या योजनेमधून मुलगी ही सुशिक्षित व्हावी व मुलगी ही कुटुंबावर बोज नाही हे दाखवण्याचा सरकार कडून वेळोवेळी प्रयत्न केला जात आहे. आणि आता यात सर्व समाज ही बदल घडवतोय. ही एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

      आम्ही या लेखात लेक लाडकी योजना विषयी सर्व माहिती आपणास देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या जवळील नातेवाईक, मित्र , सहकारी ज्याना या योजनेची माहिती नाही किंवा जे या योजनेसाठी पात्र आहेत अश्या पालकापर्यन्त ही माहिती पोहोचवा जेणे करून त्यांना ही या योजनेचा लाभ घेता येईल. जर आपल्याला अर्ज करण्यासाठी किंवा कागदपत्रा मध्ये काही अडचण असेल अथवा या योजनेमध्ये काही समस्या असेल तर आपण आम्हाला ईमेल किंवा कमेन्ट करून विचारू शकता आम्ही आपली नक्कीच मदत करू.

नेहमी विचारली जाणारी प्रश्न FAQ

 1. लेक लाडकी योजना फॉम कसा भरायचा ?
 • लेक लाडकी योजनेचा फॉर्म तुम्ही ऑफलाइन भरू शकता.
 1. लेक लाडकी योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज करता येतो का ?
 • या योजने मध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अजून तरी कोणतेही पोर्टल तयार करण्यात आलेले नाही.
 1. लेक लाडकी योजना कोणत्या राज्यात राबवली जाते ?
 • लेक लाडकी योजना महाराष्ट्र राज्यात राबवली जाते.
 1. लेक लाडकी योजेनेची पात्रता काय आहे ?
 • लेक लाडकी योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदार कुटुंबाकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
 1. लेक लाडकी योजना मध्ये किती रक्कम मिळते ?
 • लेक लाडकी योजनेमध्ये मुलीच्या जन्मापासून ते मुलगी वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत 101000.  रुपये मिळतात.