मा . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2017 रोजी ही योजना सुरु केली. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) ही केंद्र सरकारची योजना आहे. जी महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते. महिलांना तीन हफ्त्यांमध्ये मदत दिली जाते. जर पात्र महिला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थी असेल, तर तिला अतिरिक्त 1000 रुपये म्हणजेच एकूण 6000 रुपये दिले जातात. जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता. लाभार्थीला ही रक्कम थेट त्याच्या बँक खात्यात टाकली जाते.
योजनेचा लाभ
- या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला 5000 रुपये दिले जातात,
- रक्कम हप्त्यानुसार तिला प्रदान केले जातात.
- जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र महिलेला 1000 रुपये
- अतिरिक्त रक्कम म्हणजेच एकूण 6000 रुपये पात्र महिलेला दिले जातात.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) अंतर्गत दिली जाणारे रक्कम
खालील प्रमाणे.
- पहिला हप्ता : अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी 1000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
- दुसरा हप्ता : गर्भधारणेच्या सहा महिन्यांनतर, 2000रुपयांचा दुसरा हप्ता दिला जातो.
- तिसरा हप्ता : 2000 चा तिसरा हप्ता मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दिला जातो.
योजनेसाठी पात्रता अटी नियम
- अर्जदार भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ लाभार्थ्याला एकदाच मिळू शकतो.
- गर्भपात / मृत जन्माच्या बाबतीत, लाभार्थी त्याच्या उर्वरित हप्त्यांसाठी पात्र असेल.
- राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नियमितपणे काम करणारी व्यक्ति या योजनेसाठी पात्र नसणार.
- प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत
- गर्भवती आणि स्तनदा महिला अर्ज करू शकतात.
- या योजनेत गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका महिला अर्ज करू शकतात.
- लाभार्थी चे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असावे.
- लाभार्थी आणि त्याच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य असेल.
फॉर्म pdf कोठे मिळेल
फॉर्म ऑनलाईन 2023 या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला फॉर्म मिळवावा लागेल. तुम्ही महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईट https://wcd.nic.in./ वर जाऊन किंवा अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकता. फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा प्रधानमंत्री मातृ वंदना योजना PDF.
अर्ज करण्याची प्रक्रिया
जर तुम्हीप्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2023(PMMVY) च्या सर्व अटी पूर्ण करत असाल, तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया येथे दिली आहे:
- सर्वप्रथम या योजनेचा अर्ज प्राप्त करावा.
- हा फॉर्म तुम्ही अंगणवाडी केंद्रातून किंवा आरोग्य सुविधेतून मिळवू शकता.
- किंवा wcd.nic. in या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकता.
- फॉर्मवर संपूर्ण माहिती भरल्यानंन्तर तुमची कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्रात जमा करावी लागतील.
- अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधाद्वारे तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल जी तुम्हाला भविष्यासाठी तुमच्याकडे ठेवावी लागेल.
प्रधान मंत्री मातृत्व वंदना योजना स्टेटस (Status)
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत दिलेली आर्थिक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित केली जाते.
तुम्ही खाली स्टेपद्वारे तपास करू शकता.
- सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट PMMVY-cas.nic. in ला भेट द्यावी लागेल.
- तुमच्या समोर लॉगिन फॉर्म उघडेल.
- तुमचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
- लॉग इन केल्यानंतर, पुढील पृष्ठावर तुम्हाला लाभार्थीची स्थिती जाणून घेण्याचा पर्याय मिळेल.
- तुम्हाला लाभार्थी चा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च वर क्लिक करावे लागेल.
- क्लिक केल्यानंतर पेमेंट स्टेटस तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला मिळालेल्या हप्त्याची संपूर्ण माहिती मिळेल.
- तुम्ही तुमचा पेमेंट रिपोर्ट तपासू आणि डाउनलोड करू शकता.
आवश्यक लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- शेवटच्या मासिक पाळी ची तारीख व गरोदर पणाची नोंदणी तारीख
- प्रसूती पूर्व तपासाच्या नोंदी आणि कार्ड
- बँक पासबुक
- बाळाची जन्मनोंद प्रमाणपत्र
- माता आणि बाल संरक्षण कार्डच्या बाळाच्या लसीकरण नोंदी असलेल्या पानांची झेरॉक्स
- गरोदर नोंदणी केलेल्या आरसीएच लाभार्थी नोंदणी क्रमांक
- इतर वैद्यकीय प्रमाणपत्र
- लाभार्थी महिलेने स्वतःची आणि तिच्या पतीची रीतसर स्वाक्षरी केलेले हमीपत्र /संमती पत्र द्यावे लागेल.
