जननी सुरक्षा योजना

जननी सुरक्षा योजना अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे

     आपण आज केंद्र सरकारच्या जननी सुरक्षा योजना या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा संपूर्ण लेख वाचवा आणि ज्यांना या जननी सुरक्षा योजनेची माहिती नाही त्यांना पण या योजनेची माहिती द्यावी अशा बऱ्याशा योजना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या आहेत त्या आपल्याला माहिती नसते. म्हणून आपण त्या योजनेचा लाभ घेण्यात येत नाही म्हणून तुम्ही वाचा व  दुसऱ्याला पण याविषयी माहिती सांगा जेणेकरून या योजनेचा लाभ त्यांना पण घेण्यात येईल.

      देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकार अशा परिवाराची काळजी करते की ज्या परिवाराची आर्थिक दृष्ट्या दुर्बळ व गरीब लोक आहेत. अशा लोकांना सोय नसती व जे दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असणाऱ्या व आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या लोकांना कोणतीही  कमाईचे साधन नसतात त्यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट असते अशा लोकांचा सरकार कडून खूप विचार केला जातो.

       ज्या लोकांची परिस्थिती खूप बिकट आहे व दारिद्र्यरेषेखालील गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या अशा लोकांना विचार करून जननी सुरक्षा योजना केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे या योजनेचा लाभ देशातील गर्भवती महिला घेऊ शकतात.

       ही योजना 12 एप्रिल 2005 या दिवशी सुरू करण्यात आली या योजनेचा असा उद्देश आहे की प्रस्तुती दरम्यान आई व बालकाचा मृत्यू दर कमी करणे व गरीब आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या परिवारातील महिलांची व नवजात बालका ची काळजी घेणे यासाठी जननी सुरक्षा योजना राबविण्यात आली. या योजनांमध्ये महिलांचे वय 19 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असले पाहिजे याचा लाभ फक्त दोन जिवंत अपत्य पर्यंत घेता येतो ही योजना राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अतंर्गत राबविण्यात येत आहे.

    भारतामध्ये गरोदरपणा महिलांचा मृत्यू होत होता. जन्मलेल्या बाळाची काळजी न घेतल्यामुळे त्या बाळाचा पण मृत्यू होत होता. ते प्रमाण खूप जास्त होते यामध्ये जास्तीत जास्त गरीब परिवारातील महिला चा समावेश होता. होणारा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन वेगवेगळ्या उपाय योजना या देशांमध्ये राबवित असते. गरोदर महिलांना व त्या बालकांना आर्थिक मदत केली तर त्यांचे आरोग्य सुधारेल या हेतूने केंद्र शासनाकडून ही योजना राबवण्यात आली आहे‌. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत समाजातील गर्भवती महिलांचे आरोग्य आणि सुरक्षित प्रस्तुती केली जाते. गर्भवती महिलांचे व त्यांच्या बाळांची काळजी घेणे व त्यांचे आरोग्य सुधारणे असा सरकारचा विचार आहे. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गरोदर महिलांना सर्व तपासण्या आणि बाळाची प्रस्तुती मोफत केली जाते. गरोदर महिलांची प्रस्तुती ही दवाखान्यातच व्हावी अशी केंद्र सरकारच्या इच्छा आहे. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गर्भवती महिला व नवजात बालकांचा मृत्यू दर कमी करणे हा सरकारचा विचार आहे.

    जन्माला येणाऱ्या त्या बाळाला सुरक्षित ठेवणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना देशातील गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या महिलांना याचा लाभ घेता येणार आहे. जननी सुरक्षा योजनेचा लाभ हा शहरी व ग्रामीण असे दोन्ही भागातील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. शहरात राहणाऱ्या गरीब व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील गरोदर महिलांना सुरक्षित प्रस्तुतीसाठी हजार रुपये मदत दिली जाईल व ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील गरोदर महिलांना सुरक्षित प्रस्तुतीसाठी1400 रुपयांची मदत केली जाईल. जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या महिलाचे वय 19 किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

जननी सुरक्षा योजना

योजनेचे नाव

जननी सुरक्षा योजना

कोणी सुरू केली

केंद्र सरकार

कधी सुरू केली

12 एप्रिल 2005

या योजनेचे लाभार्थी

देशातील गरीब कुटुंबातील गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ

योजनेचा उद्देश

देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या कुटुंबातील गर्भवती महिलांना मोफत प्रस्तुती आणि आर्थिक मदत करणे.

