विधवा पेन्शन योजना पात्रता आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया

     

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

         राज्य सरकारने अशीच एक नवीन योजना सुरू केली आहे जी विधवा महिलांसाठी आहे जी विधवा महिलांच्या जीवनात येणाऱ्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने एक योजना अमलात आणलेली आहे. विधवा पेन्शन योजना मध्ये दरमह 1500 रुपयांची पेन्शन दिली जाते. विधवा पेन्शन योजनेचा असा उद्देश आहे की त्या महिलेची पती जर मृत्यू पावला तर त्या महिलेने काय करायचं जे आजपर्यंत आपल्या नवऱ्याच्या जिवावर राहत होते. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला लेकराची (मुलांची) काळजी कोण घेईल. असा प्रशन त्या महिलेला पडतो जी आज पर्यंत आपल्या पतीवर अवलंबून होते. पतीचा मृत्यू झाल्यानंतर ही सर्व जिम्मेदारी त्या महिलेवर असते. अशा विधवा महिलेचे राज्य सरकारने विचार केला आणि विधवा पेन्शन योजना अमलात आणली झी कि दरमहा 1500 रुपयाची पेन्शन जेणेकरून विधवा महिलेला तिच्या मुलांची या योजनेच्या आधारे पालन पोषण करू शकेल.

      विधवा महिलेला एकापेक्षा जास्त अपत्य असल्यास या योजनेअंतर्गत 2000 रुपयाची आर्थिक मदत केली जाईल आणि एकच आपत्त असल्यास  1500  रुपयाची आर्थिक मदत दिली जाईल. त्या महिलेची मुले 25 वर्षाची होईपर्यंत महिलेला योजनेचा लाभ मिळेल. जर एखाद्या विधवा महिलेला मुलगा नसेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ ती महिला आहे तोपर्यंत मिळेल. ज्या महिलेची परिस्थिती खूपच बिकट आहे ज्याच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आहेत अशा महिलेने या योजनेचा लाभ नक्कीच घ्यावा. जेणेकरून त्या महिलेला एक सरकारची खूप मोठी मदत होईल. विधवा पेंशन योजनेअंतर्गत जी रक्कम दिले जाईल ती लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

      या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेने अर्ज करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचावा आपण या लेखात अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे या योजनेचा उद्देश या योजनेसाठी कोण कोण पात्रता आहे या सर्वांची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. या लेखाची माहिती आपण आपल्या नातेवाईकांना व जवळील विधवा महिलेला या योजनेची माहिती द्यावी. जेणेकरून त्या विधवा महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल.

विधवा पेन्शन योजना

योजनेचे नाव

 विधवा पेन्शन योजना  

राज्य

महाराष्ट्र राज्य

लाभार्थी

राज्यातील विधवा महिला.  

लाभ

1500 रुपये महिना

योजना कधी सुरू झाली

1980 साली.

योजनेचे उदिष्ट

विधवा महिला यांना आर्थिक सहाय्य करणे.  

अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन / ऑफलाइन

योजनेचा विभाग

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य

विधवा पेन्शन योजनेचा उद्देश

      विधवा महिलेला आपल्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर कसल्याही प्रकारचे कोणाचा साहारा नसतो. ती महिला आतापर्यंत आपल्या पतीच्या जीवावर राहत असते व पतीचा मृत्यू झाला तिच्या मुलांना कोण बघायचं त्याची जिम्मेदारी ही त्या महिलेवर पडती. अशा परिस्थितीमध्ये तिने काय करावे अशा लोकांचा राज्य सरकारने विचार केला आणि विधवा पेन्शन योजना अमलात आणली. या योजनेचा लाभ घेऊन विधवा महिलाला एक खूप मोठा सहारा मिळेल. तिच्या मुलांची काळजी घेईल. पतीचा मृत्यू झाल्यावर एक जगण्याला त्या महिलाला या योजनेच्या आधारे अशा मिळेल. अशा या योजनेचा उद्देश आहे. विधवा पेन्शन योजनेअंतर्गत विधवा महिलांना दरमहा 1500 रुपयाची रक्कम दिली जाईल. असा या योजनेचा उद्देश आहे राज्यातील विधवा महिलेला आर्थिक मदत करणे या योजनेचा उद्देश आहे.

     विधवा महिलेला  पतीचे  निधन झाल्या नंतर  घर खर्च भागवणे कठीण जाते. या सर्व अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारने विधवा  महिलाला आर्थिक मदत देण्याचा उद्देश आहे. दरमहा 1500 ते 2000 अशी मदत विधवा महिलेला देण्यात येईल जेणेकरून ती आपल्या खर्च भागवणे सोपे जाईल.

    त्यासाठी विधवा महिलेने विधवा पेंशन योजनेचा अर्ज भरावा. सरकारची मदत त्या महिलांना मिळेल आणि सरकारचा या मागचा उद्देश पूर्ण होईल.

विधवा पेन्शन योजना लाभ

  1. महाराष्ट्र राज्यांमध्ये दिला जाणारा लाभ याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
  2. महाराष्ट्र राज्यातील सर्व विधवा महिलेला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  3. महाराष्ट्रातील विधवा पेन्शन योजनेचा लाभ हा आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दिला जाऊ शकतो.
  4. या योजनेच्या आधारे एक महिला आपल्या मुलाची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकते.
  5. विधवा पेन्शन योजना मुळे महिलाला त्यांच्या जीवना च्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.
  6. सरकारने जी रक्कम दिली आहे ती रक्कम थेट महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
  7. विधवा पेन्शन योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दीड हजार रुपये दर महिना रक्कम दिली जाईल.
  8. विधवा पेन्शन योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विधवा महिलेला जर एक अपत्य पेक्षा जास्त अपत्य असल्यास दरमहा 1500 रुपये रक्कम  त्या महिलेला दिली जाईल.
  9. या योजनेच्या माध्यमातून सरकार विधवा महिलेला अशा प्रकारे लाभ देऊ शकतात ती महिला आपल्या कुटुंबाची काळजी करू शकेल आपल्या मुलांची एक चांगल्या प्रकारेकाळजी घेऊ शकेल.

