शरद पवार ग्राम समृद्धी योजना

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भारत सरकार हे नवनवीन योजना आखत आहे आणि त्या जास्ती जास्त ह्या शेतकऱ्यांसाठीच आहे . शेतीला एक जोडधंदा म्हणून काहीतरी करता यावे म्हणजे ज्या बरोबर शेती ही होईल आणि एक व्यवसाय पण होईल.  ज्यामुळे उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. तर अशीच एक सरकारने योजना सुरू केलेली आहे या योजनेचे नाव आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजना. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील व्यक्तीला चार योजनेचा लाभ घेता येणार आहे. या चार योजना मुख्यतः शेड उभारणे व पशुपालनाला प्रोत्साहन देण्याच्या संदर्भात आहेत. आपला भारत देश हा कृषिप्रधान  देश आहे. या देशामध्ये शेती क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात आहे यावर आधारित उद्योगधंदे ही मोठ्या प्रमाणात आहेत. शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने योजना राबविण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न हे दुप्पट करण्याचा हेतू आहे चला तर आपण आज शरद पवार ग्राम समृद्धी योजने बद्दल माहिती पाहणार आहोत या योजनेमध्ये अर्ज कोठे करायचा, लाभ कोणाला मिळणार आहे ,पात्रता कोण आहे , आवश्यक लागणारे कागदपत्रे या सर्वांची माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना

योजनेचे नाव

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना

कोणामार्फत राबवली जाते

महाराष्ट्र शासन 

विभाग

 महाराष्ट्र शासन नियोजन विभाग

अर्ज प्रक्रिया

ऑफलाइन

योजनेची सुरुवात

12 डिसेंबर 2020 रोजी .

लाभ

80 हजार  रुपये

लाभार्थी

शेतकरी व व्यवसाय करण्याची इच्छा असणारे लाभार्थी

उद्देश

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना माहिती

      या योजनेमध्ये ग्रामीण भागातील व्यक्तीला चार विशेष योजनेचा लाभ दिला जाणार आहे ही योजना मुख्यतः शेड साठी राबविण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात 12 डिसेंबर 2020 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे, तसेच रोजगार हमी विभाग ही योजना राबवणार आहे. त्याचप्रमाणे मनरेगा रोजगारही महाराष्ट्रात शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेची जोडला जाईल . या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. त्यांचा आर्थिक विकास होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना

या योजनेअंतर्गत चार कामांसाठी अनुदान दिले जाणार आहे ते खालील प्रमाणे पाहू या

  1. गाय व म्हैस यांच्यासाठी गोठा बांधणे
  2.  कुक्कुटपालनासाठी शेड बांधणे
  3.  शेळीपालनासाठी शेड बांधणे
  4.  भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग.

या चार योजनेला अनुदान दिले जाणार आहे. किती दिले जाणार आहे ते पाहूया.

  1. गाय व म्हैस यांच्यासाठी गोटा बांधणे

या योजनेअंतर्गत 2 ते 6 गुरांसाठी एक गोटा बांधता येईल, त्यासाठी 77,188 रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे.

 

6पेक्षा अधिक म्हणजे 12  गुरांसाठी दुप्पट, आणि 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान दिले जाणार आहे.

  1. कुक्कुटपालन शेड बांधणे

100 कोंबड्या करता शेड बांधायचे असेल तर 49,760 अनुदान दिले जाणार पेक्षा जास्त कोंबड्या असल्यास दुप्पट दिले जाणार आहे.

जर एखाद्याकडे100 कोंबड्या नसल्यास 100 रुपयांच्य स्टॉम्पवर दोन जमीनदारासह शेड ची मागणी करायची आहे. त्यानंतर यंत्रणे शेड मंजूर करावा आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी अण्णा  बंधनकारक राहील.

3.शेळी पालन शेड बांधणे

10 शेळ्या करता शेड बांधण्यासाठी 49,284 कृपया अनुदान दिले जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट, आणि 30 शेळ्यांकरता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे .

त्यासाठी अर्जदाराकडे 10 शेळ्या नसेल तर किमान 2 शेळ्या असाव्यात, असं शासन निर्णयात नामूद करण्यात आलं आहे.

  1. भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग

शेतातील कचरा एकत्र करून  नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10,537 रुपये अनुदान दिले जाणार आहे.

या सगळ्या चारीही कामांमधील बांधकामासाठी लांबी रुंदी जमीन क्षेत्रफळ किती असावा याची माहिती शासन निर्णयात सविस्तर दिले आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना उद्देश

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि शेतकऱ्यांना समृद्धी करणे हा आहे.

* या योजनेच्या माध्यमातून जनावरांचे संरक्षण करणे म्हणजे ऊन ,वारा, पाऊस आणि थंडीपासून संरक्षण करणे.

* या योजनेमार्फत शेतकऱ्यांच्या शेतीसोबत जोडधंदा म्हणून जनावरे पशु – पक्षी पाळून व्यवसाय करता येतो.

* या योजनेमार्फत शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करता येऊ शकतो आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढण्यास मदत होईल.

* या योजनेमार्फत शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करून शेतकऱ्यांचा सामाजिक विकास करणे.

* शेतीसोबतच जोडधंदा म्हणून जनावरे पाळण्यासाठी प्रोत्साहित करणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे.

* या योजनेचा लाभ घेणाऱ्याला कोणत्याही प्रकारे जनावरासाठी निवारा तयार करत असताना , अडचणी येऊ नये, त्यासाठी जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत शासनाच्या शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून केली जाते.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना मुख्य वैशिष्ट्ये

* शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे.

* या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेड बांधण्यासाठी आर्थिक अनुदानाच्या स्वरूपात  मदत केली जाते.

* या योजनेच्या माध्यमातून दिले जाणारी अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या DBT च्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होते.

* या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन सुधारणार आहे व शेतकऱ्यांना शासनाकडून खूप मोठी मदत होणार आहे.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना फायदे

* शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.

* शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्यांना गाई, शेळ्या, कोंबड्या, म्हैस व गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.

* या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

* शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेच्या माध्यमातून एक नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना नियम/ अटी /पात्रता

* शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.

* या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.

* शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा लाभ हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिला जातो.

* या योजनेचा लाभ हा शेतकऱ्याच्या कुटुंबातील एकाच व्यक्तीला घेता येतो.

* या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणारा गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना आवश्यक कागदपत्रे

* आधार कार्ड

* राशन कार्ड

* उत्पन्नाचे प्रमाणपत्र

* जातीचे प्रमाणपत्र

* रहिवासी प्रमाणपत्र

* मोबाईल क्रमांक

* जन्माचा दाखला

* ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र

* जॉब कार्ड असणे आवश्यक आहे

* 7/12 व 8 अ

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज करण्याची पद्धत

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल.

त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन ग्राम समृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा आहे.

अर्जामध्ये विचारलेले संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायचे आहे. त्यासोबत वरील दिलेले सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी. हा अर्ज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करावा. जमा करून झाल्यानंतर त्या अर्जाची पातळणी होते व पातळणी नंतर तो फॉर्म जमा होतो व लाभार्थी अर्जदाराला त्याची जमा पावती दिली जाते.

अशा प्रकारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

विचारले जाणारे प्रश्न

  1. शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही कधी सुरू करण्यात आली?

* शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही 12 डिसेंबर 2020 मध्ये सुरू करण्यात आले.

  1. शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत कशासाठी अनुदान दिले जाते?

* शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत चार कामासाठी अनुदान दिले जाते.

* १ गाय व म्हैस यांच्यासाठी गोठा बांधणे

* २ कुकुट पालनासाठी शेड बांधणे

* ३ शेळीपालनासाठी शेड बांधणे

* ४ भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग.

या चार कामासाठी अनुदान दिले जाते.

  1. शरद पवार ग्रामसमृद्धी योजना मध्ये अनुदान किती मिळणार आहे?

* शरद पवार ग्राम समृद्धी योजनांमध्ये दोन लाख 21 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळू शकते.

2 thoughts on “शरद पवार ग्राम समृद्धी योजना”

Leave a comment