अर्ज करण्याची पद्धत

ऑफलाइन / ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट

https://nhm.gov.in/

योजनेचा विभाग 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय विभाग 

 

जननी सुरक्षा योजनेचा उद्देश

    ग्रामीण व शहरी भागातील गर्भवती महिलांना आणि दारिद्र्यरेषेखालील गरीब महिलांना मोफत तपासणी मिळवणे हा या योजनेचा उद्देश आहे. ज्या लोकांची परिस्थिती खूप बिकट आहे ज्यांची रुग्णालयात योग्य उपचार करून शकत नाहीत अशा कुटुंबातील महिलांना जननी सुरक्षा योजना अंतर्गत मोफत उपचार मिळतील. गरोदरपणामध्ये महिलांची व त्यांच्या बालकांची काळजी न घेतल्यामुळे मृत्यूचे प्रमाण खूप होते परंतु आता या योजनेमुळे महिला व  नवजात बालकाची काळजी घेता येते त्यांना जास्तीत जास्त संरक्षण देण्याचा या योजनेचा उद्देश आहे.

    जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गरोदर महिला ची प्रस्तुती झाल्यानंतर बँक खात्यामध्ये पैसे जमा करणार असल्यामुळे त्या महिलेला तिची व तिच्या बाळाची काळजी घेता येते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत प्रजनन आणि बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत आई आणि तिच्या नवजात बाल मृत्यू कमी करणे हा जननी सुरक्षा योजनेचा उद्देश आहे.

   गरीब व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील गर्भवती महिलांना या योजनेचे आर्थिक मदत मिळेल.

   जननी सुरक्षा योजनेअंतर्गत आशा सेविकेला पण आर्थिक मदत मिळेल.

    केंद्र सरकारने दारिद्र्यरेषेखालील गर्भवती महिलांना जननी सुरक्षा योजनेअंतर्गत सहा हजार रुपये रक्कम देण्यासाठी मंजुरी दिली आहे.

जननी सुरक्षा योजनेचा लाभ

 • जननी सुरक्षा योजनेचा लाभ हा देशातील गर्भवती महिलांना दिला जाणार आहे. व दारिद्र्यरेषेखालील आणि गरीब कुटुंबातील गर्भवती महिला या जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • गर्भवती महिलांची व तिच्या नवजात बालकांची काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारने सहा हजार रुपये रक्कम मदत केली आहे.
 • ग्रामीण व शहरी भागातील आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांना मोफत तपासणी याचा पण लाभ या योजनेद्वारे दिला जाणार आहे.

जननी सुरक्षा योजना पात्रता

 • जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिला भारत देशातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिला ही दारिद्र रेषेखालील व गरीब कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थी महिले चा बालविवाह झालेला नसावा तिचे वय शासनाच्या नियमात बसणे आवश्यक आहे तरच ती या योजनेसाठी पात्रता आहे.
 • शासनाने अनेक राज्यांमध्ये प्रस्तुतीसाठी विविध केंद्र उभारले आहेत.
 • जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थीची वय 19 किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे अन्यथा ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसेल.
 • जननी सुरक्षा योजना मध्ये फक्त गर्भवती महिलांच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

जननी सुरक्षा योजना अटी व नियम

 • जननी सुरक्षा योजनेचा लाभ फक्त गर्भवती महिलाच घेऊ शकतात.
 • लाभार्थी महिलेचे वय 19 किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
 • जननी सुरक्षा योजनेचा लाभ हा ग्रामीण व शहरी भागातील महिलांना दिला जाईल.
 • या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील आणि गरीब कुटुंबातील महिला लाभ घेऊ शकतात.
 • लाभार्थी चा बालविवाह झालेला नसावा तिचे वय शासनाच्या नियमात बसणारी असावी.
 • लाभार्थी महिलाही देशातील मूळची रहिवासी असणे आवश्यक आहे.

जननी सुरक्षा योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.

 • लाभार्थीचे आधार कार्ड.
 • मतदान कार्ड . 
 • रहिवासी दाखला.
 • राशन कार्ड.
 • बँक खाते.
 • पासपोर्ट साईज फोटो.
 • प्रस्तुती झालेले प्रमाणपत्र.
 •  गर्भवती असल्याचा दरम्यान केलेली सोनोग्राफीचे रिपोर्ट.
 • एम सी एच कार्ड.( लसीकरण वेळापत्रक कार्ड )
 • मोबाईल नंबर.
 • ईमेल आयडी 

जननी सुरक्षा योजना अंतर्गत आशा कर्मचारीला मिळणारी आर्थिक मदत.

        ग्रामीण भागातील महिलेची प्रस्तुती सरकारी रुग्णालयात झाल्यास आशा कर्मचाऱ्याला 600 रुपये इतके  मानधन दिली जाते. 300 रुपये ही प्रस्तुती सर्व उपचार व्यवस्थित करून दिल्याबद्दल आणि उर्वरित 300  रुपये सरकारी रुग्णालयात दाखल होण्यासाठी त्या महिलेला प्रोत्साहित केले असे सिद्ध झाल्यानंतर त्या कर्मचारीला देण्यात येते. शहरी भागातील महिलेला प्रस्तुती सरकार रुग्णालयात झाल्यास अशा कर्मचारीला 400 रुपये इतकी मानधन दिली रुपये ही प्रस्तुती पूर्ण उपचार व्यवस्थित झाले म्हणून आणि उर्वरित 200 रुपये महिलेची प्रस्तुती ही सरकारी रुग्णालयात करण्यासाठी प्रोत्साहित केले असे आशा कर्मचारीला दिली जाते अशा प्रकारे आशा कर्मचारीला या योजनेचा लाभ  दिला जातो.

जननी सुरक्षा योजना अर्ज करण्याची पद्धत

    आपल्याला ऑफलाइन ऑनलाईन अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत आपण कोणत्याही पद्धतीने अर्ज करू शकता. 

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

    आपण आपल्या जवळील आशा कर्मचाऱ्याला या योजनेचा अर्ज भरता येईल आपण आपल्या आशा कर्मचाऱ्यांचे संपर्क साधावा.  जी कागदपत्रे आवश्यक लागतात सर्व आशा कर्मचारी कडे जमा करावे. अशाप्रकारे तुम्ही ऑफलाईन अर्ज भरू शकतात.

ऑनलाइन अर्ज पद्धत
 • आपल्या सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. https://nhm.gov.in/
 • या संकेत संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला अर्ज करा पर्याय निवडावा लागेल
 • आपल्यासमोर अर्ज फॉर्म उघडेल
 • अर्जामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरून अर्ज सबमिट करावा

 अशाप्रकारे आपण ऑनलाइन अर्ज भरू शकतात

विचारले जाणारे प्रश्न

1   जननी सुरक्षा योजना कोणी सुरू केली

 • सुरक्षा योजना केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली

2 जननी सुरक्षा योजना कधी सुरू केली

 • जननी सुरक्षा योजना १२ एप्रिल 2005 रोजी सुरू करण्यात आली

3 जननी सुरक्षा योजनेचा उद्देश काय आहे

 • जननी सुरक्षा योजनेचा उद्देश आहे की देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्वा असणाऱ्या कुटुंबातील गर्भवती महिलांना मोफत प्रस्तुती आणिआर्थिक मदत करणे

3 thoughts on “जननी सुरक्षा योजना अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे”

 1. Pingback: प्रधानमंत्री मातृ वंदना योजना पात्रता आवश्यक कागदपत्रे अर्ज

 2. Pingback: महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना 100 टक्के अनुदान 2024

 3. Pingback: किसान विकास पत्र योजना सरकारची दामदुप्पट करणारी 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *