pradhan mantri mudra yojana

pradhan mantri mudra yojana

    आपल्या देशात खूप सारे योजना आहे पण ते आपल्याला माहिती नसतात सरकार नवीन योजना या देशात राबवत आहे  . खूप सार्‍या लोकांना काहीतरी नवीन व्यवसाय करायचं असतो.   स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो मात्र पैशांची अडचण येते. या अडचणीवर मात करण्यासाठी एक योजना आहे. pradhan mantri mudra yojana  प्रधानमंत्री मुद्रा योजना त्या योजनेद्वारा आपल्याला 50 हजार ते  10 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते.  आपण या योजनेचा लाभ घेऊन छोटा मोठा व्यवसाय  सुरू करू शकतो. आपल्या  देशात व्यवसायाला चालना देण्यासाठी  केंद्र सरकारनेप्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केलेली आहे . या योजनेचा लाभ घेऊन आपण कोणताही व्यवसाय सुरू करू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा सुरू असलेल्या व्यवसाय वाढवणे या करिता या योजनेतून कर्ज उपलब्ध केले जाते.  प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना संबंधी अर्ज प्रक्रिया, पात्रता , कागदपत्रे, या विषयी संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

pradhan mantri mudra yojana

pradhan mantri mudra yojana उद्देश

ही योजना बिगर शेती लघु सूक्ष्म उद्योगांना दहा लाखापर्यंत कर्ज देण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  8 एप्रिल 2015 रोजी सुरू केलेली आहे. या योजना द्वारे व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते. तसेच सुरू असलेल्या व्यवसाय वाढीसाठी सुद्धा कर्ज दिले जाते.  तुम्ही कोणत्याही हमीशिवाय दहा लाख रुपये पर्यंत व्यवसाय कर्ज घेऊ शकतात केंद्र सरकारने मुद्रा कर्जासाठी तीन लाख कोटी रुपयांचे बजेट तयार केले होते, त्यापैकी 1.75 लाख कोटी रुपयांचे कर्ज आतापर्यंत वितरित करण्यात आले आहे. या कर्ज परतफेड चा कालावधी 5 वर्ष  करण्यात आला आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना ही 8 एप्रिल 2015 रोजी सुरू करण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजना pradhan mantri mudra yojana मध्ये 50 हजार ते 10 लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जातात.

प्रधानमंत्री मुद्रा योजना स्वतःची नवीन उद्योग सुरू करणे किंवा आपण एखाद्या व्यवसाय करत असतात त्या अजून मोठा व्यवसाय वाढवायचा आहे तर आशाही लोकांना प्रधानमंत्री मुद्रा योजना अर्ज करू शकतात. या योजनेचा अर्ज कोणत्याही सरकारी बँकेचे केला जाऊ शकतो. तुम्ही हे कर्ज पी एम एम वाय अंतर्गत घेऊ शकतोत.

 

प्रधानमंत्री मुद्रा योजना  pradhan mantri mudra yojana  अर्ज केल्यानंतर तुम्हाला मुद्रा कार्ड मिळते . डेबिट कार्ड प्रमाणे तुम्ही हे कार्ड वापरू शकता.या योजनेअंतर्गत कर्ज तीन प्रकारे दिले जातात ‌. शिशू कर्ज, किशोर कर्ज,तरूण कर्ज अशा तीन प्रकारात कर्ज दिले जातात.आपण कोणत्याही प्रकारचे कर्ज घेउन व्यवसायाला सुरुवात करु शकतोत.आपले स्वपंन केंद्र सरकारच्या प्रधान मंत्री मुद्रा लोन बरोबर साकार करू शकतो. हे कर्ज सहकारी बँक प्रादेशिक ग्रामीण बँक  RRBS लघु वित्त बँक आणि NBFC कडून देखील हे कर्ज मिळू शकतात. या कर्जाचा व्याजदर वेगवेगळ्या बँक  कडून वेगवेगळ्या असतो. साधारणपणे दहा ते बारा टक्के व्याजदर असते.

pradhan mantri mudra yojana पात्रता निकष

 • अर्जदार भारतीय रहिवासी असावा.
 • अर्जदारकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे .
 • अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असावे.
 • अर्जदाराचा सीबील स्कोर चांगला असावा.
 • अर्जदार बँकेचा दिवाखोर नसावा.
 • अर्जदार शिक्षित असावा.
 • अर्जदार सुरू करत असलेल्या व्यवसाय त्याला त्या व्यवसायाचा अनुभव असावा.

