शेती तार कुंपन योजना महाराष्ट्र Tar kumpan yojana

   (Tar kumpan yojana)

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

   केंद्र सरकार व राज्य सरकार या महाराष्ट्रात  नवनवीन योजना राबवत असतात ज्या की आपल्याला सर्वांसाठी खूप महत्त्वाच्या असतात तर आपण अशीच एक नवीन योजना पाहणार आहोत ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे जी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे Tar kumpan yojana शेती तार कुंपण योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची आहे. शासनाचा असा उद्देश असतो की शेतकऱ्यांची प्रगती व्हावी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे. शेती तार कुंपन योजना आधारे शेतकरी हा शेतात कोणतीही पिके घेऊ शकतो व चांगल्या प्रकारे उत्पन्न काढू शकतो.

      सध्याच्या काळामध्ये जंगलातले झाड तोडण्याचे प्रमाण वाढलेले आहे जंगलातले झाड तोडल्यामुळे प्राण्यांना काही खायला राहिले नाही. पूर्वीच्या काळामध्ये जसे जंगल असायच तसं आता राहिले नाही त्यामुळे जंगली प्राणी हे शेतात यायला लागले व शेतात त्या पिकांचे नुकसान करायला लागले या सर्वांचा शासनाने विचार केला व शेती तार कुंपन योजना अमलात आणली या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व त्यांच्या शेतामध्ये जे जंगली प्राणी नुकसान करतात त्यापासून त्यांना संरक्षण मिळेल. शेती तार कुंपण योजना साठी शासनाकडून शेती भोवताली काटेरी तार कुंपण ओढण्यासाठी जवळपास 90 टक्के अनुदान शेतकऱ्यांसाठी सरकार देत आहे.

      शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा तार कुंपण योजना ही डॉक्टर श्याम प्रसाद मुख जीवन विकास प्राणी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येत आहे. अनेक लोकांचे शेती हे जंगलाजवळ असते. किंवा डोंगराळ भागात पण असतात. हे आपण पाहिले आहोत अशा लोकांच्या शेतात जंगली जनावरे खूप प्रमाणावर नुकसान करतात अशा लोकांसाठी ही योजना आहे.

    मागील काही वर्षापासून बिबट्या व वाघाचे प्रमाण खूप वाढलेले आहेत त्यांनी पण खूप नुकसान केले आहे आपण बातम्या मध्ये ऐकलं असेल. त्या बिबट्याने वाघाने शेतकऱ्यांवर पण हल्ले केले आपण ऐकले आहोत व शेतात राहणाऱ्या लोकांच्या शेळ्या मेंढ्या पण खाल्ल्या होत्या शेतकरी हा शेतात जायला भीत होत शेती तार कंपनी योजना माध्यमातून शेतकऱ्याना पण अशा प्राण्यांपासून  संरक्षण मिळेल  आणि जनावरापासून पिकाचे नुकसान होणार नाही या योजनेचा लाभ घ्यावा आपण आज आले का मध्ये शेती तार कंपनी योजना बद्दल माहिती पाहणार आहोत या योजनांमध्ये कोण कोण पात्रता आहे अटी व नियम आवश्यक लागणारे कागदपत्रे सर्वांची माहिती आपण पाहणार आहोत तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचावा व या योजनेचा लाभ घ्यावा अशी शासनाची विनंती आहे.

Tar kumpan yojana

Tar kumpan yojana उद्देश

  • महाराष्ट्रात होणाऱ्या जंगली जनावरांपासून होणारे नुकसान टाळणे.
  • बिबट्या व वाघ सारखे प्राणी  शेतकऱ्यावरती हल्ले होतात या योजनेच्या माध्यमातून शेतीला तार कुंपण  केल जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठे संरक्षण मिळेल.
  • शेती तार कुंपण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला 90 टक्के अनुदान दिले जाणार आहे व उर्वरित दहा टक्के खर्च शेतकऱ्यांना करायचा आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नुकसान वाचवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे  असा शासनाचा विचार आहे.
  • शेतकऱ्यांचा विकास व्हावा असा या योजनेचा उद्देश आहे
  • शेतात जंगली जनावरापासून होणारे नुकसान टाळणे असा शासनाचा या योजने मागचा मुख्य उद्देश आहे.

Tar kumpan yojana पात्रता

  • Tar kumpan yojana शेती तार कुंपन योजना चा लाभ घेण्यासाठी शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
  • शेतकऱ्यांनी तार कुंपणासाठी निवडलेली शेती जंगलाच्या जवळील किंवा डोंगर भागाजवळील असली पाहिजे म्हणजे ( गाव वस्ती पासून दूर असणारी शेती) ज्या ठिकाणी जंगलातील प्राणी येतात अशी शेती या योजना साठी पात्रता आहे.
  • शेतकऱ्यांनी ज्या जमिनीचा अर्ज केलाय ती जमीन पुढील दहा वर्षासाठी शेती व्यतिरिक्त  कोणत्याही कामासाठी केला जाणार नाही याचा ठरावा त्या शेतकऱ्यांनी समितीकडे सादर करावा.
  • Tar kumpan yojana शेती तार कुंपण योजनेचा लाभ घेतल्या घेतल्यास ज्या शेतामध्ये जंगली जनावरापासून जे नुकसान पिकाचे होते त्या नुकसानिबाबत चा ठरावा ग्राम परिस्थिती विकास समिती/ संयुक्त वन व्यवस्थापन समिती /वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल

शेती तार कुंपण योजना लाभ

  • या योजनेचा लाभ हा चार प्रकारे दिला जातो
  • एक ते दोन हेक्टर क्षेत्र असेल तर 90 टक्के अनुदान.
  • दोन ते तीन हेक्टर क्षेत्र असेल तर 75 टक्के अनुदान.
  • तीन ते पाच हेक्टर च्या दरम्यान क्षेत्र असेल तर 50 टक्के
  • पाच हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर 40% पर्यंत अनुदान मिळते.

अशा प्रकारे आपल्या क्षेत्रानुसार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

शेती तर कुंपण योजना लागणारे आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड.
  2. 7/12 उतारा व 8 अ
  3. जात प्रमाणपत्र.
  4. ग्रामपंचायत चा दाखला. समितीचा ठरावा .
  5. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.

    वरील सर्व कागदपत्र दिलेले आहे ते सर्व या योजनेसाठी लागणारी आहेत. हे कागदपत्रे आपल्याकडे असतील तरच  आपण या Tar kumpan yojana योजनेचा लाभ घेऊ  शकता. 

शेती तर कुंपण योजना अर्ज करण्याची प्रक्रिया

      शेती तार कुंपण योजनासाठी तुम्ही ऑनलाईन ऑफलाइन अशा दोन्हीही पद्धतीने अर्ज करू शकतात. पण सध्या तरी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

  •      ऑफलाईन अर्ज पद्धत

    Tar kumpan yojana शेती तार कुंपण योजना साठी तुम्हाला  अर्ज करायचा असेल तर आपण आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीमधील अधिकाऱ्याकडे शेतीतार कुंपण योजना चा अर्ज सादर करावा लागतो जे या योजना साठी आवश्यक लागणारे सर्व कागदपत्रे घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना भेटून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतात

निष्कर्ष

            आम्ही तुम्हाला शेती तार कुंपण योजना याविषयी सर्व माहिती दिलेली आहे तुम्हाला लागणारे आवश्यक कागदपत्रे, या योजनेचा लाभ किती दिला जातो. या योजनेमध्ये कोण कोण पात्रता आहे .या  सर्वांची माहिती या लेखात दिलेली आहे. तरी पण तुम्ही पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन याची माहिती घेऊ शकतात. आणि या योजनेचा लाभ घ्यावा व दुसऱ्यांना पण घायला सांगा. 

विचारले जाणारे प्रश्न

  1. शेती तार कुंपण योजना ही कोणी सुरू केली?

      2  शेती तार कुंपण योजनेचा लाभ किती दिला जातो व कसा दिला जातो?

  • शेती तार कुंपण योजना लाभ हा चार प्रकारे दिला जातो.
  1.       एक ते दोन हेक्टर क्षेत्र असेल तर 90 टक्के अनुदान दिले जाते.
  2. दोन ते तीन हेक्टर क्षेत्र असेल तर 75 टक्के अनुदान दिले जाते.
  3. तीन ते पाच हेक्टर च्या दरम्यान क्षेत्र असेल तर 50 टक्के अनुदान दिले जाते.
  4. पाच हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर 40 %पर्यंत अनुदान दिले जाते.

       3  शेती तार कंपनी योजनेचा लाभ हा कोणाला दिला जाणार आहे?

  • Tar kumpan yojana शेती तार कुंपण योजनेचा लाभ  हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिला जाणारआहे .व  ज्या शेतकऱ्यांचे शेत हे डोंगराळ भाग जवळ आहे (म्हणजे गाव व वास्ती पासून दूर)  असणाऱ्या  शेतकऱ्यांना दिला जाणार आहे