गाय गोठा अनुदान महाराष्ट्र, महाराष्ट्रात बहुतेक शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. दुग्ध व्यवसायात वाढ करण्यासाठी सरकार कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना अमलात आणल्या जातात. अशीच एक योजना गाय गोठा अनुदान महाराष्ट्र या योजनेची अमलबजावणी केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.
बहुतेक शेतकाऱ्याकडे जनावरांसाठी व्यवस्थित निवारा नसतो. निवारा नसल्यामुळे जनावरे आजारी पडतात. पाळीव जनावरांचे ऊन, वारा , पाऊस या पासून संरक्षण करण्यासाठी गाय गोठा अनुदान च्या माध्यमातून शेतकऱ्यांना गोठा बांधणी साठी आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्र राज्यात 2 ते सहा जनावरांसाठी गोठा बांधणी साठी सरकार कडून 77448 रुपये इतकी रक्कम वितरित केली जाते. आजच्या या लेखात आपण गाय गोठा अनुदान महाराष्ट्र या योजने विषयी पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे संबंधी सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत.
योजनेचे नाव | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र. |
योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्रातील शेतकरी व पशुपालक |
योजनेतून लाभ | गोठा बांधणी साठी 77448 रुपये. |
योजनेचा उद्देश | पशू पालक शेतकऱ्यांना प्रोस्थाहण देणे. |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन / ऑनलाइन |
अर्ज पीडीएफ pdf. | गाय गोठा अर्ज pdf |
योजनेचा विभाग | नियोजन विभाग (रोहयो) |
गाय गोठा अनुदान उदिष्ट
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे.
- दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनवरांसाठी स्वच्छ गोठा उभारणे.
- गोठा बांधणी केल्यास जनवरांचे आरोग्य सुधारणे.
- शेतकऱ्यांना उत्पन्न वाढी साठी मदत करणे.
- पशू पालकांचे आर्थिक उत्पन्न वाढ करणे.
- दूध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोस्थाहण देणे.
गाय गोठा अनुदान नियम व अटी
- लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
- लाभार्थी व्यक्ति कडे स्वतची जमीन असणे आवश्यक आहे.
- एक कुटुंबाला या योजनेचा एकदाच लाभ घेता येईल.
- या योजनेचा लाभ हा फक्त ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना घेता येईल.
- या आधी सरकारच्या इतर कोणत्याही योजनेतून गोठा बांधण्यासाठी अनुदान घेतलेले असल्यास परत या योजनेतून लाभ दिला जात नाही.
- आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
गाय गोठा अनुदान आवश्यक कागदपत्रे.
- आधार कार्ड झेरॉक्स.
- मतदान कार्ड झेरॉक्स.
- राशन कार्ड झेरॉक्स.
- जात प्रमाण पत्र झेरॉक्स.
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
- पासपोर्ट आकाराचे फोटो.
- बँक पास बूक झेरॉक्स.
- मोबाइल नंबर.
- शेतकरी असल्याचा दाखला.
- ग्रामपंचायत शिफारस पत्र.
- जागेचे ७१२ / पिटीआर
- पशुधन असल्याचा दाखला.
- नरेगा (रोहयो) जॉब कार्ड.
- गोठा बांधणी अंदाजपत्रक.
- रहिवाशी प्रमाणपत्र.
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र अर्ज पद्धत
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र या योजने मध्ये अर्ज करण्यासाठी आपणास आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडे आपला अर्ज सादर करावा लागेल. आपण आपल्या अर्जासोबत वरील कागदपत्रे जोडून सरपंच / ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे आपला अर्ज सादर करू शकतात.
निष्कर्ष
गाय गोठा योजना महाराष्ट्र ही महात्मा गांधी रोजगार हमी योजने मार्फत राबवण्यात येते. या योजनेतील सर्व रक्कम नरेगा (महात्मा गांधी रोजगार हमी योजना) मार्फत वितरित केली जाते. गाय गोठा योजनेमधून शेतकऱ्यांना जनवारांसाठी गोठा बांधणी साठी अनुदान दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.
आजच्या लेखात आपण गाय गोठा विषयी सर्व माहिती पाहिलेली आहे. आपणास किंवा आपल्या जवळील मित्र नातेवाईक यांना या योजनेविषयी माहिती द्यावी. जर आपणास अर्ज करण्यास किंवा दुसरी काही अडचण असेल तर आपण आम्हाला संपर्क करू शकतात आम्ही आपणास नक्कीच मदत करू.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- गोठा म्हणजे काय?
- पाळीव प्राण्यासाठी ऊन वारा पाऊस या पासून संरक्षण करण्यासाठी केलेला निवारा म्हणजे गोठा होय.
- गाय गोठा अनुदान महाराष्ट्र अंतर्गत किती अनुदान मिळते?
- गाय गोठा अनुदान अंतर्गत 77188 रुपये अनुदान मिळते.
- गाय गोठा अनुदान अर्ज कसा करावा?
- गाय गोठा अनुदान अर्ज करण्यासाठी आपणास आपल्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये अर्ज सादर करावा लागेल.
- गाय गोठा अनुदान साठी ऑनलाइन अर्ज करता येतो का ?
- गाय गोठा अनुदान साठी सध्या तरी ऑनलाइन अर्ज करता येत नाही.
- गाय गोठा अर्ज कोठे मिळेल ?
- गाय गोठा अर्ज आपणास आपल्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये मिळेल . किंवा आपण येथे क्लिक गाय गोठा अर्ज pdf करून डाउनलोड करू शकतात.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
क
Ka
गाय गोटा बाधने
Gay gotha badhne
गाय गोटा बाधने