pradhan mantri mudra yojana प्रकार

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे तीन प्रकार आहेत

 1. शिशु कर्ज ‌.50,000 हजार पर्यंत कर्ज पुरवठा केला जातो.
 2. किशोर कर्ज.50 हजार ते 5 लाख रुपये पर्यंतचे दिले जातात.
 3. तरुण कर्ज.5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज दिले जाते.

pradhan mantri mudra yojana लागणारे कागदपत्रे

 • मतदान ओळखपत्र
 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • सीबील स्कोअर रीपोर्ट
 • व्यवसाय परवाना
 • व्यवसाय करत असलेल्या जागेचे पुरावा / भाडेपत्र
 • रहिवासी पुरावा
 • लाईट बिल
 • उत्पन्नाचा दाखला
 • व्यवसाय प्रकल्प अहवाल
 • स्वयंघोषणा पत्र
 • तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्याचा परवाना
 • तुम्ही जर अगोदर कोणता व्यवसाय करत आहात त्याचा पण परवाना व पत्ता
 • तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्या वस्तू किंवा यंत्र इत्यादी
 • ज्या व्यक्तीकडून आपण माल घेतो त्या चा पत्ता व नाव.
 • दोन पासपोर्ट साइज फोटो.

pradhan mantri mudra yojana अंतर्गत कोणते व्यवसाय सुरू करू शकतो

 • सेवा क्षेत्रातील कंपन्या
 • फळे आणि भाजीपाला विक्री
 • दुकानदारासाठी कर्ज दिले जातात.
 • हॉटेल व्यवसाय
 • दुरुस्तीचे दुकाने इत्यादी साठी कर्ज दिले जातात.

pradhan mantri mudra yojana चा अर्ज करण्याची प्रक्रिया

 • प्रधान मंत्री मुद्रा योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी आपण आपल्या जवळील बँक मध्ये जाऊन संपर्क करू शकतात. किंवा प्रधान मंत्री मुद्रा योजना च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण अर्ज करू शकता. https://www.mudra.org.in/ या संकेतस्थळावर जाऊन आपण ऑनलाइन पद्धती अर्ज सादर करू शकतो.

निष्कर्ष

प्रधान मंत्री मुद्रा योजने  pradhan mantri mudra yojana  अंतर्गत आपणास नवीन व्यवसाय करण्याची संधि प्राप्त होते. आपणास आपला व्यवसाय सुरू करणे किंवा वाढवणे या करीत आपणास बँके मार्फत कर्ज वितरित केले जाते. आपणास या योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा असल्यास आपण आपल्या जवळील बँकेशी संपर्क साधू शकता. आपण किंवा आपल्या जवळील नातेवाईक यांना जर या योजनेची आवश्यकता असली तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा.

आपणास pradhan mantri mudra yojana  या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी काही अडचण येत असेल तर आपण आम्हाला नक्की संपर्क साधू शकता आम्ही आपणास नक्कीच मदत करू.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

 1. प्रधान मंत्री मुद्रा लोन कोण घेऊ शकतो?
 • ज्या तरुणांना नवीन व्यवसाय करायचं आहे आणि त्यांच्याकडे भांडवल नाही असे व्यक्ति मुद्रा लोन घेऊ शकतात.
 1. प्रधान मंत्री मुद्रा योजना अंतर्गत किती योजना आहेत ?
 • प्रधान मंत्री मुद्रा अंतर्गत 1 शिशु 2 किशोर 3 तरुण अश्या योजना आहेत.
 1. प्रधान मंत्री मुद्रा लोन व्याजदर किती आहे?
 • मुद्रा लोन चा व्याजदर जास्तीत जास्त 12 टक्के आहे.
 1. प्रधान मंत्री मुद्रा योजना कधी सुरू झाली ?
 • मुद्रा योजना 1 एप्रिल 2015 रोजी सुरू झाली.
 1. मुद्रा लोन घेण्यासाठी काय करावे लागेल?
 • प्रधान मंत्री मुद्रा लोन घेण्यासाठी आपणास बँक किंवा https://www.mudra.org.in/ या संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल.