मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता अर्ज प्रक्रिया

      सरकार कडून नेहमीच जन कल्याणासाठी नव नवीन उपक्रम योजना अमलात आणल्या जातात. अश्या नवीन योजने विषयी आपण नेहमीच अपडेट घेत असतो. राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांनी आणलेल्या नवीन योजना याची सविस्तर माहिती आपण नेहमी घेत असतो.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

   अशीच एक नवीन योजना महाराष्ट्र राज्य सरकारने अमलात आणलेली आहे. आज आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 6 फेब्रुवारी 2024 रोजी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत 65 वय वर्ष पूर्ण असलेल्या जेष्ट नागरिकांना एक रकमी 3000 रुपये वितरित केले जाणार आहेत.

   आजच्या या लेखात आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेमध्ये पात्रता , अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे या विषयी सविस्तर माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

    महाराष्ट्रातील जेष्ट नागरिकांना वयोमानानुसार दैनंदिन आवश्यक असणाऱ्या वस्तु घेण्यासाठी व त्यांना आवश्यक उपचार घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर लाभार्थी व्यक्तीच्या आधार लिंक बँक खात्यात 3000 रुपये रक्कम वितरित केली जाणार आहे. ही रक्कम कशी मिळणार या बद्दल सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री वयोश्री योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना उद्देश

      महाराष्ट्रातील जेष्ट नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपांगत्वाचा सामना करावा लागतो. वाढत्या वयानुसार त्यांना काही ना काही आजार जडत राहतात.

    या आजारावर मात करण्यासाठी व त्यांच्या मानसिक स्वास्थ चांगले ठेवणे हा मुख्यमंत्री वयोश्री योजना चा मुख्य उद्देश आहे. या योजनेतून जेष्ट नागरिकांना वेगवेगळ्या आजारावर नियंत्रन मिळवता येईल. तसेच वयोवृद्ध व्यक्तीला होणाऱ्या आजारावर व त्रासावर नियंत्रण मिळवून त्यांना दैनंदिन कामकाजात मदत मिळेल.

   तसेच वयोवृद्ध व्यक्तीचे जीवन मान सुधारावे हा मुख्यमंत्री वयोश्री योजना चा उद्देश आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता निकष

  • लाभार्थी व्यक्ति हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
  • लाभार्थी व्यक्तीचे 31/12/2023 रोजी वयाचे 65 वर्ष पूर्ण केलेले असावे.
  • लाभार्थी व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये च्या आत असावे.
  • लाभार्थी व्यक्तीने मागील 3 वर्षात कोणत्याही सरकारी योजनेअंतर्गत जे उपकरण घेत आहे ते मोफत घेतलेले नसावे.
  • लभार्थी व्यक्तीला आधार लिंक बँक खात्यावर लाभ मिळाल्या नंतर 30 दिवसाच्या आत उपकरण खरेदी केलेले बिल संकेतस्थळावर अपलोड करावे लागेल .
  • प्रत्येक जिल्ह्यातील निवड यादीमध्ये कमीत कमी 30 टक्के महिला असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड / मतदान कार्ड.
  2. राष्ट्रीय कृत बँक पासबूक झेरॉक्स.
  3. पासपोर्ट साइज फोटो .
  4. स्वयंघोषणा पत्र.
  5. शासन ओळख पटवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ( उदा – रहिवाशी दाखला, राशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, इत्यादी.)
मुख्यमंत्री वयोश्री योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत दिले जाणारे उपकरण

  • चष्मा
  • श्रवण यंत्र .
  • स्टिक व्हील चेअर.
  • फोल्डिंग वाकर.
  • कमोड खुर्ची.
  • नि ब्रेस .
  • लंबर बेल्ट.
  • सारवाइकल कॉलर.

तसेच योगऊपचार केंद्र व मनशक्ती केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र या मध्ये सहभाग नोंदवता येईल.

मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज प्रक्रिया

   राज्य सरकार महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून एक नवीन संकेतस्थळ तयार करून घेणार आहे. हे संकेतस्थळ तयार झाल्यानंतर त्या संकेतस्थळावर नवीन अर्ज करता येणार आहे(संकेतस्थळ निर्माण झाल्यावर आपणास सांगण्यात येईल). अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची समिति मार्फत छाननी केली जाईल. छाननी झाल्यानंतर पात्र लाभार्थी यांच्या आधार लिंक बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल. ( सध्या तरी या योजनेत ऑफलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी आपण लवकरात लवकर ऑफलाइन अर्ज सादर करावा.)

   ऑफलाइन अर्ज सादर करण्यासाठी आपणास समाजकल्याण विभाग यांच्याशी संपर्क करावा लागेल. या कार्यालयात जाऊन आपन आपली सर्व कागदपत्रे व अर्ज सादर करू शकता. आपल्या अर्जात काही त्रुटि असल्यास आपल्याला तेथे तत्काळ सूचित केले जाईल व अर्जात असलेली त्रुटि भरून काढण्यासाठी वेळ दिला जाईल. 

   आपल्याला अर्ज करण्यासाठी आपल्या जवळील समजकल्याण कार्यालयात जावे लागेल. कार्यालयात गेल्यानंतर आपणास तेथे मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज मागणी करावी लागेल. त्यांनी अर्ज दिल्यानंतर त्या अर्जात सर्व माहिती भरून तो अर्ज आणि त्या सोबत वर दिलेली सर्व कागदपत्रे आपणास जोडून कार्यालयात वयोश्री योजना संबंधित अधिकारी याच्याकडे जमा करावा लागेल. 

निष्कर्ष

    राज्यातील जेष्ट नागरिकांना या योजनेअंतर्गत फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत वयोमानानुसार येणारे आजार जसे की दृष्टी कमी होणे, ऐकू कमी येणे, गुडघयचा त्रास होणे, अक्षय अनेक अडचणी कमी करण्यात येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून जेष्ट नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्याचा सरकारने निर्धार केला आहे. आपण किंवा आपल्या जवळील जे लाभार्थी या योजणेसाठी पात्र असतील त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी सहकार्य करावे.

   मुख्यमंत्री वयोश्री योजना मध्ये अर्ज करण्यासाठी किंवा कागद पत्रासाठी काही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क सध्या आम्ही आपणास नक्कीच मदत करू.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  1. मुख्यमंत्री वयोश्री योजना मध्ये किती रुपये लाभ दिल जातो ?
  • या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तिल एक रकमी 3000 रुपये लाभ दिला जातो.
  1. या योजनेमध्ये अर्ज कसा करावा ?
  • या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी आपणास ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  1. या योजनेमध्ये निवृत्त शासकीय कर्मचारी अर्ज करू शकतात का ?
  • हो निवृत्त कर्मचारी या योजनेत अर्ज करू शकतात परंतु आपले वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये च्या आत असावे.

14 thoughts on “मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता अर्ज प्रक्रिया”

Leave a comment