महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात खास करून शेतकऱ्यांसाठी. तर आज आपण एक अशीच महत्त्वाची योजना म्हणजे Maha DBT farmer scheme होय. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध शेती विषयी औजारे या पोर्टल च्या माध्यमातून आपण अर्ज करू शकतात. महाराष्ट्र शासनाद्वारे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बऱ्याच काही शेती विषयी योजना आहे. सर्व योजना एकाच संकेतस्थळावर आणण्यासाठी सरकार ने महाडीबीटी शेतकरी योजना सुरू केलेली आहे . महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेल्या सर्व कृषी योजना ची माहिती आपणास . Mahadbt farmer scheme या पोर्टलवर पाहण्यास मिळत आहे.
Table of Contents
Toggleमहाडीबीटी योजना मध्ये ठिबक सिंचन ,तुषार सिंचन साठी 75%, ते 80% अनुदान दिले जाते. अशा बऱ्याच योजना महाडीबीटी अंतर्गत आहेत. शेततळे आकारानुसार शेततळे व असरी करण्यासाठी अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळणारे अवजारे ट्रॅक्टर, पावरटिलर , नांगर, रोटाव्हेटर, अवजारे , कडबा कुट्टी मशीन, रेजर, ऊस पाचट कुट्टी यंत्र, कल्टीव्हेटर, पेरणी यंत्र , ट्रॅक्टर ट्रॉली, मिनी राईस मिल, दाल मिल, पावरविडर, इत्यादी हे अवजारे या योजनेद्वारे अर्ज करू शकतात.
ग्रीन हाऊस ,शेडनेट हाऊस, पॅक हाऊस, नर्सरी, प्लास्टिक मल्चिंग, इलेक्ट्रॉनिक मोटर इत्यादी या सर्व शेती विषयी योजना Mahadbt farmer scheme या पोर्टल वर जाऊन अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांना विविध योजनेसाठी आपणास विविध पोर्टलवर जाण्याची गरज भासणार नाही. आपण याच पोर्टलवर कृषी विषयी माहिती घेऊ शकतात महाडीबीटी योजना अर्ज कसा करायचा पात्रता निकष लागणारे कागदपत्रे या सर्वांची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
योजनेचे नाव | महाडीबीटी शेतकरी योजना |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
योजनेचा उद्देश | शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञान वापरण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे. |
अर्ज पद्धत | ऑनलाइन पद्धत |
योजनेचा विभाग | कृषि विभाग |
अधिकृत संकेतस्थळ |
महाडीबीटी शेतकरी योजनेचा उद्देश
या योजनाचा उद्देश असा आहे की शेती विषयी सर्व माहिती या योजनेच्या माध्यमातून आपल्या सर्वापर्यंत पोहचविणे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे आर्थिक परिस्थिति सुधारणे. महाडीबीटी शेतकरी योजना महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे पोर्टल आहे.
शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या कृषी योजनांसाठी कुठेही फेऱ्या मारण्याची गरज भासू नये.
शेतकऱ्यांना एक प्रगतीचा मार्ग दाखवणे.
शेतकऱ्यांना अनुदानामुळे शेतीत लागणारे अवजारे खरेदी करता येणार
शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये पिकाची गुणवत्ता वाढू शकेल.
राज्य सरकार महाडीबीटी शेतकरी योजनांच्या माध्यमातून खूप सारे फायदे उपलब्ध करून देईल
महाडीबीटी पोर्टल योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा आहे .
महाडीबीटी शेतकरी योजनेचा लाभ
शेतकऱ्यांना या पोर्टलवर योजनेची माहिती मिळेल. राज्यातील शेतकऱ्यांना कोणतेही अवजारे अर्ज करायचा असेल तर दुसऱ्या कोणत्या पोर्टलवर जाण्याची गरज नाही. शेतकरी याचा अर्ज ऑनलाइन करू शकतात ते पण आपल्या मोबाईलवर. पिकाचे नुकसान झाल्यावर भरपाई देण्यात येईल. Mahadbt farmer portal मुळे शेतकऱ्यांना घरी बसल्या सर्व योजनेची माहिती मिळू शकेल.शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचनाला 70% ते 80% अनुदान दिले जातात.
महाडीबीटी योजना पात्रता आणि निकष
- अर्जदार महाराष्ट्राचा राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्यातला नागरिकच अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- अर्जदाराकडे जमीन असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे.
महाडीबीटी योजना आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे 7/12, 8अ
- अर्जदाराचे बँक पासबुक
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे आधार लिंक असणारी मोबाईल क्रमांक
- औजाराचे दरपत्रक
- औजाराचा टेस्ट रिपोर्ट
- अर्जदाराचा रहिवासी पुरावा
- अर्जदाराचा ईमेल आयडी
- अर्जदाराच्या जातीचा दाखला
- अर्जदाराच्या कुटुंबाची माहिती
महाडीबीटी शेतकरी योजना मध्ये कोणत्या घटकासाठी अर्ज करू शकतात
- ट्रॅक्टर.
- पावर टिलर.
- नांगर.
- कडबा कुट्टी मशीन.
- रोटव्हेटर.
- रिजर.
- ऊस पाचट कुट्टी यंत्र.
- कल्टीवेटर.
- पेरणी यंत्र.
- ट्रॅक्टर ट्रॉली.
- स्प्रेअर.
- मिनी राईस.
- मिल, दाळ मिल.
- पावरविडर.
- ठिबक सिंचन.
- तुषार सिंचन.
- शेततळे.
- इलेक्ट्रिक मोटर.
- पाइप लाइन.
- मळणी यंत्र.
- मलचिग मशीन.
- लावणी यंत्र.
- कापूस साठवणूक बॅग.
- वखर.
- इत्यादी.
महाडीबीटी योजना अर्ज करणे करण्याची प्रक्रिया
Mahadbt शेतकरी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रथम तुम्हाला Maha DBT farmer scheme च्या अधिकृत वेबसाईटवर जावे. https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन आपण आपल्याला हव्या असणाऱ्या घटकाला अर्ज करू शकतात.
महाडीबीटी योजना विचारले जाणारे प्रश्न
- महाडीबीटी शेतकरी योजनेचा पात्रता कोण आहे?
- महाडीबीटी शेतकरी योजनेचे पात्रता अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाडीबीटी शेतकरी योजनेचे लाभार्थी?
- महाडीबीटी शेतकरी योजनेचे लाभार्थी शेतकरी आहेत.
- महाडीबीटी शेतकरी या योजना या अर्ज कोठे केला जातो ?
- महाडीबीटी शेतकरी या योजना चा अर्ज MahaDBT farmer scheme या पोर्टल वर केला जातो.
- महा डीबीटी योजने आतर्गत किती अनुदान दिले जाते ?
- महा डीबीटी योजने अंतर्गत 80 % पर्यन्त अनुदान दिले जाते.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
5 thoughts on “महाडीबीटी शेतकरी योजना अर्ज प्रक्रिया,लाभ ,पात्रता.”