शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. मागेल त्याला विहीर योजना GR काढून सिंचन विहीर योजनेचा निर्णय घेण्यात आला आहे .
Table of Contents
Toggleशेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. त्या मध्ये आता नुकतीच अमलात आणलेली मागेल त्याला विहीर योजना या योजनेची संपूर्ण माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) मधून मागेल त्याला विहीर योजने अंतर्गत विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांना चार लाख रुपये अनुदान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत दिले जाते. या योजनेचा gr 4 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. या योजनेची आवश्यक लागणारी पात्रता, संपूर्ण अर्ज प्रक्रिया , आवश्यक कागदपत्रे , लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे सादर करावा या सर्व बाबीची माहिती घेणार आहोत.
शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. मागेल त्याला विहीर योजना GR काढून सिंचन विहीर योजनेचा निर्णय घेण्यात आला आहे .
शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. त्या मध्ये आता नुकतीच अमलात आणलेली मागेल त्याला विहीर योजना या योजनेची संपूर्ण माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) मधून मागेल त्याला विहीर योजने अंतर्गत विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांना चार लाख रुपये अनुदान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत दिले जाते. या योजनेचा gr 4 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. या योजनेची आवश्यक लागणारी पात्रता, संपूर्ण अर्ज प्रक्रिया , आवश्यक कागदपत्रे , लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे सादर करावा या सर्व बाबीची माहिती घेणार आहोत.
योजनेचे नाव | मागेल त्याला विहीर योजना |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
विभाग | |
योजनेची सुरवात | 04 नोव्हेंबर 2022 |
योजनेचा उद्देश | राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपति करणे |
अर्ज पद्धती | ऑफलाइन |
एकूण अनुदान | 4 लाख रुपये |
मागेल त्याला विहीर योजना उद्देश
मागेल त्याला विहीर योजना राज्यातील प्रत्येक कुटुंबाला आर्थिक सहाय्य करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे. मानरेगा फक्त रोजगार देणारी नसून विकासात भर घालणारी योजना आहे. या योजने मार्फत विहिरी लवकरात लवकर खोदून त्यातून मिळणाऱ्या पाण्याचे नियोजन करून शेती साठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची कमतरता दूर करणे. महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य कमी करून प्रत्येक कुटुंब लखपति करणे. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे व राज्यातील कृषि क्षेत्रातील उत्पन्न वाढवून राज्य कृषि क्षेत्रात अव्वल ठेवणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
मागेल त्याला विहीर योजना वैशिष्ट
- लाभ धारकाकडे सलग 0.40 हे क्षेत्र असेल तरी लाभ घेऊ शकतात.
- दोन किंवा अधिक लाभार्थी मिळून सलग 0.40 हे. क्षेत्रावर लाभ घेऊ शकतात.
- दोन विहिरी मधील 150 मीटर अंतर अट रद्द केली आहे.
- विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान प्रदान केले जाते.
- एक गावात वैयक्तिक कितीही विहिरी घेऊ शकता.
- जॉब कार्ड धारकांना लाभ दिल जातो.
पात्रता
- लाभ धारकाकडे कमीत कमी 0.40 हे (एक एकर) जमीन असावी .
- पेयजल स्त्रोता पासून 500 मीटर अंतरावर नवीन विहीरीची जागा असावी.
- लाभ धारकाच्या 7/12 वर आधीच विहीरीची नोंद नसावी.
- लाभ धारकाच्या नावे 7/12 व 8 अ असावा .
- संयुक्त विहीर साठी 0.40 हे (एक एकर) पेक्षा जास्त सलग क्षेत्र असावे.
- लाभार्थी जॉबकार्ड धारक असला पाहिजे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड .
- 7/12 ऑनलाइन .
- 8 अ ऑनलाइन .
- जॉबकार्ड ची प्रत .
- समुदाईक विहीर असल्यास सर्व लाभ धारक मिळून 0.40 हे पेक्षा अधिक जमीन असल्याचा पंचनामा.
- समुदाईक विहीर असल्यास पाणी वाटपांबाबत करार पत्र / शपथपत्र.
अर्ज प्रक्रिया
मागेल त्याला विहीर योजने मध्ये अर्ज करण्यासाठी आपणास विहित नामुन्यातील अर्ज व आवश्यक असणारे कागदपत्रे जोडून आपला अर्ज आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात / ग्रामरोजगर सेवक यांच्या कडे जमा करावा लागेल. आपला अर्ज सादर केल्यानंतर आपणास पोहोच पावती दीली जाईल.
सद्य स्थितीत तरी मागेल त्याला विहीर या योजनेमध्ये स्वत: लाभार्थी ऑनलाइन अर्ज करू शकत नाहीत काही कालावधी नंतर ही प्रक्रिया सुद्धा सुरू केली जाणार आहे, ही ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आम्ही आपणास नक्कीच सूचना करू. सध्या तरी आपण फक्त ऑफलाइन अर्जच करूनच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अर्ज कार्यवाही
आपण आपला अर्ज सादर केल्यानंतर तो अर्ज ऑनलाइन करण्याचे काम ग्रामपंचयातचे असेल. हे काम ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्रामरोजगर सेवक यांच्या मदतीने पूर्ण करेल. ऑनलाइन झालेले अर्ज ग्रामपंचायत / ग्रामसेवक यांना ऑनलाइन प्रदान केले जातील. त्या नंतर हे सर्व अर्ज ग्रामसभेत मांडले जातील व अर्ज मंजूर केले जातील. गरज पडल्यास ग्रामसभा घेण्यात येते.
ग्रामसभा / ग्रामपंचायत मान्यता मिळाल्या नंतर एक महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील.
लाभ धारक निवड प्राधान्य
सिंचन क्षेत्र वाढ व्हावी व शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे ह्या हेतूने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना हमी योजना अंतर्गत मागेल त्याला विहीर योजना अमलात आणलेली आहे. या योजनेमध्ये निवड करताना प्रथम प्राधान्य क्रम असा निर्धारित करण्यात आला आहे.
- अनुसूचित जाती , जमाती .
- भटक्या जमाती .
- विमुक्त जाती .
- दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी .
- स्त्री कर्ता असलेले कुटुंब.
- अपंग असलेले कुटुंब प्रमुख .
- जमीन सुधारनांचे लाभार्थी.
- इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी.
- सीमान्त शेतकरी (2.5 एकर पर्यन्त जमीन असणारे लाभार्थी )
- अल्प भूधारक शेतकरी (5 एकर पर्यन्त जमीन असणारे लाभार्थी )
निष्कर्ष
मागेल त्याला विहीर योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत दिली जाते. आपण या योजनेची अर्ज प्रक्रिया ,निवड प्रक्रिया , योजनेची पात्रता , लाभार्थी निवड प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे या विषयी सर्व माहिती आम्ही आपणास दिलेली आहे.
जर आपल्या जवळील मित्र / नातेवाईक यांना या योजनेची गरज असेल तर आपण त्यांच्या पर्यन्त ही माहिती पोहोच करून. त्यांना या योजनेचा लाभ कसा मिळतो या संबंधी माहिती द्या . आम्ही आपणास या योजनेची सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे . तरी आपणास काही समस्या असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधा आम्ही नक्कीच आपणास मदत करू.
मागेल त्याला विहीर अर्ज विहीर अर्ज मागेल त्याला विहीर अर्ज
जी आर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. .GR मागेल त्याला विहीर
डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना 2023
वारंवार विचारली जाणारी प्रश्न
- मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते ?
- या योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान दिले जाते .
- मागेल त्याला विहीर योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज करता येतो का ?
- मागेल त्याला विहीर योजने अंतर्गत सध्या तरी ऑनलाइन अर्ज करता येत नाही .
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
मी भिमराव विनायकराव एककर मागील पंधरा वर्षापासून मी विहिरीच्या प्रयत्नात आहे पण मला अजून विहीर मिळालेली नाही. तालुका सेलू जिल्हा परभणी.
Good
खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचल्या बद्दल धन्यवाद
Bhimraoekkar4475@gmail.com
विहीर
३० वर्षे जुनी विहीर आहे७/१२ विहिरची नोद आहे.ती पूर्ण मातीनी (बुजली) बाजूची माती पडून विहीर बंद आहे . माझे वडील वारलेत त्यांच्या नावे जमीन आहे . मी मुलगा विहिरीसाठी मागेल त्याला विहीर या योजेअंतर्गत लाभ घेऊ शकतो का ?
हो आपण लाभ घेऊ शकतात.
मला विहीर सिंचन उक्रेस आहे तर आपण600000द्यवे अशी माझी नम्र विनंती