- मोबाईल नंबर – मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा.
- बँक खाते तपशील
- MCP कार्ड ( माता-बाल संरक्षण कार्ड )
- लाभार्थी आणि तिचा पती त्यांच्या ओळखीचा पुरावा ( आधार कार्ड किंवा दोघांचे ओळखपत्र )
- दुसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी, गर्भधारणेच्या 6 महिन्यानंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी दर्शवणारी MCP कार्डची छायाप्रत
- तिसऱ्या हप्त्याची दावा कारणासाठी, लाभार्थीकडून मुलाच्या जन्म नोंदणीची एक प्रत आणि मुलाने लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण केली असल्याचे दर्शवणारे MCP कार्ड.
योजनाचा प्रभाव
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 ही एक महत्वाची योजना आहे जी गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी महत्वाची भूमिका बजावते. या योजनेमुळे महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या बाळाच्या जन्माची तयारी करण्यासाठी मदत झाली आहे. त्यामुळे बालमृत्यू आणि कुपोषण कमी करण्यासही मदत झाली आहे.
योजनेचे काही प्रभाव खालील प्रमाणे आहेत.
- गर्भवती महिलांची आरोग्य सेवा घेण्याची शक्यता वाढली आहे.
- गर्भवती महिलांची पोषण स्थिती सुधारली आहे.
- बाल मृत्यू चा दर कमी झाला आहे.
- कुपोषणाचा दर कमी झाला आहे.
- महिलांची आर्थिक स्थिती सुधारली आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना साठी मदत कक्ष नंबर
- राष्ट्रीय मदत हॉटलाईन: 1800-11-1021
- महिला आणि विकास बाल विकास मंत्रालय: 011-23387046
- महाराष्ट्र सरकार: 022-26001450 या मदत हॉटलाईन वर, तुम्ही खालील गोष्टींसाठी मदत मिळवू शकता
- ईमेल आयडी – min-wcd@gov.in.
निष्कर्ष
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना गर्भवती महिलांना व नवजात बालकांना विकसित करण्याचे काम करते. या योजनेच्या मध्यमातून महिलांना आर्थिक मदत केली जाते. ज्या मुळे गर्भवती महिला व नवजात बालक यांचे संगोपन चंगल्या प्रकारे होते. ज्या मुले गर्भवती महिला व बालकांचा मृत्यू दर खूप मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत मिळत आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजने च्या माध्यमातून गर्भवती महिलांना त्यांच्या बँक खात्यावर 6000 रुपये आर्थिक मदत डीबीटी मार्फत वितरित केली जाते. आपल्या जवळील या योजेणसाठी पात्र असणारे मित्र मैत्रीण किंवा नातेवाईक यांना या योजने विषयी माहिती देण्यात सहकार्य करावे. आपणास या योजनेविषयी काही अडचण असेल तर आपण आम्हाला संपर्क करू शकतात आम्ही आपणास नक्कीच मदत करू.
Faq (वारंवार विचारले जाणारे प्रश्न )
- प्रधान मंत्री मातृ वंदना योजना मध्ये किती रक्कम वितरित केली जाते?
- प्रधान मंत्री मातृ वंदना योजना मध्ये 6000 रुपये रक्कम वितरित केली जाते.
- प्रधान मंत्री मातृ वंदना योजना मध्ये नाव नोंदणी कशी करावी?
- आपण आपल्या जवळील अंगणवाडी केंद्रा मध्ये या योजनेची नाव नोंदणी करू शकतात.
- प्रधान मंत्री मातृ वंदना योजना मध्ये आपले नाव कसे चेक करावे?
- https://wcd.nic.in/ या संकेतस्थळावर जाऊन आपण आपले स्टेटस तपासू शकतात.
- पहिला मुलगा झाल्यास किती रक्कम मिळते ?
- प्रधान मंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत पहिला मुलगा झाल्यास आपणास 6000 रुपये रक्कम वितरित केली जाते.
- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कोणासाठी आहे ?
- देशातील गर्भवती महिला व स्तनदान महिलांसाठी ही योजना आहे.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
5 thoughts on “प्रधानमंत्री मातृ वंदना योजना”