विधवा पेन्शन योजनेच्या अटी व नियम

  • अर्जदार महिलाही महाराष्ट्रात राज्याची रहिवासी असणे खूप आवश्यक आहे.
  • अर्जदार महिलेला कोणत्याही प्रकारे पेन्शन योजनेचा लाभ मिळत असेल तर त्या महिलेला अर्ज करता येणार नाही.
  • अर्जदार महिला शासनाची नोकरी असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • लाभार्थी महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • महिलाच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे 21 हजारापेक्षा जास्त नसावे अन्यथा ती महिला या योजनेच्या नियमात बसत नाही.
  • महाराष्ट्र राज्यातील गरीब व दारिद्र रेषेखालील महिला या योजनेच्यानियमात बसेल.

विधवा पेन्शन योजना अवश्य लागणारी कागदपत्रे

  • लाभार्थी चे आधार कार्ड.
  • जन्म प्रमाणपत्र.
  • पतीचे मृत्यू प्रमाणपत्र.
  • जात प्रमाणपत्र.
  • बँक पासबुक.
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
  • मतदान ओळखपत्र.
  • मूळची रहिवासी प्रमाणपत्र.
  • मोबाईल क्रमांक.
  • पासपोर्टआकाराचे फोटो.

विधवा पेन्शन योजना पात्रता

  • आपण या लेखांमध्ये महाराष्ट्र राज्यांमध्ये पात्रता पाहणार आहोत.
  • अर्जदार महिला कोणत्याही प्रकारचे शासनाची नोकरी नसावी अन्यथा ती व्यक्ती या योजनेसाठी पात्रता नाही.
  • अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे तीच व्यक्ती या योजनेसाठी पात्रता आहे.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 21 हजारापेक्षा जास्त असल्यास ती व्यक्ती या योजनेसाठी पात्रता नाही.
  • जर विधवा महिलेचा पुनर्विवाह झाला तर ती या योजनेसाठी पात्रता नाही.
  • अर्जदार महिलांचे बँक खाते आधार कार्ड अशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी महिलाचे वय 40 ते 65 वर्ष वयोगटातील असले पाहिजे व ती महिला गरीब दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिला या योजनेसाठीपात्रता आहे.

विधवा पेन्शन योजना अर्ज करण्याची पद्धत.

    या योजनेसाठी अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत ऑनलाइन ऑफलाईन अशा दोन पद्धती आहेत.

ऑफलाइन पद्धत

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसील   कार्यालयातील सेतू केंद्राला भेट द्या.

ऑनलाइन पद्धत

       ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही अधीकृत https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ वेबसाईटला ओपन करावी त्यात सांगितलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी आणि अर्ज सबमिट करावा.

निष्कर्ष

    सरकारने विधवा पेन्शन योजना ही विधवा महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे .विधवा महिलांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे. विधवा महिला चा विचार करून सरकारने ही योजना आमलात आणलेली आहे महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलानी या योजनेचा लाभ घ्यावा. या  योजनेचा अर्ज केल्यानंतर आपल्याला या योजनेमध्ये जी मानधन दिली जाते त्याचा लाभ घेता येईल. या योजनेच्या माध्यमातून विधवा महिलेचे जीवनात आर्थिक मदत होईल आणि विधवा महिलेचे जीवन सुधारेल आपण आपल्या जवळील नातेवाईकांना किंवा विधवा महिलेला या योजनेची माहिती द्यावी व अर्ज करायला सांगा जेणेकरून विधवा महिलांना मोठी मदत होईल. व तिच्या कुटुंबाची ती चांगली काळजी घेऊ शकेल.

विधवा पेन्शन योजनेमध्ये विचारले जाणारे प्रश्न

 

  1.   विधवा पेन्शन योजनेचा लाभ किती दिला जातो?
  • विधवा पेन्शन योजनेचा लाभ हा 1500 ते 2000 असा दरमहा दिला जातो. सहाशे रुपये ही रक्कम दरमहा दिली जाते व 2000 रुपये ही रक्कम एक अपत्य पेक्षा जास्त असल्यास महिलांना दिली जाईल.

       2     विधवा पेंशन योजना चा लाभ त्या महिलेला कधीपर्यंत घेता येईल?

  • विधवा पेन्शन योजनेचा लाभ हा त्या महिलेचे मुले 25 वर्षे होईपर्यंत याचा लाभ घेता येईल जर एखाद्या महिलेला मुलं नसेल तर त्या महिलेला त्याचा लाभ तिचा मृत्यू होईपर्यंत घेता येईल.

       3    विधवा पेन्शन योजनेचा उद्देश काय आहे?

  • महाराष्ट्र राज्यातील विधवा महिला आर्थिक मदत व्हावी असा या योजनेचा उद्देश आहे गरीब व आर्थिक दृष्ट्या दूरवर असणाऱ्या विधवा महिलेला तिच्या कुटुंबाची एक चांगल्या प्रकारे काळजी घेता येईल हा या योजनेचा उद्देश आहे.

       4   विधवा महिला चे वय किती असले पाहिजे?

  • विधवा महिला चे वय 18 ते 65 वयोगटातील महिलांना याचालाभ घेता येतो.

1 thought on “विधवा पेन्शन योजना पात्रता आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया”

Leave a comment