नवीन व्यवसाय करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

    राज्यात रोजगाराच्या संधि उपलब्ध करण्याच्या हेतूने सरकार नेहमी प्रयत्न करत असते. रोजगार निर्माण करण्यासाठी सरकार वेगवेगळे उपक्रम आणि योजना राबवत असते. अशीच एक महत्व पूर्ण योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार मार्फत बँके कडून कर्ज दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून 35 % पर्यंत अनुदान देखील दिले जाते. या लेखाच्या माध्यमातून आज आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना विषयी सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्व माहिती समजून घेण्यासाठी शेवट पर्यंत माहिती वाचा.

    मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना सरकार कडून आर्थिक मदत करण्याच्या हेतूने ही योजना अमलात आणण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार कडून अर्जदाराला 35 %  पर्यंत अनुदान देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून सरकार कडून नवीन व्यवसाय सुरू करण्याऱ्या तरुणांना रोजगार निर्माण करून देण्याचा सरकार चा हेतु आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना महराष्ट्रातील तरुणांना रोजगार निर्माण करण्यासाठी आर्थिक मदत करते. बँके कडून कर्ज देऊन त्या कर्ज रकमेवर 35 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येते. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आजही या योजने मार्फत आपणास आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखों तरुणांनी आपले व्यवसायिक बणण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

योजनेचे नाव

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

कोणामार्फत राबवली जाते

महाराष्ट्र शासन  

विभाग

उद्योग मंत्रालय महाराष्ट्र

अर्ज प्रक्रिया

ऑफलाइन /ऑनलाइन

योजनेची सुरुवात

2019

लाभ

35 % पर्यंत अनुदान वितरित करणे

लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण

अधिकृत संकेतस्थळ

https://maha-cmegp.gov.in/homepage

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना उद्देश

 • राज्यातील उद्योग क्षेत्रात वाढ करून राज्याच्या जिडीपि मध्ये सुधारना करणे.
 • राज्यातील बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वय रोजगार निर्माण करणे.
 • राज्यातील बेरोजगारि कमी करणे, आणि उत्पादन वाढवणे.
 • बेरोजगार तरुण तरुणींना आत्मनिर्भर बनवणे.
 • पुढील पाच वर्षात सुमारे एक लाख सूक्ष्म व लघु व्यवसाय स्थापन करणे.
 • राज्यातील दहा लाख तरुणांना रोजगार संधि उपलब्ध करून देणे.
 • नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुणांना प्रोस्थाहण देणे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना वैशिष्ट

 • ही योजना महाराष्ट्रातील नव उद्योजकासाठी काम करते.
 • नवीन व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना अगदी सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
 • या योजनेमद्धे अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे.
 • ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया असल्यामुळे आपण कोठूनही अर्ज सादर करू शकता.
 • आपले कर्ज मंजूर करेपर्यंत आपणास हेल्पलाइन सुविधा उपलब्ध.
 • आपल्या प्रवर्गानुसार आपणास अनुदान वितरित केले जाते.
 • कर्ज परतफेड कालावधी 3 ते 7 वर्ष ठेवण्यात आलेला आहे.

पात्रता

 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
 • अर्जदार किंवा अर्जदारच्या घरातील व्यक्ति सरकारी नौकरीत कार्यरत नसावा.
 • वैयक्तिक मालकी हक्क / भागीदारी हक्क / वित्तीय संस्थानि मान्यता दिलेले बचत गट पात्र असतील.
 • अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 45 वर्ष च्या दरम्यान असावे.
 • 10 लाख च्या वरील प्रकल्पासाठी 7 वी पास असणे आवश्यक आहे.
 • 25 लाख रुपये च्या वरील प्रकल्पासाठी 10 वी पास असणे आवश्यक आहे.
 • एक कुटुंबातील(कुटुंब पती पत्नी आणि 18 वर्षाच्या आतील मूल) एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
 • अर्जदाराणे या आधी केंद्र अथवा राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत किती अनुदान मिळते.

लाभार्थी श्रेणी

लाभार्थी हिस्सा

(प्रकल्प खर्चाच्या )

अनुदान शहरी

अनुदान ग्रामीण

सामान्य श्रेणी

10 टक्के

15 टक्के

25 टक्के

विशेष (ओबीसी/एसी/एसटी/अल्पसंख्याक/महिला/माजी सैनिक /अपंग)

5 टक्के

25 टक्के

35 टक्के

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत किती लाभ (कर्ज) मिळते

 • उत्पादन करणाऱ्या उद्योग क्षेत्राला 50 लाख रुपये पर्यन्त रक्कम कर्ज स्वरूपात दिली जाते. आपणास मिळालेल्या कर्ज रकमेवर आपल्या वर्ग वारी नुसार आपणस अनुदान देण्यात येते (अनुदान वरील चार्ट नुसार वितरित करण्यात येते)
 • सेवा उद्योगासाठी आपणास 20 लाख रुपये पर्यंत कर्ज रक्कम दिली जाते . आपणास मिळणाऱ्या रकमेणूसार आपणास अनुदान वितरित करण्यात येते. अनुदान वरील चार्ट नुसार वितरित करण्यात येते)

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत येणारे व्यवसाय.

 • दूध उत्पादन
 • पनीर तूप उत्पादन
 • आईसक्रीम बनवणे
 • मोबाइल शॉप
 • लोखंड सीमेंट शॉप
 • कलर शॉप
 • किरण शॉप
 • आईसक्रीम शॉप
 • लाकडी वस्तु बनवणे आणि विकणे
 • शुद्ध शाकाहारी हॉटेल
 • नाष्टा हॉटेल
 • न्हावी दुकान
 • दाल मिल व्यवसाय
 • झेरॉक्स फॉटोशॉप दुकान
 • कापड दुकान
 • कापड बनवणे
 • सीमेंट वस्तु बनवणे
 • कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर
 • कम्प्युटर विक्री शॉप
 • चप्पल बूट बनवणे विक्री करणे
 • फर्निचर बनवणे विकणे
 • पुस्तक वही बनवणे विकणे
 • मेडिकल स्टोर
 • खत बी शॉप
 • ईलेकट्रीक वस्तु विक्री शॉप
 • लोखंडी वस्तु बनवणे
 • काचा पासून वस्तु बनवणे विकणे
 • सोन्याचा व्यवसाय

असे अनेक व्यवसाय आपणास मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत करता येतात व्यवसाय लिस्ट पीडीएफ  पाहण्यासाठी येथे क्लिक करा cmegp buissness list

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत न करता येणारे व्यवसाय (नकारात्मक लिस्ट)

 • मास प्रक्रिया व्यवसाय
 • बिडी बनवने
 • शिगरेट बनवणे
 • तंबाखू जन्य पदार्थ बनवणे आणि विकणे
 • हॉटेल ढाबा (ज्या मध्ये दारू विक्री केली जाते)
 • शेती पीके
 • चहा उत्पादन
 • रबर उत्पादन
 • रेशीम व्यवसाय
 • पशुपालन
 • कुक्कुटपालन
 • फुलशेती

इत्यादि व्यवसाय करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत प्रक्रिया केली जात नाही.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 1. आधार कार्ड
 2. पॅन कार्ड
 3. मतदान कार्ड
 4. रहिवाशी प्रमाणपत्र
 5. उत्पन्न प्रमाणपत्र (तहसील कार्यालय)
 6. प्रोजेक्ट रीपोर्ट
 7. बँक पासबूक
 8. बँक स्टेटमेंट
 9. शाळा सोडलेले प्रमाणपत्र (टि.सी. झेरॉक्स)
 10. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास )
 11. जन्म दाखला
 12. शिक्षण झालेले प्रमाणपत्र
 13. जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास )
 14. विशेष श्रेणी प्रमाणपत्र (लागू असल्यास )

अर्ज प्रक्रिया

    मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. या योजनेमद्धे सहभागी होण्यासाठी आपणास https://maha-cmegp.gov.in/homepage या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरायचा आहे. या संकेतस्थळावर आल्यानंतर आपणस व्यक्तीसाठी ऑनलाइन अर्ज हा पर्याय घेऊन आपणास विचारलेली सर्व माहिती अचूक भरून आपला अर्ज आपण दाखल करू शकतात. अर्ज कसा करायचा हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

निष्कर्ष

    मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत आपणस नवीन व्यवसाय करण्याची संधि उपलब्ध करून दिली जाते. ज्याच्या माध्यमातून आपण आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळवू शकतात. आजच्या या लेखात आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती विषयी सर्व सविस्तर माहिती घेतलेली आहे. या योजनेची आपणास किंवा आपल्या जवळील नातेवाईक / मित्र मंडळी यांना जर गरज असेल तर ही माहिती त्यांच्या पर्यंत पोहोच करा जेणे करून त्यांना देखील या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्याची प्रक्रिया लक्षात येईल.

    या योजनेच्या मध्यमातून सर्व माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आपणास काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकतात आम्ही नक्कीच आपली मदत करू

सतत विचारले जाणारे प्रश्न

 1. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना काय आहे?
 • ही महाराष्ट्र सरकार ची उद्योग क्षेत्रात वाढ करण्यासाठी तरुणांना आर्थिक मदत करणारी योजना आहे.
 1. पीएमईजीपी आणि सीएमईजीपी मध्ये काय फरक आहे?
 • पीएमईजीपी ही केंद्र सरकार मार्फत राबवली जाणारी रोजगार निर्मिती योजना आहे आणि सीएमईजीपी राज्य शासनाकडून रोजगार निर्मिती करण्यासाठी राबवली जाणारी योजना आहे.
 1. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत किती अनुदान मिळते?
 • या योजने अंतर्गत आपल्या वर्गवारी नुसार आपणास 15 ते 35 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येते.
 1. सीएमईजीपी (CMEGP) म्हणजे काय ?
 • Chief Minister Employment Generation Programme.  (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम)
 1. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत किती कर्ज मिळते?
 • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना मध्ये उत्पादन व्यवसायाला 50 लाख व सेवा व्यवसायाला 20 लाख रुपये कर्ज बँके मार्फत दिले जाते.

3 thoughts on “नवीन व्यवसाय करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना”

Leave a comment