मानवाच्या मुख्य गरजा अन्न वस्त्र आणि निवारा. मूलभूत गरजा भागवण्यासाठी सरकार कडून विविध योजना अमलात आणल्या जातात. मानवाला निवारा हा खूप महत्वाचा घटक बनलेला आहे. त्या अनुषंगाने सरकार कडून गरीब व गरजू व्यक्तीसाठी घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. आज आपण प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण या विषयी सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना 1 एप्रिल 2016 रोजी सुरू करण्यात आली. या योजने मार्फत ग्रामीण आणि शहरी अश्या दोन घटकात विभागलेली आहे. आज आपण या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण विषयी सर्व माहिती पाहणार आहोत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घर बांधणी साठी लाभार्थी व्यक्तीला एक लाख वीस हजार रुपये एवढे अनुदान सरकार कडून देण्यात येणार आहे. त्या अनुदानासाठी पात्रता काय असणार, त्याचे नियन व अटी, आवश्यक कागदपत्रे कोणते, अर्ज प्रक्रिया या सर्व घटकाविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखात घेणार आहोत.
योजनेचे नाव | प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. |
कोणामार्फत राबवली जाते | केंद्र सरकार. |
विभाग | गृहनिर्माण मंत्रालय. |
योजनेची सुरवात | 1 एप्रिल 2016. |
योजनेचा उद्देश | गरजू कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून देणे. |
योजनेचे लाभार्थी | भारतातील पात्र व्यक्ति. |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अनुदान रक्कम | 1 लाख 20 हजार |
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण उद्देश
- देशातील बेघर व्यक्ति यांना स्वत: चे पक्के घर उपलब्ध करून देणे.
- पक्के घर बांधणी साठी गरजू कुटुंबाला आर्थिक मदत करणे.
- बेघर कुटुंब कमी करणे.
- पक्के घर बांधणी सोबतच कुटुंबाला शौचालय व लाइट सुविधा प्रदान करणे.
- प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला लाभ घेता येईल.
- भारतातील प्रत्येक कुटुंबासाठी घर उपलब्ध करणे.
- घराची कमतरता भरून काढणे.
- गरीब कुटुंबाला घर बांधणी साठी आर्थिक मदत करून घर बांधणी साठी प्रोस्थाहण देणे.
- घर बांधणी साठी अर्ज प्रक्रिया सुलभ करून पात्र कुटुंबाला सुलभ पद्धतीने लाभ मिळून देणे.
प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण वैशिष्ट
- घर बांधणी साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया.
- नवीन घर बांधणी साठी प्रती घर एक लाख वीस हजार रुपये अनुदान.
- घर बांधणी सोबतच शौचालय बांधणी साठी आर्थिक मदत करणे.
- शौचालय बांधणी साठी वेगळे 12000 रुपये वितरित केले जातात.
- 25 चौरस मीटर घर बांधण्यासाठी अर्थ सहाय्य दिले जाते.
- घर बांधणी सोबत लाइट सुविधा प्रदान केली जाते.
- पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते.
- अनुदानाची रक्कम लाभार्थी यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केली जाते.
- पात्र कुटुंबाला नरेगा अंतर्गत 90 दिवसाचा रोजगार निर्माण करून दिला जातो.
- प्रधान मंत्री उज्ज्वला योजने मधून लाभ दिला जातो.
प्रधानमंत्री आवास योजना पात्रता.
- अर्जदार भारतीय नागरिक असावा.
- अर्जदाराचे वय 18 वर्ष पेक्षा जास्त असावे.
- अर्जदाराचे वय 55 वर्षा पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदाराकडे पक्के घर उपलब्ध नसावे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 600000 रुपये पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदाराचे बीपीएल यादीत नाव समाविष्ट असावे.
- या आधी कोणत्याही योजनेतून घर बांधणी साठी अनुदान घेतलेले नसावे.
नियम व अटी
- अर्जदाराकडे पक्के घर नसावे.
- अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 55 वर्ष या मध्ये असावे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपये च्या आत असावे.
- लाभार्थी व्यक्तीच्या नावावर दोन चाकी / तीन चाकी / चार चाकी वाहन नसावे.
- 50000 रुपये पेक्षा जास्त मर्यादा असणारे किसान क्रेडिट कार्ड नसावे.
- कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.
- कुटुंबातील कोणताही सदस्य 10000 रुपये पेक्षा जास्त कमवत नसावा.
- अर्जदार इन्कम टॅक्स भरणारा नसावा.
- अर्जदार बहूभूधारक नसावा.
- अर्जदाराकडे लँड लाइन फोन नसावा.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- बँक पासबूक
- पासपोर्ट साइज फोटो
- जॉब कार्ड
- राशन कार्ड झेरॉक्स.
- मोबाइल क्रमांक.
- कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड.
- उत्पन्न प्रमाण पत्र.
- जागेचे कागदपत्र.
- शपथ पत्र.
अर्ज प्रक्रिया
सध्या तरी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन आहे. ऑनलाइन अर्ज पद्धती सुरू झाल्यानंतर आपण आपला अर्ज खालील पद्धतीने भरू शकतात.
ऑफलाइन अर्ज पद्धती.
- आपणास प्रधान मंत्री आवास योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जा मध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यावी.
- अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावी.
- अर्ज आपल्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समिति मध्ये दाखल करावा.
- अर्ज दाखल केल्यानंतर अर्जा ची पोहोच आपल्याकडे घ्यावी.
ऑनलाइन अर्ज पद्धती.
- आपणास सर्व प्रथम https://pmaymis.gov.in/ या संकेतस्थळावर जावे लागेल.
- या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपणास अर्ज करा पर्याय निवडावा लागेल.
- आपल्या समोर अर्ज फ्रॉम उघडेल.
- अर्जामद्धे सर्व माहिती व्यवस्थित भरून अर्ज साबमिट करावा.
निष्कर्ष
आपणास प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ घेयचा असल्यास आपण अर्ज करू शकतात. वरील पात्रता व निकष जर आपण पूर्ण करत असाल तर आपण प्रधान मंत्री आवास योजना मध्ये अर्ज करू शकता. अर्ज करण्याची सर्व माहिती आपणास देण्यात आलेली आहे.
आपण किंवा आपल्या जवळील नातेवाईक मित्र यांना जर या योजनेची आवश्यकता असेल. आणि ते या योजनेसाठी पात्र असतील। तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा जेणे करून त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. आपणास अर्ज करण्यासाठी काही अडचण येत असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा आम्ही आपल्याला मदत करू.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- प्रधान मंत्री आवास योजना मध्ये किती अनुदान मिळते ?
- प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये 1,20,000 रुपये अनुदान दिले जाते.
- प्रधान मंत्री आवास योजने मध्ये अर्ज कसा करावा ?
- प्रधान मंत्री आवास योजने मध्ये आपणास सध्या तरी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
- प्रधान मंत्री आवास योजने साठी ऑनलाइन अर्ज करू शकतो का ?
- नाही आपण सध्या तरी प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करू शकत नाही.
- प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत कोण पात्र असतील ?
- गरीब व बेघर व्यक्ति या योजनेसाठी पात्र असतील.
- घरकुल अर्ज कण्यासाठी आपणास कोणते कागदपत्रे आवश्यक असतील ?
- आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबूक, पासपोर्ट साइज फोटो, जॉब कार्ड, राशन कार्ड झेरॉक्स,. मोबाइल क्रमांक. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
4 thoughts on “प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण”