अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

     भारत देशाला तरुणांचा देश म्हणून ओळखण्यात येते. भारतातील एकूण लोकसंखेपैकी 55 टक्के लोकसंख्या ही वय वर्ष 25 च्या आत आहे. तरुणांचा देश आहे मणल्यावर तरुणांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी सरकार कडून विविध योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ नवीन व्यवसाय निर्मिती साठी तरुणांना बिनव्याजी कर्ज पुरवते. बरेच तरुण व्यवसाय करण्यासाठी पात्र असतात परंतु आर्थिक परिस्थिति नसल्यामुळे ते व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. अश्या तरुणांना मदत मिळावी म्हणून अण्णासाहेब पाटील बिनव्याजी कर्ज योजना अमलात आणण्यात आली.

     अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मध्ये नवीन व्यवसाय किंवा चालू असलेल्या व्यवसायाला  10 लाख ते 50 लाख रुपये पर्यन्त बिनव्याजी कर्ज दिले जाते. आज आपण या बिनव्याजी कर्ज योजने विषयी सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण व्हावा व उद्योग क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करता यावे या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली. या लेखात आपण या योजनेच्या नियम अटी , पात्रता , आवश्यक कागदपत्रे या विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

योजनेचे नाव

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. 

 योजनेचा विभाग

कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभाग महाराष्ट्र.

योजनेचे राज्य

महाराष्ट्र.

योजनेतील लाभार्थी

महाराष्ट्रातील नागरिक. 

योजनेचा लाभ

50 लाख रुपये पर्यन्त बिनव्याजी कर्ज.

योजनेचा उद्देश

नवीन व्यवसाय सुरू करण्यास सहकार्य करणे.

योजना अर्ज पद्धती

ऑनलाइन पद्धत

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना उद्देश

 • महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय उभा करण्यास मदत करणे.
 • रोजगार निर्मिती करणे.
 • आर्थिक परिस्थिति नसणाऱ्या तरुणांना बँके मार्फत कर्ज देऊन त्यावरील व्याज महामंडळ भरते.
 • महाराष्ट्रातील तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करणे.
 • सर्व सामान्य कुटुंबाचे जीवनमान सुधारवणे व सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
 • नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुणांना व्याजातुण सूट देणे.
 • राज्यातील बेरोजगारी संपुष्टात आणणे.
 • नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजने अंतर्गत सहज कर्ज उपलब्ध करून देणे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना वैशिष्ट

 • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना सुरवात महाराष्ट्र सरकारने केली आहे.

 • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मध्ये महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ति अर्ज करू शकतो.

 • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया असल्यामुळे अर्ज करणे अत्यंत सोपे आहे.
 • या योजनेमध्ये अर्ज केल्या पासून कर्ज मिळेपर्यंत सर्व माहिती आपणास ऑनलाइन पद्धतीने तपासता येते.
 • योजने मध्ये अर्ज पद्धती ऑनलाइन असल्यामुळे या योजनेमध्ये पारदर्शक पणा आला आहे.
 • दर तीन महिन्याला व्याज परतावा देण्यात येतो.
 • योग्य गरजू व्यक्तिपर्यन्त लाभ देण्यात येतो.

अर्ज पात्रता

 • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
 • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्जदार या योजनेचा एकदाच लाभ घेऊ शकतो.
 • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्जदार 18 वर्ष वय पूर्ण केलेले आहे.
 • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्जदाराचे वय 50 वर्ष पर्यन्त असावे, महिलासाठी 55 वर्ष.
 • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्जदाराचे वर्षीक उत्पन्न 8 लाख रुपये पेक्षा कमी असावे.

नियम व अटी

 • अर्जदार व्यक्तीने या आधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 • दिव्यांग व्यक्ति अर्ज करत असल्यास त्याच्याकडे प्रमाण पत्र असणे आवश्यक आहे.
 • कर्ज फेडीचा हप्ता मासिक असावा.
 • कर्जाचा व्याजदर हा वार्षिक 12 टक्के किंवा त्या पेक्षा कमी असावा. 
 • जर आपण कर्ज हप्ता भरला नाही तर आपणास व्याज परतावा दिल जाणार नाही.
 • अर्जदारा कडे कोणत्याही बँकेची थकबाकी नसावी.
 • अर्जदारच्या आधार ला बँक खाते लिंक असने आवश्यक आहे.
 • गट कर्ज असल्यास गटातील एक तरी व्यक्ति 10 वी उतीर्ण असणे आवश्यक आहे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजने लाभ

 • नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या बेरोजगार तरुणांना 15 लाख रुपये पर्यन्त बिनव्याजी कर्ज दिले जाते.
 • आपण गाटामार्फत कर्ज घेत असाल तर आपणास 50 लाख रुपये पर्यन्त बिनव्याजी कर्ज दिले जाते.
 • आपण घेतलेल्या कर्जावरील व्याज आपणास महामंडळा कडून परत केले जाते.
 • लाभार्थ्याने नियमित हप्ते भरल्यास दरमहा व्याज परतावा दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • राशन कार्ड
 • उत्पन्न प्रमाणपत्र (8 लाख रुपये च्या आत)
 • जात प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराचा फोटो.
 • मोबाइल क्रमांक
 • ईमेल आयडी
 • प्रकल्प अहवाल (Project Report)
 • सीबील रीपोर्ट
 • बँक अकाऊंट स्टेटमेंट .
 • व्यवसाय सुरू करण्या बाबतचा परवाना.

अर्ज प्रक्रिया

 • अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आपणास महामंडळाच्या संकेतस्थळावर जावे लागेल.
 • संकेत स्थळावर नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
 • आपले नाव , आपले आडनाव , मधले नाव , जन्म तारीख , आधार नंबर , मोबाइल नंबर सर्व माहिती व्यवस्थित भरा.
 • आपणास विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून आपला अर्ज सादर करा.
 • अर्ज सादर केल्यानंतर आपणास आपले सर्व कागदपत्रे अपलोड करा.
 • आपणास LOI लेटर मिळेल.
 • LOI लेटर सोबत घेऊन बँक मध्ये आपली फाइल जमा करा.
 • LOI लेटर सोबत वरील कागदपत्रे जोडून द्यावीत.

निष्कर्ष

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ नव उद्योजक घडवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कर्जा वरील व्याज भरते. याची सर्व आवश्यक माहिती आम्ही आपणास दिलेली आहे. आपणास अजून काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या जिल्ह्यातील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ च्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून माहिती मिळवू शकता. आपणास खाली जिल्हा कार्यालयाची माहिती देण्यात आलेली आहे.

   संभाजीनगर विभाग कार्यालय पत्ता यादी SAMBHAJI NAGAR VIBHAGH

   पुणे विभाग कार्यालय पत्ता यादी PUNE VIBHAGH 

   मुंबई विभाग कार्यालय पत्ता यादी MUMBAI VIBHAGH

   नाशिक विभाग कार्यालय पत्ता यादी NASHIK VIBHAG

   अमरावती विभाग कार्यालय पत्ता यादी AMRAWATI VIBHAG

   नागपूर विभाग कार्यालय पत्ता यादी NAGPUR VIBHAG

    आपणास या योजने मध्ये काही शंका असेल तर आपण आम्हाला संपर्क साधून विचारू शकता. जर आपल्या जवळील व्यक्ति, मित्र , नातेवाईक यांना या योजनेची आवश्यकता असेल आणि ते या योजनेसाठी पात्र असतील तर त्यांना या योजनेविषयी अर्ज करण्यास मदत करा. ज्यामुळे ते ही या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

11 thoughts on “अण्णासाहेब पाटील कर्ज योजना”

 1. Pingback: डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना – marathitantradnyanmahiti.com

 2. Pingback: Pm Vishwakarma yojna 2024 – marathitantradnyanmahiti.com

 3. Pingback: कुसुम सोलार पंप – पीडीएफ अपडेट 2023 Alert – marathitantradnyanmahiti.com

 4. Pingback: महिला बचत गट योजना 2024

 5. Pingback: PM Surya Ghar Yojna - पीएम सूर्य घर योजना 2024

 6. Pingback: मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता अर्ज प्रक्रिया

 7. Pingback: आयुष्यमान भारत योजना कार्ड पात्रता अर्ज प्रक्रिया कागदपत्रे

 8. Pingback: घरकुल योजना अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे.

 9. Pingback: मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता अर्ज प्रक्रिया

 10. Pingback: पीएम सूर्य घर योजना 2024 - Har Ghar Solar Yojana Maharashtra Online Registration

 11. Pingback: महाडीबीटी शेतकरी योजना 2024 पात्रता, अर्ज प्रक्रिया, अनुदान

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *