बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
महाराष्ट्र सरकार ने बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या सवलती देणार आहे. या योजनेच्या माध्यामातून बांधकाम कामगार करणाऱ्या कामगाराला 2000 ते 5000 रुपये पर्यन्त आर्थिक मदत दिली जात आहे. तसेच बांधकाम कामगार योजनेमध्ये सहभागी झालेल्या कामगारांना विविध सवलती दिल्या जात आहेत. ज्या मध्ये लग्न, मुलांचे शिक्षण , घरकुल , संसार उपयोगी वस्तु अशा अनेक सवलती सरकार कडून बांधकाम कामगार योजना नोंदणीकृत कामगारांना देण्यात येतात. योजने मध्ये लाभ घेण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे. त्या साठी आवश्यक कागदपत्रे कोणती. अर्ज कोणत्या प्रकारे करावा. या सर्व घटकाची सविस्तर माहिती आपण आपण आज या लेखात घेणार आहोत. या लेखातून आपणास पूर्ण अर्ज करण्यासाठी काय प्रक्रिया आहे हे आपणास सांगण्यात येणार आहे.
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
योजनेचे नाव | बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
योजना कधी सुरू केली | 18 एप्रिल 2020 |
योजना सुरू करणार विभाग | उद्योग ऊर्जा व कामगार विभाग |
लाभार्थी | महाराष्ट्रातील कामगार |
लाभ | 2000 ते 5000 रुपये |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahabocw.in/ |
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म उद्देश
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
बांधकाम कामगार योजनेचा मुख्य उद्देश विविध योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना सवलती देणे आहे. इमारत बांधकाम कामगार तसेच इतर बांधकाम कामगार यांना त्यांच्या दैनंदिन तसेच आर्थिक सहाय्यता प्रदान करणे. बांधकाम कामगारांच्या मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी त्यांना विविध योजनेमार्फत सवलत प्रदान करणे.बांधकाम कामगारांना विविध योजनेच्या फायदा केला जातो. कामगारांना नोंदणी केल्यानंतर 5000 रुपये आर्थिक मदत मिळते. या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांचे जीवनमान चांगले व्हावे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून कामगारांना आर्थिक , शौक्षणिक , आरोग्य , घरकुल तसेच सामाजिक सुरक्षा देण्याचा हेतु सरकारने ठेवला आहे.
बांधकाम कामगार ऑनलाइन फॉर्म उदिष्ट
- सुलभ नोंदणी प्रक्रिया.
- सर्व बांधकाम कामगार नोंदणी करू शकतील.
- लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सोपी आहे.
- विविध लाभ देण्यासाठी कल्याणकारी योजना सोप्या केलेल्या आहेत.
- लाभाची रक्कम थेट लाभार्थी यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
- कामगार नोंदी वाढवण्यासाठी कामाच्या ठिकाणी कँप लावणे.
- विविध योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणे.
बांधकाम कामगार ऑनलाइन फॉर्म कामाची यादी
- इमारत बांधकाम
- रस्ते बांधकाम
- रेल्वे बांधकाम
- सिंचन बांधकाम
- रेडियो बांधकाम
- धरण बांधकाम
- पण्याचे तळे बांधकाम
- रस्त्यावरील बोगद्याचे बांधकाम
- पूल बांधकाम
- बंधारे बांधकाम
- पुर नियंत्रण बांधकाम
- नाली बांधकाम
- धरण बांधकाम
- कालवे बांधकाम
- पाइप लाइन बांधकाम
- पानी पुरवठा बांधकाम
- वीज पुरवठा बांधकाम
- टॉवर्स बांधकाम
- सौर पॅनल बांधकाम
- वॉटर फिल्टर बांधकाम
- अग्निशामन यूनिट बांधकाम
- सार्वजनिक बांधकाम
अश्या अनेक प्रकारच्या बांधकाम कामगारांना सरकार कडून अर्ज करण्याची व लाभ घेण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे.
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म मिळणारे लाभ
- विवाह खर्चासाठी 300 00 रुपये दिले जातात.
- व्यक्तिमहत्व पुस्तक संच वाटप केले जातात.
- बांधकाम कामगार हत्यार / अवजार खरेदी साठी 5000 रुपये अर्थसाहाय्य.
- प्रधान मंत्री जीवन ज्योति विमा अंतर्गत नोंदणी केली जाते.
- कामगारांसाठी कौशल्य वृद्धिकरण लाभ.
- मूल/ मुली / पत्नी यांच्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी 2500 ते 100000 रुपये पर्यन्त लाभ.
- दोन पाल्यांना संगणक शिक्षण शुल्क दिले जाते.
- अपत्य जन्मसाठी नैसर्गिक प्रसूती 15000 व शस्त्रक्रिया झाल्यास 20000 लाभ दिल जातो.
- कुटुंबातिल सदस्याला गंभीर आजार झाल्यास उपचारासाठी 100000 रुपये मदत दिली जाते.
- पहिल्या मुलगी अपत्य नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे 100000 रुपये जमा केले जातात.
- कामगाराला 75 टक्के अपंगत्व झाल्यास 200000 रुपये अर्थसाहाय्य केले जाते.
- कामगाराचा कामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला 500000 रुपये आर्थिक मदत.
- कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 200000 रुपये अर्थसाहाय्य.
- कामगाराला घर खरेदी साठी 600000 रुपये पर्यन्त अर्थसाहाय्य.
- कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी साठी 10000 रुपये आर्थिक मदत.
- कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा पती यांना 24000 रुपये आर्थिक मदत.
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय 18 ते 60 च्या दरम्यान असावे.
- कामगाराने सलग 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
- बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ नोंदणी असावी.
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- जन्म दाखल / वय पुरावा
- राशन कार्ड
- मोबाइल नंबर
- ओळख प्रमाणपत्र
- 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट साइज फोटो
बांधकाम कामगार ऑनलाइन फॉर्म अर्ज प्रक्रिया
- प्रथम आपण https://mahabocw.in/ या संकेतस्थळावर जावे.
- कामगार पर्यायावर आपणास नोंदणी पर्यायावर क्लिक करावे लागेल .
- आपणास आपली जन्म तारीख भरावी लागेल
- त्या नंतर 90 दिवस काम करत आहात का पर्यायावर क्लिक करा.
- आपल्याकडे रहिवासी पत्याचा पुरावा आहे का त्या वर क्लिक करा.
- आपल्याकडे आधार कार्ड आहे का या पर्यायावर क्लिक करा.
- तुमची पात्रता तपासा या पर्यायावर क्लिक करा.
- आपल्या समोर नवीन फॉर्म उघडेल.
- त्यात आपला जिल्हा निवड करा .
- आपला आधार नंबर भरा.
- आपला मोबाइल क्रमांक भरा.
- आपली वैयक्तिक माहिती भरा.
- आपला रहिवासी पत्ता भरा.
- आपले कौटुंबिक माहिती भरा.
- 90 दिवस काम केलेल्या दाखल्याची माहिती भरा.
- आपला फोटो अपलोड करा.
- आपला अंगठा द्या
- आपले आधार कार्ड अपलोड करा.
- 90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र अपलोड करा.
- सहमति पर्यायावर क्लिक करा.
- सेव पर्यायावर क्लिक करा.
- त्या नंतर आपल्या मोबाइल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी भरून घ्यावा.
- व्हॅलीड ओटीपी पर्यायावर क्लिक करावे.
- त्या नंतर आपला अर्ज यशस्वी रित्या सबमिट झाला आहे.
- आपल्या समोर आपला पोहोच पावती क्रमांक दिसेल.
निष्कर्ष
महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्वपूर्ण योजना अमलात आणलेली आहे. राज्यातील सर्व बांधकाम कामगार यांनी या योजने मध्ये नोंदणी करून घ्यावी. नोंदणी केल्यानंतर आपणास योजनेतील वरील सर्व लाभ घेता येतील. या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगार यांना आपल्या दैनंदिन जीवनात खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगार यांची आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारणार आहे.
आपण किंवा आपल्या जवळील व्यक्ति ज्याना या योजनेमध्ये अर्ज करायचं आहे अश्या व्यक्तिनि लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा. आपल्या जवळील मित्र नातेवाईक यांना या योजनेविषयी माहिती द्यावी. आपणास किंवा आपल्या मित्र नातेवाईक यांना अर्ज करताना काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. आम्ही आपणास नक्कीच मदत करू.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न.
- बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो?
- जे कामगार शासकीय किंवा खाजगी बांधकाम करतात ते सर्व कामगार या योजनेत नोंदणी करू शकतात.
- बांधकाम कामगार योजना काय आहे?
- बांधकाम कामगार योजना ही बांधकाम कामगारांसाठी त्यांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी कार्य करते.
- BOWC नोंदणी का आवश्यक आहे ?
- BOWC नोंदणी केली तरच आपणास बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेमध्ये मिळणारे लाभ मिळू शकतात.
- BOWC चा फायदा काय ?
- BOWC मध्ये नोंदणी केल्यास कामगारांना पेन्शन, विमा, शौक्षणिक सवलत, आरोग्य ,अपघात या सारख्या घटकांचा लाभ मिळतो.
- बांधकाम कामगार ऑनलाइन फॉर्म कसा भरावा?
- आपण https://mahabocw.in/ या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात.
Kamgar
Bandhakam Kamgar Card